Pradhan Mantri Ujjawala Yojana 2024: देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांनी 1 मे 2016 रोजी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरु केली होती. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील रेशन कार्डधारक गरीब वर्गातील महिलांना मोफत गॅस सिलेंडर दिला जातो. या योजने अंतर्गत देशातील 75 लाख महिलांना मोफत गॅस कनेक्शनसाठी अर्ज फॉर्म जमा करण्याचा लक्ष केंद्र सरकारचे आहे.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना यामध्ये ऑनलाईन अर्ज प्रकियाबद्दल सांगणार आहोत, त्याचसोबत उज्ज्वला योजना काय आहे? त्यांचे उद्देश, योजनेचा लाभ घेऊन फायदा काय होईल? अर्ज करण्यासाठी पात्रता काय आहे? त्याचसोबत आवश्यक असणारी कागदपत्रे अशाप्रकारची संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखातून मिळेल. त्यासाठी शेवटपर्यंत लेख लक्षपूर्वक वाचा.
Pradhan Mantri Ujjawala Yojana in Marathi
PMUY योजना म्हणजेच प्रधानमंत्री उज्ज्वला योजना. या योजनेची सुरुवात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांनी 1 मे, 2016 रोजी केली. या योजनेच्या मार्फत देशामधील गरीब कुटुंबातील APL आणि BPL रेशन कार्डधारक महिलांना गॅस कनेक्शन उपलब्ध केले जाते. या योजनाचे कार्य पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयातर्फे सांभाळण्यात येत आहे.
आजही भारतामधील काही ग्रामीण भागात लाकूड जाळून चुलीवर जेवण तयार केले जाते, अशामुळे वातावरण दूषित होते आणि पर्यावरणाससुद्धा हानी होते. अशा प्रदूषित वातावरणामुळे आजारपण लागू शकते. यासाठी या गोष्टींचा विचार करता केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेची सुरुवात केली आहे.
ज्यामुळे महिला आपल्या घरात स्वयंपाक करत असताना प्रदूषण मुक्त वातावरण राहील आणि त्यामुळे महिलांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी संपूर्ण आर्टिकल शेवट पर्यंत पाहा.
उज्ज्वला 2.0 नवीन कनेक्शन काय आहे? | PM Ujjwala Yojana 2.0
2016 मध्ये सुरु केलेल्या या योजनामध्ये देशभरातील पात्र असलेल्या महिलांना अर्ज करण्यासाठी सहभागी होता आले नाही, यासाठी उत्तर प्रदेशमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी 10 ऑगस्ट 2021 योजी पुन्हा उज्ज्वला योजना 2.0 ची सुरुवात करण्यात केली. यामधून देशभरातील 75 लाखापेक्षा जास्त लाभार्थीं महिलांना मोफत नवीन गॅस कनेक्शन उपलब्ध करून देण्याचे धोरण केंद्र सरकारने ठेवले आहे.
Pradhan Mantri Ujjawala Yojana Overview
योजनाचे नाव | प्रधानमंत्री उज्ज्वला योजना |
श्रेणी | केंद्र सरकारी योजना |
कोणी सुरु केली | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी |
कधी सुरु केली | 1 मे 2016 |
विभाग | पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय |
उद्देश | गरीब वर्गातील महिलांना मोफत गॅस उपलब्ध करून देणे |
लाभार्थी | देशामधील 18 वयापेक्षा जास्त स्त्रिया |
हेल्पलाईन नंबर | 1800-266-6696 |
अधिकृत वेबसाईट | pmuy.gov.in |
PM Ujjawala Yojana Purpose
आजपण तुम्ही आपल्या देशामधील काही ग्रामीण भागात बघाल, जिथे गरीब वर्गातील परिवार राहतात. अशा लोकांकडे गॅस नसल्यामुळे ते लोक जंगलामधून झाडाची लाकडे तोडून आणतात, यामुळे पर्यावरणालासुद्धा नुकसान होत आहे. त्याचप्रमाणे, त्या लाकडांचा उपयोग स्त्रिया घरामध्ये चुलीच्या साहाय्याने जेवण करायला वापरतात.
त्यामुळे होणारा धूर घरातील वातावरण दूषित बनवून तो धूर आरोग्यासाठी धोकादायक ठरतो आहे. यासाठी भारत सरकारचे मुख्य उद्देश या उज्ज्वला योजना उपक्रमाच्या माध्यमातून दुर्बळ भागातील महिलांना मोफत LPG गॅस प्रदान करून पर्यावरणाला आणि आरोग्याला वाचवणे.
उज्ज्वला गॅस कनेक्शनचा फायदा काय? | Ujjawala Yojana Benefits
- या योजनेच्या माध्यमातून गरजू आणि दुर्बळ भागातील महिलांना विनामूल्य गॅस कनेक्शन जोडून दिले जातील.
- प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2.0 अंतर्गत लाभार्थी महिलांना पहिले रिफील आणि गॅस मोफत दिले जाणार.
- भारत सरकारने या योजने अंतर्गत 650 कोटी खर्च करण्यासाठी तरतूद केली आहे.
- या योजनामध्ये महिलांना सहभागी होण्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रियासुद्धा सरकारने सुरु केली आहे.
- देशभरातील सगळ्याच लाभार्थी महिलांना योजने अंतर्गत दर महिने प्रत्येक गॅस सिलेंडरवर सबसिडी मिळणार.
- भारत देशामधील गरिबी वर्गातील 75 लाखाहून अधिक महिलांना योजनेचा लाभ घेता येणार.
- सरकारकडून गॅस सिलेंडरवर 450 रुपये सबसिडी देण्यात येणार.
- सबसिडीची रक्कम ही लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये DBT म्हणजेच Direct Bank Transfer या माध्यमातून पाठविण्यात येणार.
- केंद्र सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास 10 कोटी महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे.
- या योजनेमध्ये एका वर्षात 12 गॅस सिलेंडरसाठी सबसिडी सरकारतर्फे प्रदान करण्यात येणार.
- या उपक्रमामुळे चुलीसाठी वापरल्या जाणाऱ्या लाकडाचा वापर कमी होऊन पर्यावरण सुरक्षित राहील.
- त्याचसोबत महिलेच्या कुटुंबातील सदस्यसुद्धा प्रदूषित हवेतून सुरक्षित राहतील.
उज्ज्वला योजनेसाठी कोण पात्र आहे? | Ujjawala Yojana Eligibility
- प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही फक्त भारत देशामधील रहिवासी महिलांसाठीच आहे.
- या योजनेसाठी अर्ज करणारी महिला 18 वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
- या योजनेमध्ये गरिबी रेषेतील बीपीएल रेशन कार्डधारक महिलापात्र ठरतील.
- त्याशिवाय मागासवर्गीय असलेले OBC वर्गातील महिला.
- एकाच घरात ओएमसी किंवा इतर LPG कनेक्शन महिलेच्या घरात नसले पाहिजेत.
- देशामधील SECC अंतर्गत येणाऱ्या लोकांसाठी आहे.
- देशामधील अनुसूचित जाती आणि जमातीच्या कुटुंबातील महिलांसाठी.
- जंगलात राहण्याऱ्या वनवासी समुदायातील स्त्रिया यामध्ये सहभागी होऊ शकतात.
- प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत येणाऱ्या SSC/ST लाभार्थी महिलांसाठी.
- त्याचप्रमाणे अंत्योदय ऍन योजना (AAY) यामध्ये सहभागी असलेल्या महिला.
- अर्ज करणाऱ्या महिलेचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
- तसेच बेटांवरील व नदीच्या बेटांवरील स्त्रिया अर्ज करू शकतात.
- चहा बागायतीदार जमातीमधील स्त्रियांसाठी.
Pradhan Mantri Ujjawala Yojana Required Documents
- अर्जदार महिलेचे आधारकार्ड (KYC Linked)
- रेशन कार्ड
- वयाचे प्रमाणपत्र
- बँक खात्याचे पासबुक
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज फोटो
- बीपीएल कार्ड
- वोटर आयडी
- जातीचे प्रमाणपत्र
Pradhan Mantri Ujjawala Yojana Online Registration
जर पीएम उज्ज्वला योजना अंतर्गत महिलेला गॅस कनेक्शन हवे असेल तर ऑनलाईन अर्ज करू शकतात. PM Ujjawala Yojana Online Apply करण्यासाठी खाली दिलेल्या प्रकिया स्टेप बाय स्टेप पार पाडा.
- सर्वात प्रथम तुम्हाला उज्ज्वला योजनाच्या अधिकृत वेबसाईटला जायचे आहे.
- तुमच्या समोर होम पेज उघडेल, त्यावर apply for new ujjwala 2.0 वर क्लिक करा.
- त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला Indane, Bharatgas आणि HP Gas हे तीन पर्याय दिसतील.
- या तिघांपैकी तुम्हाला कोणते गॅस कनेक्शन करायचे आहे ते निवडणे.
- निवडून झाल्यावर तुम्हाला type of connection मध्ये Ujjwala 2.0 new connection वर क्लिक करून Hear by declare वर टिक करायचे आहे.
- त्यानंतर तुमचे राज्य आणि जिल्हा निवडून show list वर क्लिक करा.
- त्यानंतर तुमच्या समोर तुमच्या जिल्ह्यामधील डिस्ट्रिब्युटरची यादी ओपन होईल.
- त्या डिस्ट्रिब्युटरच्या यादीमधील तुमच्या जवळच्या डिस्ट्रिब्युटरला निवडून continue बटन दाबणे.
- ही प्रकिया केल्यानंतर तुमच्या समोर नवीन पेज उघडेल त्यामध्ये मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड टाकून सबमिट करणे.
- यानंतर तुमच्या समोर नवीन गॅस कनेक्शनसाठी एप्लिकेशन फॉर्म खुलेल.
- तुम्हाला त्या फॉर्ममध्ये विचारली गेलेली सगळी माहिती लक्षपूर्वक भरून घेणे.
- तसेच या योजनेमध्ये लागणारी आवश्यक कागदपत्रे अपलोड करून घेणे.
- सगळं भरून झाल्यानंतर फॉर्म सबमिट करायचा आहे.
- फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला डाउनलोडचा पर्याय येईल त्यावरून फॉर्म आणि अपलोड केलेलं कागदपत्रे प्रिंट करून घेणे.
- प्रिंट केलेले फॉर्म आणि कागदपत्रे तुम्ही निवडलेल्या गॅस agency ला जाऊन जमा करणे.
- अशा प्रकारे या योजनेसाठी तुमचा ऑनलाईन अर्ज यशस्वीरित्या पार पडेल आणि तुम्हाला agency तर्फे गॅस कनेक्शन उपलब्ध करून मिळेल.
PM Ujjawala Yojana Application Offline Process
जर तुम्हाला उज्ज्वला योजना अंतर्गत ऑनलाईन फॉर्म भरण्यास समस्या असतील तर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज करू शकतात. या योजनेमध्ये ऑफलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या प्रकियांना फॉलो करा.
- सगळ्यात आधी तुम्हाला प्रधानमंत्री उज्ज्वला योजनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- तुमच्या समोर वेबसाईटचे होमपेज उघडून येईल.
- त्या होम पेजवरील प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अर्ज फॉर्मच्या पर्यायावर क्लिक करणे.
- त्यानंतर तो फॉर्म डाउनलोड करून प्रिंट करून घ्या.
- फॉर्ममध्ये विचारली गेलेली सगळी माहिती भरून घ्या.
- या योजनांमध्ये लागणारी आवश्यक कागदपत्रे जोडून घेणे.
- भरलेला फॉर्म आणि जोडलेल्या कागदपत्रांना घेऊन जवळील गॅस agency मध्ये जाऊन जमा करा.
- जर तुम्ही पात्र असाल तर, गॅस agency मधील कर्मचारी तपासणी करून सरकारतर्फे मिळणाऱ्या गॅस कनेक्शनची सुविधा पुरवली जाईल.
- अशाप्रकारे ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल आणि काही दिवसांनी तुम्हाला मोफत गॅस कनेक्शन प्राप्त होईल.
PM Ujjawala Yojana KYC Form Download
या योजनेअंतर्गत महिलांना लाभ घ्यायचा असेल तर EKYC झालेले असणे महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला EKYC फॉर्म हवा असेल तर खालील दिलेल्या प्रक्रिया फॉलो करा.
- सगळ्यात आधी तुम्हाला अधिकृत वेबसाइट PMUY gov in वर जायचे आहे.
- तुमच्या समोर होमपेज उघडेल.
- होमपेज वर खाली स्क्रोल केल्यावर KYC form for New LPG Connection असा पर्याय दिसेल.
- त्या पर्यायावर क्लिक करून नवीन पेजवर pdf उघडेल.
- तो pdf डाउनलोड करून प्रिंट करून घेणे.
- जर तुम्हाला ऑनलाईन केवायसी फॉर्म डाउनलोड करण्यात समस्या येत असेल, तर तुम्ही जवळच्या गॅस agencyला भेट देऊन फॉर्म प्राप्त करू शकता.
निष्कर्ष
आम्ही आशा करतो, Pradhan Mantri Ujjawala Yojana बदल या लेखातून आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती सोप्या पद्धतीमध्ये सांगितली आहे आणि ती तुम्हाला समजली देखील असेल अशी आशा करतो. या योजने संदर्भात आम्ही तुम्हाला उज्ज्वला योजनांबद्दल महत्त्वपूर्ण माहिती सांगितली, त्याचसोबत योजनेचे फायदे, उद्देश, पात्रता, आवश्यक कागदपत्रे याबद्दल सविस्तर माहिती पुरवली. त्याचशिवाय ज्या महिलांना यामध्ये अर्ज करून लाभ घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने स्टेप बाय स्टेप प्रक्रियांचे मार्गदर्शन देखील केले आहे.
हा लेख तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या ओळखीतील गरजू महिलांना हा share करा आणि अशाच नवनवीन योजनांबद्दल जाणून घेण्यासाठी आम्हाला subscribe करू शकता किंवा Telegram व WhatsApp चॅनेलला जॉईन करून अपडेट्स मिळवू शकता.
FAQs
उज्ज्वला योजनेच्या अनुदानासाठी कोण पात्र आहे?
उज्ज्वला योजनेच्या अनुदानासाठी गरीब वर्गातील महिला पात्र आहे.
मोफत गॅस योजनेचे नाव काय आहे?
मोफत गॅस योजनेचे नाव प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आहे.
उज्वला गॅस योजना कधी चालू झाली?
उज्वला गॅस योजना 1 मे 2016 रोजी चालू करण्यात आली.
हे सुद्धा पहा: