Ladki Bahin Yojana Status Check: या आर्टिकलमध्ये लाडकी बहीण योजनाचे स्टेटस कसे पाहायचे? याची संपूर्ण प्रकिया स्टेप बाय स्टेप दिलेली आहे.
या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारने लाभार्थी महिलांना 1,500 रुपयांच्या रक्कमेनुसार आतापर्यंत एकूण 5 हफ्ते पाठवले आहेत. ज्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 4,500 रुपये आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 3,000 रुपये अशी एकूण 7,500 रुपये योजनेमध्ये सहभागी असणाऱ्या महिलांना डीबीटीद्वारे थेट बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाने महिलांना सोप्या पद्धतीने योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी आणि त्याचे स्टेटस पाहण्यासाठी ladakibahin.maharashtra.gov.in लाडकी बहीण योजनाची वेबसाइट तयार केली आहे, त्यामध्ये तुम्ही घर बसल्या मोबाईलच्या साहाय्याने योजनेचे स्टेटस पाहू शकता.
आपल्या आर्टिकलमध्ये योजनेसाठी तयार केलेल्या वेबसाइटमध्ये जाऊन स्टेटस कसे तपासायचे? आणि त्यासाठी कोणती प्रकिया करावी लागेल? याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे.
लाडकी बहीण योजनेचे स्टेटस कसे चेक करावे?
- योजनेचे स्टेटस तपासण्यासाठी सुरुवातीला मोबाईलवर अधिकृत वेबसाइट उघडा.
- वेबसाइटमध्ये प्रवेश केल्यावर तुम्हाला अर्जदार लॉगिनवर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर योजनेमध्ये अर्ज करतेवेळी रजिस्टर केलेला मोबाईल नंबर व पासवर्ड टाका.
- जर तुम्ही पासवर्ड विसरला असाल तर Forget Password हा ऑप्शन बाजूला असेल, त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड टाकून सेंड ओटीपीवर क्लिक करून पुन्हा पासवर्ड बनवा.
- पुढे पोर्टलमध्ये लॉगिन करून Application Submitted या ऑप्शनला सिलेक्ट करा.
- तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर Application Status जे काही असेल ते दिसेल.
- तसेच आणखी माहिती करून घेण्यासाठी ऍक्शनच्या खालील बॉक्समध्ये जाणे.
Read More: