PM Vishwakarma Yojana Online Apply CSC 2024: सीएससीच्या माध्यमातून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना अंतर्गत कसे ऑनलाईन अर्ज करायचे? याबद्दल सविस्तर प्रकिया जाणून घेण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे योजनेचा फॉर्म कसा भरायचा? आणि त्यामध्ये कशा पद्धतीने कागदपत्रे अपलोड करावी? हे देखील लेखामधून पाहायला मिळेल.
भारत देशामधील असंघटित कामगारांना व्यवसाय प्रशिक्षण व त्यांना आर्थिक लाभ देण्यासाठी PM Vishwakarma Yojana ची सुरुवात करण्यात आली होती. असंघटित कामगारांना योजनेच्या माध्यमातून 1 लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते आणि त्यामध्ये फक्त 5% व्याजदर लाभार्थ्यांकडून घेतला जातो. त्याचसोबत त्यांना व्यवसाय सुरु करताना लागणाऱ्या किटसाठी 15,000 रुपये आर्थिक स्वरूपात वेतनसुद्धा देण्यात येते.
या लेखामध्ये असंघटित कामगारांना लाभ देण्यासाठी CSC च्या माध्यमातून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनामध्ये अर्ज कशा पद्धतीने करायचा? योजनेचा संपूर्ण फॉर्म स्टेप बाय स्टेप भरण्यासाठी काय करावे लागणार? आणि योजनेमध्ये लाभार्थ्यांचे कोणती कागदपत्रे लागणार? आणि कसे अपलोड करायचे? याबद्दल सविस्तर माहिती आर्टिकलमध्ये देण्यात आलेली आहे ती शेवटपर्यंत बघा.
PM Vishwakarma Yojana Details in Marathi
योजनेचे नाव काय | प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना |
विभाग | सूक्ष्म, लघु आणि मध्यम मंत्रालय, भारत सरकार |
कधी स्थापना झाली | 17 सप्टेंबर, 2023 रोजी |
रजिस्ट्रेशनचे अंतिम वर्ष | 2028 |
अर्ज प्रकिया | ऑनलाईन |
रजिस्ट्रेशन माध्यम | CSC पोर्टलद्वारे |
लाभार्थी | भारतामधील असंघटित वर्गामधील कामगार |
लाभ | 1 लाख कर्ज आणि 15 हजार आर्थिक वेतन |
हेल्पलाईन संपर्क | 022-22617641/42/43 |
PM Vishwakarma Yojana Documents List
- ग्राहकांचे आधार कार्ड व पॅनकार्ड
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- कुटुंबाचे पुरावे
- बँक खात्याची माहिती
- असंघटित समुदायातील असल्याचे पुरावे
- राहत्या ठिकाणाचा पत्ता
PM Vishwakarma Yojana Registration 2024
केंद्र सरकारतर्फे सामान्य नागरिकांसाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरु करण्यात आलेले नाही. जे कामगार योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांना सामान्य सेवा केंद्रामध्ये जाऊन भेट द्यावी लागेल.
ज्या नागरिकांनी CSC पोर्टल अंतर्गत रजिस्टर केले आहे, त्यांनी ग्राहकांचा फॉर्म कसा भरायचा आहे? त्याची नोंदणी प्रकिया खालीलप्रमाणे दिलेली आहे ती स्टेप बाय स्टेप फॉलो करावी लागणार आहे.
PM Vishwakarma Yojana CSC Login करणे
- सुरुवातीला PM Vishwakarma Yojana Official Website तुम्हाला डेस्कटॉपमध्ये जाऊन उघडायची आहे.
- वेबसाइटच्या डॅशबोर्डमध्ये गेल्यानंतर तुम्हाला Login चा पर्याय दिसेल, तो सिलेक्ट करणे.
- त्यानंतर तुमच्या समोर तीन प्रकार स्क्रोल होऊन येईल, त्यामधील CSC Register Artisans च्या पर्यायामध्ये जाणे.
- पुढे तुम्ही Digital Seva च्या पोर्टलमध्ये प्रवेश कराल.
- त्या पोर्टलमधील स्क्रिनवर तुम्ही रजिस्टर केलेले युजरनेम किंवा ई-मेल आयडी टाकणे.
- त्यानंतर पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून साइनइन करून घेणे.
- पोर्टलमध्ये लॉगिन झाल्यानंतर तुमच्या समोर रजिस्ट्रेशनसाठी स्क्रीन उघडेल.
ग्राहकाचे आधारकार्डप्रमाणे वेरिफिकेशन प्रकिया पूर्ण करणे
- पोर्टलमध्ये लॉगिन केल्यावर तुमच्या समोर प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनाचा फॉर्म उघडून येईल.
- त्यामध्ये पहिला प्रश्न विचारला असेल, ते म्हणजे अर्जदाराच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरीमध्ये आहेत का? जर असेल तर अर्ज करण्यास पात्र नाही.
- जर अर्जदाराच्या कुटुंबामधील कोणी नसल्यास No वरती टिक करून Continue बटनावर क्लिक करा.
- अर्ज करणाऱ्या व्यक्तीने PMEGP, PM SVANidhi आणि Mudra Yojana अंतर्गत लाभ घेतला आहे का? नसल्यास नो वर टिक करून पुढे जाणे.
- त्यानंतर ग्राहकाचा आधार वेरिफिकेशन फॉर्म उघडून येईल.
- त्यामध्ये त्यांचे आधारकार्ड सोबत लिंक असलेले मोबाईल नंबर भरा.
- त्याचसोबत आधारकार्डवरील 12 अंकी नंबर सुद्धा भरून घेणे.
- पुढे कॅप्चा कोड टाकून प्रायव्हसी पॉलिसीच्या बॉक्सला टिकमार्क करून Continue करा.
- त्यानंतर ग्राहकाच्या मोबाईल नंबरवरती 6 अंकी ओटीपी आला असेल तो भरून पुढे जाणे.
- पुन्हा बायोमेट्रिक वेरीफिकेशन प्रोसेस उघडेल ती पूर्ण करून घेणे.
PM Vishwakarma Yojana साठी Personal Details देणे
- प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनाच्या फॉर्ममध्ये ग्राहकाची वैयक्तिक माहिती देणे.
- त्यामध्ये अर्जदाराचे आणि वडील/जोडीदाराचे संपूर्ण नाव भरून घेणे.
- पुढे त्यांचे जन्म दिनांक आणि लिंग सिलेक्ट करणे.
- त्या व्यक्तीचे लग्नाचे स्टेटस सांगणे, त्यामध्ये ते Unmarried, Married, Widow आणि Divorcee जे काही असेल ते निवडणे.
- ग्राहक General, SC, ST किंवा OBC यामधील कोणत्या वर्गातील आहे? त्याची कॅटेगरी निवडा.
- तसेच ग्राहक दिव्यांग आहेत का? आणि असल्यास त्याचे प्रकार निवडा. तसेच योजनेमध्ये एकाच कुटुंबातील एकच व्यक्ती अर्ज करू शकतो त्याची सूचना द्या.
- जर व्यक्ती दिव्यांग नसतील तर No च्या पर्यायाला क्लिक करणे.
- ग्राहक राहत्या ठिकाणाच्या राज्यात व जिल्ह्यामध्ये व्यवसाय करत असतील, तर Yes अथवा No करा.
- तसेच अर्ज करणारे व्यक्ती Minority वर्गात येत असतील येस अथवा नसतील येत तर नो करा.
- त्यानंतर ग्राहकाचे मोबाईल नंबर, आधार आणि पॅनकार्ड क्रमांक भरून घेणे. यामध्ये पॅनकार्ड नंबर पर्यायी आहे तो नाही दिला तरी चालेल.
- त्यानंतर डॅशबोर्डमध्ये खाली स्क्रोल केल्यानंतर कुटुंबाची माहिती विचारली असेल ती भरून घेणे.
- सुरुवातीला कुटुंबाच्या माहितीमध्ये रेशनकार्ड नंबर हा पर्यायी विचारला आहे, ज्यांच्याजवळ असेल त्यांनी तो भरून घ्यावा.
- पुढे Add Row च्या बटनावर क्लिक करून घरातील सदस्यांची माहिती द्या.
- त्यामध्ये सदस्यांचे नाव, ग्राहकांसोबतचे नाते आणि त्या व्यक्तींचे आधार नंबर भरून घेणे.
- त्यानंतर ग्राहकांचा Current Address आधारप्रमाणे असेल तर पहिले बॉक्सला टिक करा.
- जर आधारप्रमाणे नसल्यास Other वर टिक करून खालील आलेली सर्व माहिती भरा.
- त्यामध्ये ग्राहकांचा राहत्या ठिकाणाचा पूर्ण पत्ता, राज्य, जिल्हा आणि पिनकोड टाकून घ्या.
- त्याच्यामधे अर्ज करणारी व्यक्ती ग्रामपंचायत अंतर्गत येत असल्यास Yes वर टिक करणे अथवा No सिलेक्ट करणे.
- जर ती व्यक्ती ग्रामपंचायत अंतर्गत येत असतील तर ब्लॉक आणि ग्रामपंचायतीचे नाव निवडणे.
- तसेच शहरी भागातील व्यक्ती असतील, नो ची निवड करून त्या क्षेत्रामधील म्युनिसिपालटी सिलेक्ट करा.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना अंतर्गत व्यवसायची माहिती पुरविणे
- डॅशबोर्डमध्ये खाली आल्यानंतर ग्राहक कोणत्या क्षेत्रात व्यवसाय करत आहे किंवा त्याची कला कोणती आहे? त्याची निवड सुरुवातीमध्ये दिलेल्या यादीनुसार करणे.
- त्यानंतर Sub Category विचारली असेल ती भरणे किंवा असेच राहून दिले तरी चालेल.
- पुढे Declaration साठी बॉक्स दिसेल त्यावर टिकमार्क करणे आवश्यक आहे.
- ग्राहक ज्या ठिकाणी व्यवसाय करत आहेत, ते आधारप्रमाणे असल्यास पहिले ऑपशन निवडा.
- व्यवसायाचा पत्ता वेगळ्या ठिकाणी असल्यास Other मध्ये जाणे.
- त्यामध्ये व्यवसायच्या ठिकाणाचा पूर्ण पत्ता भरून राज्य व जिल्ह्याची निवड करणे.
- त्यानंतर भरलेली संपूर्ण माहिती तपासून Save करा आणि Next बटनावर क्लिक करून पुढच्या प्रोसेसला जावा.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनासाठी Credit Support Information भरणे
- ज्या ग्राहकाला प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना अंतर्गत आर्थिक लाभ घ्यायचा आहे, त्याची Saving Bank Details देणे.
- त्यामध्ये सुरुवातीला अर्जदाराच्या बँकेचे नाव, त्यांचे आयएफसी कोड व शाखेचे नाव भरणे.
- त्यानंतर ग्राहकाचे बँक खात्याचे नंबर दोन वेळा सादर करावे लागेल.
- ग्राहकाला व्यवसाय करण्यासाठी मोफत कर्ज हवे असल्यास Credit Support च्या बटनावर Yes करा.
- ग्राहकांना किती कर्ज योजनेच्या माध्यमातून पाहिजे आहे? त्याची नोंद करून घेणे.
- त्यापुढे अर्जदारांना त्यांच्या बँकेतुन कर्ज घ्यायचे असल्यास तीच बँक निवडा.
- जर इतर बँकेच्यामार्फत कर्जासाठी अर्ज करायचे असल्यास त्यांचे नाव व ब्रांच निवडावी लागेल.
- कर्ज ग्राहकांना कोणत्या उद्देशाने पाहिजे? यासाठी तीन पर्याय दिले असतील, त्याप्रमाणे माहिती वाचून टिकमार्क करणे.
- अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या नावाने कर्ज घेतले आहे आणि ते चालू देखील आहे, त्याची माहिती देऊ शकता किंवा तो पर्याय सोडून देणे.
- ग्राहकाकडे डिजिटल पेमेंट सुविधा उपलब्ध आहे का? त्याची खात्री करून माहिती भरा आणि Save चे बटन दाबा.
ग्राहकांना प्रधानमंत्री योजनेचे फायदे सांगा
- बँकेची माहिती भरल्यानंतर स्कीम अंतर्गत कोणकोणते फायदे केंद्र सरकार देते? त्याची माहिती स्क्रीनवर दिसेल ती ग्राहकांना सांगणे.
- त्यामध्ये PM Vishwakarma Yojana अंतर्गत Skill Training 5 ते 15 दिवसांची दिली जाते.
- त्याचसोबत Tool Kit घेण्यासाठी 15,000 रुपये Grant स्वरूपात लाभार्थ्यांना दिला जातो.
- पुढे केंद्र सरकारच्या माध्यमातून Marketing Support दिला जातो तो ग्राहकांना हवे असल्यास टिकमार्क करून नेक्स्ट बटनावर क्लिक करणे.
PM Vishwakarma Yojana Registration Form सबमिट करणे
- डॅशबोर्डमध्ये Declaration Details आलेली असेल तर ती ग्राहकांना वाचून दाखविणे.
- ग्राहकांकडून सहमती घेतल्यानंतर टिकमार्क करून सबमिट बटन दाबणे.
- प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना एप्लिकेशन सबमिट होईल.
- एप्लिकेशन नंबर मिळेल तो ग्राहकांना देऊन Done करणे.
- त्यानंतर पुढे गेल्यावर स्टेटस दिसेल आणि त्यामध्ये एप्लिकेशनची प्रिंट मिळेल ती डाउनलोड करून ग्राहकांना द्या.
- प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनामध्ये अर्ज पूर्ण झालेला आहे.
- ग्राहकांना मोबाईलवर कॉल किंवा SMS द्वारे सरकारी कार्यालयाकडून कळविण्यात येईल.
How to Check PM Vishwakarma Yojana Application Status?
अर्ज केल्यानंतर प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनामध्ये ग्राहकांचे स्टेटस पाहण्यासाठी खालीलप्रमाणे दिलेल्या प्रकिया फॉलो करू शकता.
- योजनेची स्थिती ग्राहकांना दाखविण्यासाठी पुन्हा PM Vishwakarma च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यायची आहे.
- त्यानंतर डॅशबोर्डमधील लॉगिन पर्यायावर क्लिक करा.
- त्यामध्ये Applicant/Beneficiary Login असा ऑपशन मिळेल, त्यामध्ये प्रवेश करणे.
- ग्राहकाचा रजिस्टर मोबाईल नंबर टाकणे.
- पुढे कॅप्चा कोड दिला असेल तो भरून लॉगिन करणे.
- लॉगिन झाल्यावर ओटीपी येईल तो भरून एप्लिकेशनची स्थिती पाहू शकता.