Vayoshri Yojana Documents: अर्जदारांना मुख्यमंत्री वयोश्री योजनामध्ये अर्ज करण्याआधी आर्टिकलमध्ये दिलेल्या यादीप्रमाणे कागदपत्रे गोळा करणे आवश्यक आहे. ते कोणकोणते कागदपत्रे तुम्हाला जमा करावी लागतील? यासाठी लेख वाचा.
महाराष्ट्र राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदत मिळावी यासाठी राज्य सरकारने योजनेची सुरुवात केली होती. त्यामध्ये महाराष्ट्रामधील दीड कोटींपेक्षा जास्त नागरिकांनी अर्ज करून लाभ घेतला आहे. ज्यामध्ये योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना 3 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले आहेत.
तसेच काही नागरिकांनी चुकीचे व अपूर्ण कागदपत्रे अर्ज करताना सादर केले, ज्यामुळे त्यांचे फॉर्म शासनातर्फे रद्द करण्यात आले. तुम्हाला योग्यरित्या अर्ज करून वयोश्री योजनाचे लाभ मिळविण्यासाठी खालीलप्रमाणे दिलेल्या यादीनुसार कागदपत्रे जोडावी लागतील. चला तर मग जाणून घेऊयात कोणकोणती कागदपत्रे योजनेसाठी आवश्यक आहेत?
मुख्यमंत्री वयोश्री योजना कागदपत्रे
- वरिष्ठ नागरिकांचा वयाचा पुरावा (शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला)
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- अर्जदाराचे ओळखपत्र
- कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला (तहसीलदारकडून घेतलेला)
- बँक खात्याचे पुरावे (पासबुकचे पहिले पान)
- बीपीएल रेशन कार्ड
- जातीचा दाखला
- आधारकार्ड नसल्यास आधारचे नोंदणी पावती
- इतर उपक्रमातून मागील 3 वर्षात फायदा न घेतल्याचा घोषणापत्र
- वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- वरिष्ठांचे आधार कार्ड (बँकेसोबत लिंक असणे)
- महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र (वीज बिल)
- मतदान कार्ड
- योजनेचा अर्जाचा फॉर्म
Read More: