PM Kisan Yojana Eligibility: या आर्टिकलमध्ये पीएम किसान योजनाची पात्रता काय आहे? हे सविस्तर जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये केंद्र सरकारने लागू केलेल्या अटीनुसार पात्र असलेल्या शेतकरी लाभार्थ्यांना योजनेच्यामार्फत आर्थिक लाभ दिले जातात.
जे काही शेतकरी पीएम किसान योजनामध्ये रजिस्ट्रेशन करत आहेत, त्यांना केंद्र सरकारने लागू केलेल्या अटींच्याप्रमाणे पात्र असणे गरजेचे आहे. काही शेतकरी पात्रतेच्या अटी न बघता अर्ज करतात.
अशामध्ये ते शेतकरी पात्र नसल्याकारणाने त्यांचे अर्ज शासनातर्फे स्वीकारले जात नाही. त्यासाठी तुम्ही योजनेसाठी पात्र आहेत कि नाही हे जाणून घेणे आवश्यक आहे. यासाठी या आर्टिकलमध्ये पात्रतेच्या संपूर्ण अटी सांगितल्या आहेत.
पीएम किसान योजना पात्रतेच्या अटी
- योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी भारत देशामधील शेतकरी वर्ग पात्र आहेत.
- भारत देशामधील ग्रामीण व शहरी क्षेत्रातील शेतकरी नागरिक योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणारे शेतकरी कोणत्याही सरकारी कार्यालयात कार्यरत नसावे.
- लहान व मार्जिनल वर्गातील शेतकरी बांधव अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांचे बँकेमध्ये खाते असणे आवश्यक आहे.
- त्याचसोबत शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले असणे गरजेचे आहे.
- कुटुंबामधील फक्त एकाच सदस्याला योजनेचा लाभ देण्यात येतो.
- योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
पंतप्रधान किसान योजनेसाठी कोण पात्र नाही?
पंतप्रधान किसान योजनेसाठी पात्र नसलेल्या अटी खालीलप्रमाणे सविस्तर दिलेल्या आहेत.
- संसदेमध्ये कोणत्याही पदावर काम करणारे कर्मचारी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असणार नाहीत.
- त्याचप्रमाणे वर्तमान व भूतकाळामध्ये कोणी आमदार असतील आणि त्यांच्याजवळ शेती आहे, ते सुद्धा योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
- ज्या शेतकऱ्यांना महिन्याला 10 हजार रुपये पेक्षा जास्त पेन्शन येत आहे ते देखील योजनेमध्ये सहभागी होऊ शकत नाही.
- टॅक्स भरणारे शेतकरी नागरिक योजनेसाठी पात्र नाही.
- ज्या नागरिकांकडे शेत जमीन नाही, असे लोक रजिस्ट्रेशन करू शकत नाही.
- ज्या शेतकऱ्यांनी 01 फेब्रुवारी 2019 नंतर जमिनीसाठी रजिस्ट्रेशन केले आहेत ते देखील अपात्र आहे.
- रजिस्टर असलेले वकील, चार्टर्ड अकाऊंटन्ट आणि इंजिनिअर यामध्ये अर्ज करू शकत नाही.
- ज्या नागरिकांकडे जमीन आहे, परंतु त्यावर ते शेती करत नसतील तर योजनेसाठी अपात्र आहेत.
- तसेच ज्या शेतकऱ्यांना संस्थात्मक शेत जमीन दिली आहे, परंतु ती त्यांच्या नावे नाही असेही लोक अर्जासाठी अपात्र आहेत.
Read More: