Ladki Bahin Yojana Payment Check: लाडकी बहीण योजनाचे पैसे चेक करायला तुम्हाला ऑनलाईन पोर्टलमध्ये जावे लागेल. आर्टिकलमध्ये पोर्टलमध्ये जाऊन योजनेतून मिळालेले पैसे तपासण्यासाठी स्टेप बाय स्टेप प्रकिया दिलेल्या आहेत.
लाडकी बहीण योजना अंतर्गत महाराष्ट्र शासनाने आतापर्यंत एकूण 7,500 रुपये रक्कम दोन टप्प्यांमध्ये पाठवली आहे. त्यामधील 4,500 रुपयांचा पहिला हफ्ता हा 25 सप्टेंबर, 2024 मध्ये आणि 3,000 रुपयांचा हफ्ता 08 ऑक्टोबर 2024 रोजी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्स्फर करण्यात आला आहे.
Read More: Ladki Bahin Yojana New Update 2024
महाराष्ट्र राज्य सरकारने या योजनेची सुरुवात जून, 2024 मध्ये केली होती. ज्याच्या माध्यमातून योजनेमध्ये सहभागी असणाऱ्या लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट डीबीटीमार्फत पाठवली जाते.
ज्या महिलांनी योजनेमध्ये अर्ज केले आहे आणि त्यांना आपले पैसे आले आहेत का? हे तपासण्यासाठी खालीलप्रमाणे दिलेल्या प्रकिया स्टेप बाय स्टेप फॉलो करा. त्यामध्ये आम्ही तुम्हाला पोर्टलमध्ये पेमेंट स्टेटस कसे पाहायचे? ते सांगितले आहे.
Read More: Ladki Bahin Yojana 4th List
लाडकी बहीण योजनाचे पैसे तपासण्याची प्रकिया
- लाडक्या बहिणीचे पैसे तपासण्यासाठी मोबाईलमध्ये योजेनची ladakibahin.maharashtra.gov.in ही अधिकृत वेबसाइट उघडा.
- त्यानंतर डॅशबोर्डमध्ये तीन डॉटवर क्लिक करून अर्जदार लॉगिनमध्ये जावा.
- लॉगीनमध्ये गेल्यावर तुमचे रजिस्टर केलेले मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाका.
- पुढे कॅप्चा कोड व्यवस्थित भरून Login वर क्लिक करा.
- पोर्टलमध्ये लॉगिन झाल्यानंतर Application Submitted चा ऑपशन निवडा.
- त्यानंतर लाभार्थी महिलांची संपूर्ण माहिती व स्टेटस उघडून येईल.
- त्या माहितीमध्ये Action पर्यायामध्ये दुसऱ्या बॉक्सवर क्लिक करा.
- क्लिक केल्यावर तुम्हाला किती पैसे मिळाले? व कोणत्या बँकेत जमा झाले? याची माहिती मिळेल.