Pradhan Mantri Ujjwala Yojana 2.0 Online Registration: भारत देशामधील 21 लाखांपेक्षा जास्त घरांमध्ये पीएम उज्ज्वला योजना 2.0 अंतर्गत रजिस्ट्रेशन करणाऱ्या महिलांना फ्री कनेक्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने 2016 रोजी सुरु केलेल्या PMUY योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 75 लाखांपेक्षा जास्त घरांमध्ये मोफत गॅस कनेक्शन उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. भारत सरकार योजनेचे टप्प्याटप्प्याने रजिस्ट्रेशन पोर्टलद्वारे सुरु करून देशामधील गरीब वर्गातील महिलांना लाभ देत आहेत.
Read More: Pradhan Mantri Ujjawala Yojana
गरीब घरातील महिलांना फ्री गॅस कनेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी पुन्हा एकदा सरकारने पीएम उज्ज्वला योजना 2.0 ची ऑनलाइन रजिस्ट्रेशन प्रकिया सुरु केली आहे. ज्यामध्ये तुम्ही अजूनपर्यंत मोफत गॅस कनेक्शनचा लाभ घेतला नसेल, तर आर्टिकलच्या माध्यमातून अर्जाची ऑनलाइन प्रकिया जाणून घ्या आणि स्टेप बाय स्टेप नोंदणी करून घ्या.
पीएम उज्ज्वला योजना 2.0 ऑनलाइन रजिस्ट्रेशन प्रकिया
- सर्वात प्रथम pmuy.gov.in च्या अधिकृत वेबसाइटमध्ये जावा.
- त्यानंतर Apply for New Ujjwala 2.0 चा ऑपशन निवडा.
- पुढे तीन पैकी एका गॅस कंपनीची निवड करा.
- कनेक्शनच्या प्रकारामध्ये योजनेच्या नवीन कनेक्शनचे पर्याय सिलेक्ट करा.
- तुमचे राज्य व जिल्हा टाकून आलेल्या यादीमधून डिस्ट्रिब्युटर निवडा.
- पुढे तुमचा मोबाईल नंबर व कॅप्चा भरून सबमिट करा.
- त्यानंतर योजनेचा फॉर्म येईल तो व्यवस्थित भरू घ्या.
- योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड करा.
- अपलोडींग पूर्ण झाल्यानंतर फॉर्म सबमिट बटनावर क्लिक करून पुढे पाठवा.
- अर्ज केलेला योजनेचा फॉर्म प्रिंट करून निवडलेल्या गॅस एजेन्सीमध्ये जाऊन जमा करा.
Read More: