PM Surya Ghar Yojana 2024 Online Apply: असा करा, पीएम सूर्य घर योजनेमध्ये ऑनलाइन अर्ज

PM Surya Ghar Yojana 2024 Online Apply: या लेखामध्ये पीएम सूर्य घर योजनामध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसे करू शकतो? याची संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप दिलेली आहे. 

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

2024 मध्ये योजनेमध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला केंद्र सरकारने सुरु केलेल्या पोर्टलमध्ये जावे लागेल. तुम्ही योजने अंतर्गत खालीलप्रमाणे दिलेल्या प्रकिया पाहून घर बसल्या मोबाईलच्या मदतीने ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता. 

Read More: PM Surya Ghar Yojana

योजने अंतर्गत मोबाईलमधून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला आवश्यक असणारी कागदपत्रे पीडीफ फॉरमॅटमध्ये स्कॅन करून ठेवावी लागेल. त्यानंतर लेखामधील प्रकिया फॉलो करून पोर्टलद्वारे अर्ज पूर्ण करा.

पीएम सूर्य घर योजना ऑनलाइन अर्ज प्रकिया

  • सुरुवातीला तुमच्या मोबाईलमध्ये पीएम सूर्य घर योजनाची अधिकृत वेबसाइट pmsuryaghar.gov.in ओपन करा. 
  • त्यानंतर तुम्हाला डॅशबोर्डमध्ये Apply For Rooftop Solar या ऑप्शनला सिलेक्ट करायचे आहे. 
  • पुढे डॅशबोर्डमध्ये Login आणि Registration चा पर्याय दिसेल. 
  • त्यामध्ये आधी लॉगिन आयडी तयार करून घ्यावे लागेल. 
  • लॉगिन आयडी तयार करण्यासाठी रजिस्ट्रेशन पर्याय निवडा. 
  • त्यामध्ये तुमचे राज्य, जिल्हा, वीज वितरण कंपनीचे नाव आणि ग्राहक क्रमांक टाका. 
  • त्यानंतर कॅप्चा कोड योग्यरीत्या भरून Next बटनावर क्लिक करा. 
  • पुन्हा पोर्टलमध्ये जाऊन लॉगिन करून घेणे. 
  • लॉगिन झाल्यावर तुमच्या समोर योजनेचा फॉर्म उघडून येईल. 
  • त्या फॉर्ममध्ये सूर्य घर योजनेसाठी लागणारी माहिती भरून घ्या. 
  • त्यानंतर तुमच्या मोबाईलमधील कागदपत्रांची पीडीफ फाईल अपलोड करा. 
  • कागदपत्रांची फाईल अपलोड झाल्यावर फॉर्म सबमिट करा. 
  • अशा पद्धतीने योजनेमध्ये तुमचा अर्ज पूर्ण होईल. 

Read More: