PM Awas Yojana Gramin 2024: प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना ही केंद्र सरकारने देशामधील जे नागरिक आर्थिक परिस्थितीमुळे स्वतःचे घर बांधण्यासाठी व जुने घर दुरुस्त करण्यासाठी सक्षम नसतात, त्यांच्यासाठी सुरु केली आहे. या योजनाची सुरुवात प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी यांनी 2015 रोजी सुरु केली.
केंद्र सरकारतर्फे या प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना आपले घर बनविण्यासाठी आणि दुरुस्त करण्यासाठी आर्थिक मदत मिळेल. या आर्थिक मदतीमध्ये डोंगराळ भागातील जमिनीसाठी 1,30,000 रुपये तर आणि समतुल्य भागातील जमिनीसाठी 1,20,000 रुपये नागरिकांना मिळणार. ज्या इच्छुक नागरिकांना PMAYG योजना अंतर्गत लाभ घ्यायचा आहे, त्यांनी आम्ही दिलेला हा संपूर्ण लेख शेवटपर्यंत लक्षपूर्वक पाहा.
Pradhan Mantri Awas Yojana Gramin in Marathi
पीएम आवास योजना ही 1985 साली इंदिरा गांधी आवास योजना या नावाने सुरु केली गेली होती. याच योजनेला 1 एप्रिल 2016 साली बदलून प्रधानमंत्री आवास योजना केले गेले, याचाच एक भाग म्हणून PMAYG ज्याला Pradhan Mantri Gramin Awas Yojana या नावाने देखील ओळखले जाते.
भारत सरकारकडून चालविण्यात येणारी ही योजना देशामधील गरीब व बेघर कुटुंबियांना लाभदायक ठरते आहे. या योजनेच्यामार्फत गरीब व बेघर कुटुंबियांना स्वतःचे घर दुरुस्त करण्यासाठी आणि नवीन बांधण्यासाठी 1,30,000 रुपये दिले जातात. दरवर्षी केंद्र सरकार पीएम आवास योजनेची नवीन यादी जाहीर करते, ज्यामध्ये ज्या लोकांचे नाव येतात त्यांना या योजनेचा लाभ मिळतो.
Pradhan Mantri Awas Yojana Gramin 2024 Overview
योजनाचे नाव | Pradhan Mantri Gramin Awas Yojana |
योजनेची सुरुवात | 2015 रोजी |
सुरु केली | केंद्र सरकारने |
विभाग | ग्रामीण विकास मंत्रालय |
लाभार्थी | SECC-2011 |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
उद्देश | देशामधील प्रत्येक कुटुंबाला स्वतःचे घर होण्यासाठी |
अधिकृत वेबसाईट | pmayg.nic.in |
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनाचे उद्देश | Pradhan Mantri Awas Scheme Gramin Purpose
आपल्या देशामधील जे लोक ग्रामीण भागांमध्ये आर्थिक स्वरूपात गरीब आहेत, अशा गरीब वर्गाला स्वतःचे पक्के घर बनविण्यासाठी आर्थिक मदत मिळावी हेच या योजनेचे उद्देश आहे.
आता प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना 2024 अंतर्गत ग्रामीण क्षेत्रामधील गरीब वर्गाचे आपले पक्के घर बनविण्याचे स्वप्न साकार होणार आणि त्याचसोबत केंद्र सरकारतर्फे शौचालय बांधायला सुद्धा 12,000 रुपये मदत म्हणून दिली जाणार.
ग्रामीण आवास योजनाचे लाभार्थी | PM Awas Yojana Gramin Beneficiary
- मध्यम वर्ग 1
- मध्यम वर्ग 2
- आर्थिक स्वरूपात दुर्बळ वर्ग
- अनुसूचित जाती व जमातींना
- कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी
- कोणत्याही जाती व धर्मातील महिलांना
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनासाठी पात्रता | Pradhan Mantri Gramin Awas Yojana Eligibility
- ज्या नागरिकांकडे घर नाही किंवा जमीन नाही.
- कुटुंबामध्ये 25 वर्षापेक्षा जास्त वयाचा साक्षर पुरुष सदस्य नसला पाहिजे,
- कुटुंबामध्ये 15 ते 59 वर्ष वयोगटातील सदस्य नसले पाहिजेत.
- ज्या कुटुंबामध्ये दिव्यांग नागरिक असतील तरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- जे फक्त लेबर काम करतात, पण त्यांना कायम स्वरूपी नोकरी नाही असे नागरिक.
- अल्पसंख्येतील अनुसूचित जाती आणि जमातीमधील लोकांचा समावेश असलेले.
- कच्या भिंती आणि कच्चे छप्पर असलेल्या कुटुंबियांना
ग्रामीण आवास योजनाचे वैशिष्ट्ये | PM Awas Scheme Gramin Features
- PM Awas Yojana Gramin याच्या मार्फत देशभरात 1 कोटी घर बांधण्यासाठी आर्थिक मदत केंद्र सरकारतर्फे दिली जाणार.
- ग्रामीण आवास योजना अंतर्गत घरे 25 sq. mt. च्या आकाराचे असतील, त्यासोबत स्वयंपाक घरासाठी जागा सुद्धा असेल.
- या योजनेच्या मार्फ़त समतुल्य जागेसाठी 1,20,000 रुपये तर डोंगराळ जागेसाठी 1,30,000 रुपये युनिट मदत दिली जाणार.
- केंद्र सरकारचा या योजनेसाठी एकूण 1,30,075 कोटी रुपये खर्च विभागणी ही 60:40 प्लॅन जागेसाठी आणि पर्वतीय जागेसाठी 90:10 अशाप्रकारे केंद्र सरकार आणि राज्य सरकार करणार आहे.
- स्वच्छ भारत मिशन -ग्रामीण (SBM-G) च्या मार्फत शौचालय सुद्धा पुरवले जातील, त्याचसोबत समर्पित निधी सुद्धा सरकारतर्फे दिला जाईल.
- SECC 2011 च्या आकडांच्या आधारे ग्रामीण भागातील कुटुंबाचे निर्धारण केले जाईल.
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनासाठी आवश्यक कागदपत्रे | Pradhan Mantri Gramin Awas Yojana Required Documents
- आधारकार्ड
- अर्जदाराचे ओळखपत्र
- अर्जदाराचे बँक खाता (जे आधारकार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे)
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज फोटो
Pradhan Mantri Awas Yojana Gramin ऑनलाईन रजिस्ट्रेशन | PMAYG Online Registration
ग्रामीण क्षेत्रातील ज्या लोकांची नावे 2011 च्या सामाजिक आर्थिक जात जनगणनेच्या यादीमध्ये असतील तेच फक्त ग्रामीण आवास योजने अंतर्गत अर्ज करू शकतात. या योजेनेमध्ये अर्ज करण्यासाठी लागणारा आयडी आणि पासवर्ड हा तुमच्या क्षेत्रामधील पंचायततर्फ दिला जाणार असून जर तुमचे नाव यादीमध्ये असेल तर Gramin Awas Scheme मध्ये अर्ज करण्यासाठी 3 टप्प्यात प्रक्रिया असतात त्या खालील प्रमाणे
पहिला टप्पा
- सर्वातआधी PM Awas Yojana Gramin च्या अधिकृत वेबसाईटवर जाणे.
- वेबसाईटच्या home page वर तुम्हाला Data Entry हा पर्याय दिसेल.
- Data Entry पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला PMAY Rural ची ऑनलाईन लॉगिनसाठी लिंक ओपन होईल.
- त्या लॉगिन बॉक्समध्ये पंचायततर्फे दिलेले Username आणि Password टाकून login करून घेणे.
- login केल्यानंतर आपल्या सोयीनुसार Username आणि Password बदलून घेणे.
- त्यानंतर तुम्हाला PMAY Online Login च्या पोर्टलमध्ये 4 पर्याय दिसतील.
- पहिले PMAY G, दुसरे आवास अँपद्वारे खेचलेल्या फोटोची पडताळणी, तिसरे स्वीकारपत्र डाउनलोड करणे आणि चौथे FTO साठी ऑर्डर शीट तयार करणे.
- यामधील जो पहिला पर्याय आहे, PMAY G online नोंदणी त्यावर क्लिक करून फॉर्म उघडणे.
दुसरा टप्पा
- PMAY G नोंदणीचा फॉर्म ओपन केल्यानंतर तुमच्या समोर चार पर्याय दिसतील.
- पहिला पर्याय personal details, दुसरा Bank A/C Details, तिसरा Convergence Details,
- चौथा Details from Concern Office या चार प्रकारे माहिती भरावी लागेल.
- पहिल्या पर्यायामध्ये फक्त तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती भरणे.
तिसरा टप्पा
- तिसऱ्या टप्प्यात PM Gramin Awas Scheme च्या अर्ज फॉर्ममध्ये काही बदल करण्यासाठी यूजर आयडी आणि पासवर्डच्या मदतीने पोर्टल लॉगिन करणे.
- त्यानंतर Beneficiary Registration Form वर क्लिक करणे.
- अशा प्रकारे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमध्ये अर्ज करून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.
Pradhan Mantri Gramin Awas Yojana Beneficiary Status Check
- सगळ्यातआधी तुम्हाला प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- अधिकृत वेबसाईट उघडल्यानंतर तुमच्या समोर होम पेज खुलेल.
- होम पेजवर गेल्यावर stakeholder वर क्लिक करा.
- त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या IAY/PMAYG Beneficiary लिंकवर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुमच्या समोर नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुमचा Registration नंबर टाकायचा आहे.
- Registration नंबर टाकून झाल्यावर submit बटनवर क्लिक करणे.
- अशा प्रकारे बेनेफिशरीचे स्टेटस तुमच्या समोर स्क्रीनवर दिसेल.
PM Awas Yojana Gramin List 2024 बघण्याची प्रक्रिया
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणची यादी बघण्यासाठी तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर नसेल, तर खालील दिलेल्या प्रकियेला फॉलो करून तपासू शकता.
- सगळ्यात पहिले तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- त्यानंतर PMAYG वेबसाईटचा होमपेज तुमच्या समोर उघडेल.
- त्या होम पेजवर Awaassoft चा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करणे.
- क्लिक करून झाल्यावर तुम्हाला त्या मेनूमध्ये report दिसेल त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर rhreporting या नवीन पेजवर रिडिरेक्ट होणार.
- त्या पेजवरील Social Audit Reports (H) पर्यायामध्ये Beneficiary Details for Verification दिसेल त्यावर क्लिक करणे.
- त्यावर क्लिक केल्यानंतर MIS Report तुमच्या समोर खुलेल.
- पेज ओपन झाल्यानंतर त्यामध्ये राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि गाव यांची माहिती भरून घेणे.
- माहिती भरून झाल्यावर या योजनाचा sectionचा पर्याय निवडणे.
- त्यानंतर कॅप्चा कोड टाकून सबमिट बटनवर क्लिक करून तुम्हाला तुमच्या गावाची यादी प्राप्त होईल.
निष्कर्ष
Pradhan Mantri Awas Yojana Gramin याबद्दल आम्ही या लेखातून सोप्या पद्धतीमध्ये संपूर्ण माहिती सांगितली आहे. या योजनाचे उद्देश काय आहे? लाभार्थी कोण असणार आहे? यासाठी पात्र कोण असणार आहेत? या उपक्रमाचे वैशिष्ट्ये काय आहे? अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती? या योजना अंतर्गत ऑनलाईन अर्ज कसा करायचा? Beneficiary स्टेटस कसा तपासायचा? ऑनलाईन यादी कशी तपासायची? या सगळ्यांबद्दल आम्ही तुम्हाला मार्गदर्शन केले.
तुम्हालासुद्धा या योजनेअंतर्गत तुमचे स्वतःचे स्वप्नाचे घर ग्रामीण भागात तयार करायचे असल्यास, आम्ही सांगितलेल्या माहितीनुसार सहभागी व्हा. हा लेख जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या ग्रामीण क्षेत्रातील गरजू लोकांना share करा. असेच नवनवीन योजना संबंधित माहितीसाठी आमच्या Telegram किंवा WhatsApp चॅनेलला तुम्ही जॉईन करू शकता.
FAQs
PMAY G साठी कोण पात्र आहे?
ज्या नागरिकांकडे घर नाही असे लोक पात्र ठरतील.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजना काय आहे?
या योजनामध्ये ग्रामीण भागातील लोकांसाठी 1,20,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.
PMAY G अंतर्गत घराचा किमान आकार किती आहे?
PMAY G अंतर्गत घराचा किमान आकार 25 sq mt आहे, त्यामध्ये स्वयंपाकघराचा सुद्धा समावेश असणार.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमध्ये नोंदणी कशी करावी?
या योजने अंतर्गत pmayg च्या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करावी.
pmayg चा अर्थ काय आहे?
pmayg चा अर्थ म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण होय.
मी माझी ग्रामीण आवास यादी कशी तपासू?
तुम्ही तुमची यादी पंचायत कक्षात तपासू शकता.
हे सुद्धा वाचा: