Pradhan Mantri Suraksha Bima Yojana Benefits: PMSBY म्हणजे काय आणि त्याचे फायदे?, जाणून घ्या संपूर्ण माहिती 

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana Benefits: PMSBY म्हणजे प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना, ज्याच्यामाध्यमातून नागरिकांना मोफत विमा प्रदान करण्यात येतो. त्याचप्रकारे आणखी कोणकोणते लाभ देण्यात येतात? हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण आर्टिकल पहा.

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

आपल्या देशामध्ये भरपूर प्रमाणात गरिबी रेषेखाली कुटुंब राहतात, त्यांना आर्थिक समस्या असल्या कारणाने आपल्या आरोग्य संबंधित कोणत्याही प्रकारचे सुविधा उपलब्द करून घेण्याची संधी प्राप्त होत नाही. अशा कुटुंबाना वैद्यकीय सुरक्षा प्रदान करण्यासाठी केंद्र सरकारने योजनेची स्थापना केली. 

या योजनेसंबंधित लेखामध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये योजनेची सुरुवात कधी झाली? त्यामधून कोणाला आणि कोणते फायदे मिळतात? 

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशामधील गरीब वर्गातील कुटुंबाना आरोग्य विषयक विमा प्रदान करण्यासाठी प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजनाची सुरुवात 08 मे, 2015 रोजी केली होती. 

देशामधील गरिबी रेषेखालील कुटुंबाना घरातील कोणत्याही व्यक्तीचे अपघात झाले किंवा निधन झाल्यास त्यांना सुरक्षेच्या अंतर्गत विमा दिला जातो, ज्यामध्ये दोन लाखांपर्यंतचा विमा कव्हर नागरिकांना देण्यात येतो. 

PMSBY योजनाचे फायदे काय आहेत?

  • भारत देशामधील गरीब व मध्यम वर्गामधील कुटुंबाना योजनेच्या माध्यमातून वैद्यकीय सुरक्षा देण्यात येते. 
  • योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना विमासाठी वर्षाला फक्त 20 रुपये प्रीमियम भरावे लागते. 
  • योजनेमध्ये पात्र असलेल्या नागरिकांना 2 लाखांचा विमा सुरक्षा प्रदान करण्यात येतो. 
  • त्याचप्रमाणे योजनेमध्ये सहभागी असलेल्या नागरिकांच्या बँक खात्यामधून ऑटोमॅटिकली वर्षाची प्रीमियम वजा केली जाते. 
  • केंद्र सरकारने PMSBY योजने अंतर्गत 29 कोटींपेक्षा जास्त कुटुंबाना विमा सुरक्षेचा लाभ दिला आहे. 
  • कोणतेही नागरिक बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन योजनेच्या माध्यमातून विमा घेऊ शकतात. 
  • योजनेमध्ये 18 ते 70 वर्ष वयोगटामधील नागरिक सहभागी होऊन विमाचा लाभ घेऊ शकतात.

Read More: