Namo Shetkari Yojana Beneficiary Status Check: तुम्ही नमो शेतकरी योजना अंतर्गत रजिस्ट्रेशन केले आहे आणि तुम्हाला लाभार्थी स्थिती पाहायची असेल तर आर्टिकलमध्ये दिलेली संपूर्ण प्रकिया स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि तुमचे नाव तपासा.
योजनेमध्ये रजिस्ट्रेशन केलेल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे प्रत्येक वर्षाला 6,000 रुपये आर्थिक मदत बँक खात्यामध्ये थेट ट्रान्स्फर केली जाते. या योजनेमधून 2,000 रुपये हफ्ता वर्षाच्या चौथ्या महिन्याला तीन टप्प्यामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केला.
महाराष्ट्र सरकारतर्फे ज्या महिन्यात हफ्ता शेतकऱ्यांना ट्रान्स्फर करायचा असतो, तेव्हा इंस्टॉलमेंटची तारीख घोषित केली जाते. यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे नाव आले आहेत, त्यांना आर्थिक लाभ पाठविला जातो. याच घोषित केलेल्या हफ्त्याचे स्थिती पाहण्याची प्रकिया आर्टिकलमध्ये सविस्तर देण्यात आलेली आहे ती फॉलो करून लाभार्थी स्टेटस पाहू शकता.
नमो शेतकरी योजना लाभार्थी स्थिती तपासायची प्रकिया
- लाभार्थी स्थिती पाहण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला मोबाईल किंवा डेस्कटॉपमध्ये nsmny.mahait.org ही वेबसाइट उघडायची आहे.
- त्यानंतर तुमच्या समोर योजनेच्या वेबसाइटचे डॅशबोर्ड उघडून येईल.
- त्या डॅशबोर्डमध्ये तुम्हाला Beneficiary Status चा ऑपशन दिसेल, त्यामध्ये प्रवेश करणे.
- तुमच्या समोर नवीन स्क्रीन उघडून येईल, त्यामध्ये योजनेमध्ये रजिस्टर केलेले मोबाईल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे.
- नंबर टाकून झाल्यावर कॅप्चा कोड व्यवस्थितरित्या भरून घेणे आणि काही अडचण आली तर दुसरा कॅप्चा कोड रीलोड करा.
- पुढे गेट ओटीपीवर क्लिक करून मोबाईलमध्ये आलेला कोड सबमिट करा. (तुमचा मोबाईल नंबर eKYC रजिस्ट्रेशन केले असेल तर तुमच्या नंबर ओटीपी येईल.)
- ओटीपी सबमिट केल्यावर तुमच्या स्क्रीनवर योजनेची संपूर्ण लाभार्थी स्थिती उघडून येईल.
Read More: