PM Awas Yojana Gramin List 2024: या आर्टिकलमध्ये पीएम आवास योजना ग्रामीणची यादी काय आहे? आणि ती यादी कशी तपासायची? हे जाणून घेणार आहोत तर शेवटपर्यंत लेख पहा.
केंद्र सरकारने भारत देशामधील ग्रामीण क्षेत्रात राहत असलेल्या नागरिकांना पक्के घर उपलब्ध करून देण्यासाठी पीएम आवास योजना ग्रामीणची सुरुवात 2015 रोजी केली होती. ज्यामध्ये ग्रामीण क्षेत्रामधील ज्या लोकांकडे स्वतःचे घर नाही आणि ते योजनेसाठी पात्र आहेत. त्यांना केंद्र सरकारच्या माध्यमातून पक्के घर बनविण्यासाठी आर्थिक मदत केली जाते.
ज्या नागरिकांनी योजनेमध्ये अर्ज केले आहे, त्यांना आपले नाव 2024 च्या नवीन यादीमध्ये पाहायला मिळेल. त्या यादीमध्ये गावाप्रमाणे लाभार्थ्यांची नावे नोंद केलेली असतात. आता ती यादी कशी पाहायची? आणि कशी डाउनलोड करायची? यासाठी लेखामध्ये सविस्तर प्रकिया दिलेली आहे.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यादी कशी तपासायची?
- योजनेची यादी तपासण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला अधिकृत वेबसाइट उघडायची आहे.
- त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर प्रधान मंत्री आवास योजना – ग्रामीणचे होमपेज उघडून येईल.
- त्या होमपेजच्या मेन्यूबारमध्ये जाऊन Awassoft या ऑपशनवर क्लिक करा.
- पुढे काही पर्याय ड्रॉप डाउन होतील, त्यामधील Report यामध्ये प्रवेश करणे.
- प्रवेश केल्यानंतर तुम्ही नवीन पेजवर रीडिरेक्ट कराल आणि त्यामध्ये तुम्हाला Social Audit Reports मधील Beneficiary Details for Verification यावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमच्या समोर MIS Report उघडून येईल.
- त्यामध्ये तुमचे राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडून घ्या.
- पुढे तुम्हाला कोणत्या वर्षाची यादी तपासायची? ती निवडा.
- आता आपण PMAY-G ची यादी 2024-25 पाहत आहेत तर आम्ही ती निवडतो.
- त्यानंतर Pradhan Mantri Awaas Yojana Gramin ची निवड करा.
- खाली कॅप्चा कोड असेल तो योग्यरीत्या भरून Submit बटन दाबा.
- तुमच्या समोर योजनेची यादी उघडून येईल ती डाउनलोड करून घ्या.
Read More: