PM Ujjwala Yojana Registration: असे अर्ज करून मिळवा, फ्री LPG गॅस कनेक्शन

PM Ujjwala Yojana Registration: घरामध्ये मोफत LPG गॅस कनेक्शनचा लाभ घेण्यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनामध्ये या पद्धतीने रजिस्ट्रेशन करा. 

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनाच्या माध्यमातून देशभरातील 10 कोटींपेक्षा जास्त घरांमध्ये फ्री गॅस कनेक्शन सुविधा उपलब्ध करून दिले आहे. या योजनेची सुरुवात केंद्र सरकारने आर्थिक दृष्टया गरीब व मध्यम वर्गातील कुटुंबाना मदत करण्यासाठी 2016 मध्ये लॉन्च केली होती. 

आतापर्यंत जेवढ्या महिलांनी योजनेमध्ये नोंदणी करून लाभ घेतला आहे, त्यांना केंद्र सरकारच्या माध्यमातून 450 रुपये प्रति सिलेंडर सबसिडी आणि पहिल्या कनेक्शनची गॅस फ्रीमध्ये रिफील करून देण्यात आले आहे. 

तुम्ही सुद्धा गरीब किंवा मध्यम वर्गातील असून योजनेचा लाभ घेतला नसेल तर आर्टिकलमध्ये दिलेल्या नोंदणी प्रकिया जाणून घेऊन अर्ज करा आणि सरकारच्या माध्यमातून मिळणाऱ्या फ्री कनेक्शनचा लाभ घ्या. 

योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी तुम्ही ऑफलाइन किंवा ऑनलाइन पद्धतीचा वापर करू शकता. जर तुम्हाला ऑफलाइन रजिस्ट्रेशन करायचे असल्यास तुमच्या जवळील गॅस कनेक्शन एजन्सीमध्ये भेट देऊन करून शकता. जर तुम्हाला स्वतः ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर खालील प्रमाणे दिलेल्या सर्व प्रकिया फॉलो करावे लागतील. 

  • तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपमार्फत Pradhan Mantri Ujjwala Yojana ची Official Website उघडा. 
  • त्यानंतर Apply for New Ujjwala 2.0 च्या पर्यायावर क्लिक करा. 
  • तुम्हाला ३ प्रकारच्या गॅस एजन्सीचे पर्याय दिसतील, त्यामधील एकाची निवड करा. 
  • Type of Connection कोणते पाहिजे? ती निवडून Declaration वर टिक करणे. 
  • पुढे तुमचे राज्य व जिल्हा टाकून यादी उघडेल, त्यामधील Gas Distributor ची निवड करणे. 
  • त्यानंतर तुमचा मोबईल नंबर आणि कॅप्चा कोड भरून सबमिट बटनावर क्लिक करा. 
  • तुमच्या समोर योजनेचा संपूर्ण रजिस्ट्रेशन फॉर्म उघडून येईल. 
  • त्या फॉर्ममध्ये विचारली गेलेली संपूर्ण माहिती योग्यरीत्या भरून घेणे. 
  • त्यांनंतर आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे. 
  • संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर तपासून सबमिट बटन दाबणे. 
  • अशा पद्धतीने योजनेमध्ये फ्री गॅस कनेक्शनसाठी अर्ज पूर्ण झालेला आहे. 
  • सबमिट केलेला फॉर्म प्रिंट करून तुम्ही निवडलेल्या गॅस एजन्सीमध्ये जाऊन जमा करणे. 
  • त्यानंतर तुम्ही योजनेसाठी पात्र असल्यास एजन्सीमार्फत मोफत कनेक्शन लावण्यात येतील.

Read More: