MGNREGA Yojana Eligibility: मनरेगा योजनाचा लाभ घेण्यासाठी देशामधील ग्रामीण क्षेत्रामध्ये राहत असलेले नागरिक पात्र आहेत. परंतु त्यांना अर्ज करण्यासाठी आणखी काही पात्रतेच्या अटी केंद्र सरकारतर्फे लागू करण्यात आलेल्या आहेत, त्या आर्टिकलच्या माध्यमातून सविस्तर दिले आहे.
मनरेगा योजनामध्ये पात्र असलेल्या नागरिकांना केंद्र सरकारच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विविध क्षेत्रामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाते. ज्याची सुरुवात केंद्र सरकारने 02 फेब्रुवारी, 2006 रोजी केली होती.
ग्रामीण क्षेत्रामधील जे नागरिक सुशिक्षित नाही, त्यांना सामाजिक व आर्थिक दृष्टया आत्मनिर्भर बनविण्यासाठी केंद्र सरकारने योजनेची सुरुवात केली होती. यामध्ये पात्र ठरलेल्या नागरिकांना सरकारतर्फे गॅरंटी रोजगार दिला जातो.
नागरिकांना योजनेमध्ये सहभागी होऊन रोजगार प्राप्त करण्यासाठी केंद्र सरकारने कोणत्या पात्रतेच्या अटी लागू केल्या आहेत? त्याची संपूर्ण माहिती आर्टिकलमध्ये पाहायला मिळेल.
मनरेगा अंतर्गत कोण पात्र आहे?
- मनरेगा योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी नागरिकांना भारत देशामधील स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे.
- या योजनेमध्ये फक्त ग्रामीण क्षेत्रामध्ये राहत असलेले नागरिक सहभागी होऊ शकतात.
- योजने अंतर्गत अर्ज करणाऱ्या नागरिकांचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असणे महत्त्वाचे आहे.
- ग्रामीण क्षेत्रामधील ज्या नागरिकांनी शिक्षण पूर्ण केलेले नाही ते योजनेसाठी पात्र आहेत.
- योजनेमध्ये 30% महिला वर्गाचा समावेश करण्यात आला असून स्त्री देखील सहभाग घेऊ शकतात.
- कुटुंबामधील एकापेक्षा जास्त सदस्य योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत.
- योजनेसाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांना राशन कार्ड, BPL कार्ड, बँक पासबुक, ओळखपत्र आणि आधारकार्ड सादर करणे बंधनकारक आहे.
- त्याचप्रमाणे अर्जदाराचे आधारकार्ड बॅँक खात्यासोबत जोडलेले असणे.
Read More: