3 Best MSME Loan Yojana in Marathi

3 Best MSME Loan Yojana in Marathi: भारत सरकारच्या या टॉप 3 एमएसएमई लोन योजनाच्या माध्यमातून देशामधील नागरिक उद्योग करण्यासाठी आर्थिक फायदे घेऊ शकतात. 

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

MSME चा पूर्ण अर्थ म्हणजे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग असा आहे. केंद्र सरकारने देशाची अर्थव्यवस्था सक्रिय चालण्यासाठी आणि गतिमान होण्यासाठी Micro, Small & Medium Enterprises ची सुरुवात केली. ज्याच्या माध्यमातून देशामधील नागरिकांना उद्योग करण्यासाठी विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. 

आपल्या भारत देशाच्या जीडीपीमध्ये MSME चे 29 टक्क्यांपेक्षा जास्त योगदान अर्थव्यवस्थेला होतो आहे. यामध्ये देशामधील 12 कोटींपेक्षा जास्त लोक काम करत आहेत. ज्यामध्ये भारताच्या निर्यातीमध्ये 50 टक्के वाटा एमएसएमईचा आहे.

आर्टिकलमध्ये दिलेल्या एमएसएमईच्या या 3 योजनाचा लाभ घेऊन नागरिक छोटे व मध्यम उद्योग सुरु करू शकतात.

3 Best MSME Loan Yojana in India 

Pradhan Mantri Mudra Yojana (PMMY) 

प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत नागरिकांना व्यवसाय सुरु करण्यासाठी 50 हजार रुपये ते 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. हे कर्ज नागरिकांना बँकेच्या माध्यमातून दिले जाते, ज्यामध्ये वर्षाला 9% ते 10% व्याजदर लावले जाते. आतापर्यंत मुद्रा लोनच्या मदतीने 40 कोटींपेक्षा जास्त लोकांनी फायदा घेतला आहे.

Prime Minister Employment Generation Programme (PMEGP)

PMEGP Loan Yojana अंतर्गत देशामधील गरीब वर्गातील नागरिकांना व्यवसाय सुरु करण्यासाठी 10 लाखांपासून ते 50 लाख रुपयांपर्यंत लोन उपलब्ध करून दिले जाते. त्याचसोबत योजनेमध्ये लाभार्थी असलेल्या नागरिकांना केंद्र सरकारतर्फे सबसिडीचा सुद्धा लाभ देण्यात येतो.

Stand Up India Yojana 

स्टॅन्ड अप इंडिया योजनेच्या माध्यमातून भारत देशामधील महिलांना व्यवसाय चालू करण्यासाठी 10 लाख रुपयांपासून ते 1 कोटी रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्याचप्रकारे अनुसूचित जाती व जमाती वर्गातील लोकांना योजनेमधून कर्ज घेण्याचा लाभ मिळतो.