Maharashtra Pink E-Rickshaw Yojana 2024: महिलांसाठी या जिल्ह्यात मिळणार पिंक ई-रिक्षा

Maharashtra Pink E-Rickshaw Yojana 2024: महाराष्ट्र सरकारतर्फे राज्यातील महिलांना आत्मनिर्भर राहून चांगला रोजगार निर्माण करता यावा यासाठी 2024 मध्ये महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना सुरु करण्यात येणार आहे. या योजनेचा मुख्य हेतू महिलांचा आत्मसम्मान वाढवून रोजगार आणि सुरक्षा प्रदान करणे हा आहे. त्याचसोबत पर्यावरणाकडे लक्ष देऊन हा आवश्यक पाऊल राज्य सरकार उचलणार आहे. महाराष्ट्र राज्यातील 10 शहरांमध्ये ही योजना लागू करणार आहेत.

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

Table of Contents

2024 च्या शेवटी महिलांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी. त्याचसोबत स्त्रियांचा प्रवास सुरक्षित होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या शहरात ई-पिंक रिक्षा योजना लवकरच सुरु करणार आहे. असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. 

महाराष्ट्र ई-पिंक रिक्षा योजनेचा आढावा घेताना मंत्रालयातील महिला व बालविकास मंत्री तटकरे, त्याच विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे तसेच महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. इंदू जाखड आणि आयुक्त राहुल मोरे हे सगळे बैठकीमध्ये उपस्थित राहून चर्चा करत होते. 

या बैठकीमध्ये योजना परिपूर्ण होण्यासाठी मंत्री आदिती तटकरे यांनी ई-रिक्षाला प्राधान्य देणे, बँकेची निवड करणे, प्रशिक्षण आणि लाभार्थ्यांची निवड योग्यरित्या करणे या सर्व बाबी तपासण्यासाठी आदेश दिले.

Maharashtra Pink E-Rickshaw Yojana 2024 in Marathi

महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना अंतर्गत राज्यातील महिलांना पहिल्या वर्षी 5000 गुलाबी रिक्षा वाटप केल्या जातील.  या योजनेची सुरुवात करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागातर्फे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांना आराखडा दाखविण्यात आला. त्यानंतर महिला व बालकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी महिलांसाठी पहिल्या वर्षांसाठी 5 हजार ई-रिक्षा देण्याचे निर्देश दिले आहे. 

ज्या महिला E-Rickshaw Yojana अंतर्गत लाभार्थी असणार आहेत, त्यांना ई-रिक्षा विकत घेताना 10% रक्कम स्वतःला भरावी लागेल. त्याचसोबत 70% कर्ज बँकेद्वारे कवर करण्यात येईल आणि 20% सबसिडी सरकार प्रदान करणार आहे. या योजनेचा लाभ पुरुषांना नसून फक्त महिलांसाठीच असणार आहे.

Maharashtra Pink E-Rickshaw Yojana 2024 Overview 

योजनाचे नावमहाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना 2024
उद्देशमहिलांसाठी रोजगार निर्माण होण्यासाठी
कोणी सुरु केलेमहाराष्ट्र सरकारने
विभागमहिला आणि बालकल्याण मंत्रालय
लाभर्तीमहाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी
शहरांची संख्या10
रिक्षांची संख्या5000
अधिकृत वेबसाइटलवकरच येईल

पिंक ई-रिक्षा योजनाचे उद्देश | Pink E-Rickshaw Scheme Objective

महाराष्ट्र सरकार Pink E-Rickshaw योजना ही क्रांतिकारक प्रकल्प राज्यातील महिलांना आपल्या कुटुंबासाठी आर्थिक मदत मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरु करणार आहे. ज्यामुळे महिलांच्या घरात आर्थिक मदतीसाठी योगदान देऊन घर योग्यरित्या चालविण्यात त्यांना चालना मिळेल. त्याचसोबत महिलांना नोकरीची संधी मिळेल आणि त्यांना आत्मनिर्भर राहण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. अशाप्रकारे राज्यामध्ये महिला प्रवासींना सुद्धा सुरक्षा प्राप्त होईल.

पिंक ई-रिक्षा योजना 2024 चे फायदे व वैशिष्ट्ये | Pink E-Rickshaw Scheme Benefits & Features 

  • महाराष्ट्रातील बेरोजगार वर्गातील महिलांना व त्यांच्या कुटुंबियांना गुलाबी ई-रिक्षा योजना मार्फत रोजगार प्राप्त होणार. 
  • या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 10 वेगवेगळ्या शहरांमध्ये गुलाबी रिक्षांचे वाटप होणार. 
  • 2024 मध्ये सरकारच्या माध्यमातून 5000 गुलाबी रिक्षा विविध शहरात दिल्या जातील. 
  • या योजने अंतर्गत स्त्रियांना रिक्षा विकत घेताना फक्त 10% रक्कम भरून 20% सबसिडीचा लाभ घेता येणार. 
  • त्याचसोबत ई-रिक्षासाठी 70% लोन सरकारतर्फे बँकेच्या माध्यमातून प्राप्त होणार. 
  • महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या मते शहरामधील महिलांचा प्रवास सुरक्षितरित्या पार पडेल.
  • शहरांमधील वाढत्या प्रदूषणामध्ये ई-रिक्षा ही पर्यावरणासाठी उत्तम ठरेल. 
  • ई-रिक्षा असल्या कारणामुळे वाहतुकीला लागणाऱ्या तेलाची बचत होऊन खर्च सुद्धा कमी होईल.
  • या योजने अंतर्गत महिला प्रतिदिन सरासरी 300 ते 400 रुपये पेक्षा जास्त कमाई करू शकतात. 
  • कुटुंबातील मुलांचा होणारा शिक्षणाचा खर्च आणि घर खर्च या योजनेच्या माध्यमातून त्या पूर्ण करू शकतात. 
  • स्त्रिया आत्मनिर्भर राहून आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत देऊन समाजामध्ये आत्मविश्वासाने व्यवसाय करू शकतात. 
  • या योजनेमार्फ़त निवडलेल्या प्रत्येकी जिल्ह्यांमध्ये 500 गुलाबी ई-रिक्षा उपलब्द केले जातील. 
  • राज्य सरकारने अंतर्गत महिला व बालविकास यासाठी वार्षिक योजना अंतर्गत 3 टक्के निधी राखीव ठेवले आहेत. 
  • प्रवास करताना महिलेचे छळ व गैरवर्तन होऊ नये यासाठी गुलाबी रिक्षामध्ये पॅनिक बटन आणि GPS ट्रॅकिंग सुद्धा लावण्यात येणार आहे. 

Pink E-Rickshaw Yojana 2024 under 10 cities operate

2024 मध्ये महाराष्ट्र सरकारतर्फे गुलाबी ई-रिक्षा योजने अंतर्गत खाली दिलेल्या राज्यातील या महत्त्वाच्या 10 शहरांमध्ये  प्रायोगिक तत्त्वांवर रिक्षा वाटप होणार:

1. मुंबई (Mumbai)

2. ठाणे (Thane)

3. नवी मुंबई (Navi Mumbai)

4. पुणे (Pune)

5. नागपूर (Nagpur) 

6. पनवेल (Panvel)

7. मुंबई उपनगर (Mumbai Suburbs)

8. पिंपरी-चिंचवड (Pimpari-chinchwad) 

9. नाशिक (Nashik)

10. छत्रपती संभाजी नगर (Chhatrapati Sambhaji Nagar) 

पिंक ई-रिक्षा योजना 2024 साठी पात्रता | Pink E-Rickshaw Scheme Eligibility 

  • या योजनेमध्ये फक्त महाराष्ट्र राज्यातील महिला वर्ग अर्ज करू शकतो. 
  • या योजने अंतर्गत अर्ज करण्यासाठी महिला स्थायिक निवासी असणे आवश्यक आहे. 
  • अर्ज करण्याऱ्या महिलेच्या कुटुंबात वार्षिक उत्पन्न 2 लाखापेक्षा अधिक नसले पाहिजे. 
  • ई-रिक्षा योजना संबंधीत लागणारे आवश्यक कागदपत्रे असणे महत्त्वाचे आहे.
  • कायदेशीर ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. 
  • या योजनेच्या अंतर्गत स्त्रियांना वाहन चालवता येणे गरजेचे आहे. 

महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना 2024 साठी आवश्यक कागदपत्रे | Maharashtra E-Rickshaw Yojana 2024 Required Documents

  • आधारकार्ड (Aadhar Card)
  • उत्पनाचा दाखला (Income Proof)
  • मोबाईल नंबर (Mobile Number)
  • बँक पासबुक (Bank Passbook)
  • पासपोर्ट साईज फोटो (Passport Size Photo)
  • ई-मेल आयडी (E-Mail ID)
  • निवास प्रमाणपत्र (Address Proof)

महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना सबसिडी | Pink E-Rickshaw Scheme Subsidy 

गुलाबी ई-रिक्षा योजनेमध्ये लाभार्थी महिलांना रिक्षाच्या किंमतीनुसार फक्त 10% रक्कम स्वतः खर्च करावी लागेल. या योजने अंतर्गत सरकार बँकांच्या साहाय्याने 70% कर्ज उपलब्ध करून देणार आहे. त्याच्याशिवाय राज्य सरकार महिलांना रिक्षा विकत घेण्यासाठी आर्थिक पाठिंबा म्हणून 20% सबसिडी प्रदान करणार आहे.

महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना 2024 ऑनलाइन अर्ज | Pink E-Rickshaw Yojana 2024 Apply Online

या योजनांबद्दल महाराष्ट्र सरकारमध्ये नुकतीच चर्चा झाली आहे. महाराष्ट्र ई-रिक्षा योजनामध्ये अर्ज करण्यासाठी सरकारने अधिकृत वेबसाइटची घोषणा सध्या तरी केली नाही. तुम्हाला अर्ज करण्याच्या प्रक्रियेसाठी थोडे दिवस थांबावे लागेल. जेव्हा सरकार याबद्दल घोषणा करतील आणि अर्जासाठी वेबसाइटची सुरुवात करतील तेव्हा आम्ही तुम्हाला लेखामार्फत अपडेट करू. त्यानंतर तुम्ही योग्यरित्या अर्ज करून या योजनेचे लाभ घेऊ शकता.  

अबोली रिक्षा योजनेला बाकीच्या राज्यात मर्यादित यश 

अबोली रिक्षा योजनाची सुरुवात गोवा, लखनऊ आणि सुरत यासारख्या ठिकाणी झाली आहे. महिलांसाठी रिक्षा चालवणे ही नवीन गोष्टी नसून महाराष्ट्रात राज्य सरकारने अबोली रिक्षा योजना लागू केली होती. यामध्ये सरकार बँकतर्फे वाहनासाठी 85 % कर्ज कव्हर करत होते, परंतु लाभार्थींना वाहन खर्चाच्या 15% योगदान द्यावे लागायचे. 

या कारणांमुळे अबोली रिक्षा योजना अयशस्वी ठरली.अयशस्वी होण्यामागचे कारण पडताळणी केल्यानंतर सरकारच्या असे ध्यानी आले कि, या प्रकारच्या योजनेसोबत सरकारकडून आर्थिक पाठिंबा न दिल्यामुळे ही योजना अयशस्वी झाली. 

निष्कर्ष 

Maharashtra Pink E-Rickshaw Yojana बद्दल आम्ही या लेखात सुरुवात, उद्देश, फायदे, वैशिष्ट्ये, पात्रता, महत्त्वाचे कागदपत्रे, अर्ज पद्धत आणि लागू होणारे ठिकाणांबद्दल संपूर्ण माहिती सोप्या आणि सरळ रीतीने सांगितली आहे. ही योजना महिलांना आर्थिक मदत तर करतेच आहे आणि त्याचसोबत त्यांना आत्मनिर्भर राहून परस्पर स्वतःचा व्यवसाय सुरु करून स्वतःच्या पायावर उभे राहण्याससुद्धा मदत करणार आहे.  

या योजना अंतर्गत तुम्हाला सहभागी होण्यासाठी आम्ही दिलेली आवश्यक कागदपत्रे जमा करून ठेवणे. वाहन चालविण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स काढून ठेवा. सुरुवातीला भरावी लागणारी 10% रक्कम अंदाजे जमा करून ठेवा. 

या योजनेबद्दल अपडेटसाठी आम्हाला subscribe नक्की करून ठेवा किंवा WhatsApp ग्रुपला जॉईन करून ठेवा. जेणेकरून अपडेट आल्यावर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण करू शकता.

FAQs

पिंक ई-रिक्षा स्कीम काय आहे? 

गुलाबी ई-रिक्षा स्कीम ही महाराष्ट्रातील गरीब वर्गातील महिलांना रिक्षा वाटप करून रोजगार प्राप्त करण्यासाठी चालू केलेली योजना आहे. 

पिंक ई-रिक्षा कोणत्या जिल्ह्यात दिले जातील? 

गुलाबी ई-रिक्षा हे महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, नवी-मुंबई, पुणे, नागपूर, पनवेल, मुंबई-उपनगर,पिंपरी चिंचवड, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या दहा जिल्ह्यात उपलब्द केले जाणार आहे. 

महाराष्ट्र ई-रिक्षा योजना कोणती कागदपत्रे लागणार आहेत? 

महाराष्ट्र गुलाबी ई-रिक्षा योजनामध्ये आधारकार्ड, उत्पनाचा दाखला, मोबाईल नंबर, बँक पासबुक, पासपोर्ट साइज फोटो, ई-मेल आयडी आणि पत्त्याचा पुरावा हे सगळे कागदपत्रे आवश्यक आहेत. 

पिंक ई-रिक्षा योजनामध्ये महिलांना किती टक्के सबसिडी मिळणार आहे? 

महाराष्ट्र राज्य सरकार तर्फे गुलाबी ई-रिक्षा योजनामध्ये महिलांना 20% टक्के सबसिडी आणि 70% कर्ज सुद्धा देण्यात येणार आहे. 

अबोली रिक्षा योजना अयशस्वी का ठरली? 

अबोली रिक्षा योजनामध्ये सरकारतर्फे काही आर्थिक मदत न मिळत असल्यामुळे अयशस्वी ठरली. 

अबोली रिक्षा योजना ही कोणत्या शहरांमध्ये सुरु करण्यात आली होती?

अबोली रिक्षा योजना ही सुरत, लखनऊ आणि गोआ यांसारख्या शहरांमध्ये सुरु करण्यात आली होती. 

पुढे वाचा: