Bandhkam Kamgar Yojana Online Registration: असे करा, बांधकाम कामगार योजनामध्ये ऑनलाइन रजिस्ट्रेशन

Bandhkam Kamgar Yojana Online Registration: महाराष्ट्र राज्य सरकारने सुरु केलेल्या बांधकाम कामगार योजनामध्ये ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यासाठी आर्टिकलमध्ये दिलेल्या संपूर्ण प्रकिया स्टेप बाय स्टेप फॉलो करा. 

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारतर्फे महाराष्ट्रामधील कामगारांना आर्थिक मदत मिळावी यासाठी ऑनलाइन पोर्टल उघडण्यात आलेले आहेत. या पोर्टलच्यामार्फत ज्या नागरिकांना अर्ज करायचे आहेत, ते सहजरित्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतात. 

योजनेच्या माध्यमातून ज्या कामगारांना लाभ घ्यायचा आहे, त्यांना आर्टिकलमध्ये दिलेल्या प्रकियानुसार रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे.

बांधकाम कामगार योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन प्रकिया 

  • योजनेमध्ये ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सुरुवातीला MAHABOCW चे पोर्टल उघडावे लागेल. 
  • पोर्टलमध्ये प्रवेश केल्यानंतर वर्कर मेनूमधील Workers Registration या पर्यायावर क्लिक करणे. 
  • त्यानंतर तुम्ही पात्र आहेत का? हे पाहण्यासाठी Eligibility and Proceed to Register यामधील संपूर्ण माहिती वाचा. 
  • पुढे माहिती वाचून झाल्यावर टिकमार्क करून Check Your Eligibility ऑपशन सिलेक्ट करा. 
  • त्यानंतर तुमच्या समोर स्क्रीनवर बांधकाम कामगार नोंदणी असा पर्याय मिळेल तो निवडणे. 
  • तुमचे आधारकार्ड नंबर आणि मोबाईल नंबर भरून Proceed to Form चे बटन दाबणे. 
  • तुमच्या समोर योजनेचा संपूर्ण फॉर्म दिसेल, त्यामध्ये विचारलेली माहिती ध्यानपूर्वक भरून घेणे. 
  • माहिती भरल्यावर योजनेसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा. 
  • फॉर्ममध्ये भरलेली माहिती व कागदपत्रे तपासून सबमिट बटनावर क्लिक करा. 
  • तुम्ही सुरुवातीला नोंद केलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी जाईल तो भरा. 
  • त्यानंतर तुम्हाला एप्लिकेशन नंबर सोबत पोचपावती मिळेल ती डाउनलोड करून घेणे.

Read More: