PM Vishwakarma Certificate Download: पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र कसे डाउनलोड करावे? जाणून घ्या प्रोसेस

PM Vishwakarma Certificate Download: या आर्टिकलमध्ये आपण पीएम विश्वकर्मा योजना अंतर्गत सरकारतर्फे देण्यात येणारे प्रमाणपत्र आणि आयडी कार्ड कसे डाउनलोड करावे? हे पाहणार आहोत.

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

PM Vishwakarma Yojana अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या माध्यमातून ट्रेनिंग सर्टिफिकेट आणि आयडी कार्ड प्रदान केले जाते. त्याचसोबत ज्या क्षेत्रात प्रशिक्षण पूर्ण केले आहे, त्यामध्ये व्यवसाय करताना लागणाऱ्या टूलकिटसाठी 15,000 रुपये दिले जातात. त्याचप्रकारे 1 लाखांपर्यंत कर्ज सुद्धा शासनातर्फे उपलब्ध करून दिले जाते. 

वाचा: PM Vishwakarma Yojana Online Apply CSC

ज्या लाभार्थ्यांना प्रशिक्षण घेतल्यानंतर नोकरीसाठी अर्ज करायचा आहे आणि त्यांना प्रशिक्षण प्रमाणपत्र सादर करायचा असल्यास आम्ही लेखामध्ये दिलेल्या प्रकिया फॉलो करून सोप्या पद्धतीने सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता.  

  • सर्वात प्रथम तुम्हाला पीएम विश्वकर्मा योजनाच्या Official Website मध्ये यायचे आहे. 
  • त्यानंतर डॅशबोर्डमध्ये Login चा टॅब दिला असेल, त्यावर क्लिक करणे. 
  • पुढे पहिल्या ऑपशनमध्ये Applicant/Beneficiary Login चा पर्याय असेल, त्यावर क्लिक करणे. 
  • तुमच्या समोर स्क्रीन उघडून येईल, त्यामध्ये तुमचा अर्ज करताना रजिस्टर केलेला मोबाईल नंबर टाकणे. 
  • तुम्हाला कॅप्चा कोड स्क्रीनवर दाखवला असेल तो भरून Login बटन सिलेक्ट करणे. 
  • त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल, त्याला बॉक्समध्ये भरून Continue करणे. 
  • अशा पद्धतीने तुम्ही विश्वकर्मा योजनाच्या पोर्टलमध्ये लॉगिन झाला असाल. 
  • त्याच्या डॅशबोर्डमध्ये अर्जाची स्थिती, टूलकिट घेण्यासाठी पर्याय आणि कौशल्य ट्रेनिंगचा ऑप्शन दिला आहे. 
  • डॅशबोर्डमध्ये खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला Download PM Vishwakarma Certificate आणि ID Card चा पर्याय दिसेल. 
  • त्यामध्ये क्लिक केल्यावर प्रमाणपत्राचे पीडीफ उघडून येईल ते डाउनलोड करून घेणे. 
  • त्याचप्रकारे आयडीकार्ड सुद्धा उघडून डाउनलोड करू शकता. 
  • या प्रकारे तुमचे विश्वकर्मा प्रमाणपत्र डाउनलोड यशस्वीरित्या पूर्ण झालेले आहे.
  • तुम्ही प्रमाणपत्र डाउनलोड करून घेतल्यानंतर त्याची फ्रेम तयार करून सुद्धा तुमच्या ऑफिस किंवा जागेमध्ये लावू शकता. 

Read More: