Ayushman Bharat Yojana Eligibility: आपल्या लेखामध्ये आयुष्यमान भारत योजना अंतर्गत 5 लाखांचा वैद्यकीय विमा घेण्यासाठी कोण पात्र आहेत? याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत, तर आर्टिकल शेवटपर्यंत पहा.
भारत सरकारने देशामधील नागरिकांना आरोग्य विमा सेवा देण्यासाठी 23 सप्टेंबर, 2018 रोजी आयुष्यमान भारत योजनाची सुरुवात केली होती. ज्याच्या माध्यमातून योजनेमध्ये पात्र असलेल्या नागरिकांना एक वर्षासाठी 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा प्रदान करण्यात येतो.
योजनेच्या अंतर्गत हे पाच लाखांचे आरोग्य विमा घेण्यासाठी कोण पात्र आहेत? किती वयाचे नागरिक योजनेमध्ये अर्ज करू शकतात? आणि कोणकोणत्या कॅटेगॅरीमधील नागरिक योजनेचा लाभ घेऊ शकतात? याची संपूर्ण माहिती आर्टिकलच्या माध्यमातून जाणून घेण्यास मिळेल.
आयुष्यमान भारत योजनाची पात्रता निकष
- योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांना भारत देशाचे स्थानिक रहिवासी असायला पाहिजे.
- भारत देशामधील गरीब व आर्थिक दृष्टया कमकुवत असलेले कुटुंब योजनेसाठी पात्र आहेत.
- सामाजिक आर्थिक जात गणना (SECC) 2011 मध्ये ज्या नागरिकांचा समावेश आहे ते योजनेमध्ये अर्ज करू शकतात.
- त्याचप्रमाणे सरकारने सुरु केलेल्या राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना अंतर्गत सहभागी असलेले लाभार्थी देखील पात्र आहेत.
- ग्रामीण क्षेत्रामध्ये राहत असलेल्या अनुसूचित जाती व जमाती, कामगार, दिव्यांग, महिला आणि आदिवासी हे नोंदणी करू शकतात.
- शहरी क्षेत्रामधील वाहन चालक व हेल्पर, पेंटर, हस्तकला, कचरा उचलणारे, बांधकाम कामगार, प्लम्बर, वेल्डर्स, घरगुती कामगार, कंडक्टर, टेलर्स, मजदूर, कुली, सुरक्षा रक्षक आणि कारागीर हे पात्र आहेत.
- योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या कुटुंबातील 16 ते 59 वर्षाच्या खालील सदस्य बेरोजगार असावा.
- योजने अंतर्गत रजिस्ट्रेशन करण्यासाठी नागरिकांचे पगार 10 हजार रुपयांच्या खाली असावे.
- ज्या कुटुंबाकडे स्वतःचे घर नसून ते गरिबी रेषेखालील वर्गात येतात.