Swadhar Yojana Eligibility: स्वाधार योजनेसाठी कोण पात्र आहे? जाणून घ्या माहिती

Swadhar Yojana Eligibility: महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे स्वाधार योजना अंतर्गत 51,000 रुपये आर्थिक लाभ घेण्यासाठी कोण असणार पात्र? याची संपूर्ण माहिती आर्टिकलमध्ये देण्यात आलेली आहे. 

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

महाराष्ट्र राज्यामधील गरीब वर्गातील पात्र विद्यार्थ्यांना सरकारच्या माध्यमातून उच्च शिक्षण घेण्यासाठी वर्षाला आर्थिक मदत केली जाते. ज्यामध्ये पात्र असलेल्या लाभार्थ्यांना बोर्डिंग व लॉजिंग सुविधा, मेडिकल खर्च आणि विविध खर्च भागविण्यासाठी 51 हजार रुपये रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते. 

राज्य सरकारच्या या आर्थिक मदतीचा लाभ घेण्यासाठी कोणत्या वर्गातील तरुण? आणि कोणकोणते विद्यार्थी योजनेमध्ये पात्र आहेत? याची माहिती लेखातून जाणून घ्या.

स्वाधार योजनाची पात्रता 

  • योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामधील स्थानिक असणे आवश्यक आहे. 
  • महाराष्ट्र राज्यामधील अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि नव बौद्ध (NB) या कुटुंबातील तरुण पिढी योजनेसाठी पात्र आहेत. 
  • योजने अंतर्गत डिप्लोमा, दहावी, बारावी आणि बिजनेस संबंधित शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक लाभ देण्यात येतो. 
  • विद्यार्थ्यांना योजनेमध्ये पात्र असण्यासाठी मागील शैक्षणिक वर्गात 60% पेक्षा जास्त टक्केवारी असावी. 
  • त्याचप्रमाणे महाराष्ट्रामधील दिव्यांग विद्यार्थी देखील योजनेसाठी पात्र आहेत. 
  • दिव्यांग विद्यार्थ्यांना योजनाचा लाभ घेण्यासाठी 40% टक्केवारी असणे अनिवार्य आहे. 
  • अडीच लाखांच्या खाली ज्या विद्यार्थीच्या कुटुंबामध्ये वार्षिक उत्पन्न असेल तो अर्ज करू शकतो. 
  • पात्र असलेल्या विद्यार्थीकडे योजनेसाठी लागणारी सर्व कागदपत्रे असावी. 
  • त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना जातीचा दाखला आणि दिव्यांग तरुणांना प्रमाणपत्र सादर करणे महत्त्वाचे आहे.
  • एक विद्यार्थीं फक्त 7 वर्ष योजना अंतर्गत आर्थिक लाभ घेण्यासाठी पात्र असणार. 
  • शासनातर्फे आर्थिक मदत पाठविण्यासाठी राष्ट्रीयकृत किंवा शेड्युल बँकमध्ये खाते असणे.

Read More: