PM Kusum Solar Subsidy Yojana 2024: केंद्र सरकारतर्फे पीएम कुसुम सोलर सबसिडी योजनाची सुरुवात कृषी क्षेत्रामधील आपल्या अन्नदाता शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींना दूर करण्यासाठी केली गेली आहे.
या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना आपल्या शेतात सोलर पंप लावण्यासाठी सबसिडी दिली जाणार. या योजनेच्या माध्यमातून सरकार तर्फे शेतकऱ्यांना 2 हॉर्स पावर पासून ते 5 हॉर्स पावरच्या सोलर पंपावर 90% सबसिडी दिले जाणार.
केंद्र सरकारतर्फे सौर अनुदान योजनामध्ये अर्ज करण्यासाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून 35 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ मिळावा असे ध्येय सरकारने ठेवले आहे. आता शेतकरी बांधवाना सिंचन पंपसाठी इंधन किंवा वीज वापरायची गरज पडणार नाही. कारण कुसुम सोलर सबसिडी योजनाच्या माध्यमातून अर्ज केल्यावर शेतकरी सोलर पंपांचा फायदा घेऊ शकतात.
जर तुम्ही शेतकरी आहात आणि या योजना अंतर्गत तुमच्या शेतामध्ये सोलर पंप लावण्यासाठी इच्छुक असाल, तर आमच्या या लेखातून तुम्हाला पीएम कुसुम सोलर सब्सिडी योजना काय आहे? त्यांचे उद्देश, फायदे, पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज कसा करायचा? या सगळ्यांची संपूर्ण माहिती प्राप्त होईल. या योजनेचा योग्यरीत्या लाभ घेण्यासाठी हा लेख लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहा.
PM Kusum Solar Subsidy Yojana in Marathi
पीएम कुसुमचे पूर्ण नाव म्हणजेच प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवंम उत्थान महाभियान. पीएम कुसुम सोलर सब्सिडी योजना अंतर्गत आपल्या देशातील शेतकरी बांधवाना शेतामध्ये सोलर पंप लावण्यासाठी 90% सबसिडी केंद्र सरकार देणार आणि फक्त 10% खर्च स्वतः शेतकऱ्यांनी करायचा.
या योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये जे पंप डिझेल आणि पेट्रोलवर चालत आहेत, अशा 17.5 लाख पंपांना सोलर पॅनलच्या मदतीने चालविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना या सौर पंपामुळे डिझेल आणि पेट्रोलवर चालणाऱ्या पंपामधून इंधन आणि वीज यासाठी येणारा खर्च वाचविण्यात सूट मिळेल.
PM Kusum Solar Subsidy Yojana 2024 Overview
योजनाचे नाव | पीएम कुसुम सोलर सबसिडी योजना |
सुरु कोणी केली | केंद्र आणि राज्य सरकारने |
उद्देश | 35 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना सोलर पंप पुरवणे |
विभाग | Ministry of New and Renewable Energy |
लाभार्थी | भारतातील शेतकरी |
अर्ज पद्धत | ऑनलाइन |
अधिकृत वेबसाइट | pmkusum.mnre.gov.in |
पीएम कुसुम सौर सबसिडी योजनाचे उद्देश | Objectives
आपल्या भारत देशामध्ये काही असे राज्य आहेत, जिथे शेत जमीन सुकी पडली आहे. त्याचसोबत काही शेतकरी बांधवांकडे योग्यरित्या वीज पुरवठा होत नाही. शिवाय पंपासाठी लागणाऱ्या इंधनाचा आणि विजेचा येणारा खर्च यामुळे शेतकऱ्यांना भरपूर प्रमाणात नुकसान सोसावे लागते. याच गोष्टींवरती केंद्र सरकारने लक्ष केंद्रित करून प्रधानमंत्री कुसुम सौर सबसिडी योजना सुरु केली आहे.
या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक राज्यातील शेतकऱ्यांना फ्रीमध्ये वीज उपलब्ध होऊन शेतीसाठी सिंचन योग्यरित्या होण्यासाठी मदत मिळेल. त्याप्रमाणे, शेतकऱ्यांना डबल फायदा होऊन उत्पन्न वाढीसाठी मदत होईल.
PM Kusum Solar Subsidy Yojana चे कॉम्पोनेन्ट्स
प्रधानमंत्री कुसुम सौर सब्सिडी योजनामध्ये मुख्य रूपामध्ये 4 कॉम्पोनेन्ट्सचा समावेश करण्यात आले, ते पुढीलप्रमाणे दिलेले आहेत.
सौर पंप वाटप:
यामध्ये केंद्र सरकारची वीज विभागासोबत मिळून प्रथम टप्प्यात लाभार्थींना सौर ऊर्जा पंप वाटप करण्याची महत्त्वपूर्ण भूमिका असेल.
सौर ऊर्जा कारखाने निर्माण करणे:
केंद्र सरकार काही मात्रांमध्ये विजेचे उत्पादन करण्यासाठी सौर ऊर्जा कारखान्यांची स्थापना करणार आहेत.
ट्यूबवेल कनेक्शन करण्यात येणार:
त्याचप्रमाणे, काही मात्रामध्ये वीज निर्माण करून उत्पादन करण्यासाठी ट्यूबवेल कनेक्शन सुद्धा प्रदान करण्यात येणार.
आधुनिकीकरण करण्यात येणार:
शेतकरी जे आतापर्यंत वापरत असलेले इंधनावर चालणारे सिंचन पंप त्या पंपांना सौर पंपांमध्ये बदलण्यात येणार आहे.
पीएम कुसुम सौर सबसिडी योजनासाठी पात्रता | Eligibility
- भारत देशामधील शेतकरी
- शेतकरी गट
- शेतकरी उत्पादक संघटना
- सहकारी संस्था
- पंचायत
- पाणी ग्राहक संघटना
पीएम कुसुम सौर सबसिडी योजनाचे फायदे | Benefits
- या योजनांचा फायदा भारत देशामधील सगळ्या शेतकऱ्यांना घेता येणार.
- ज्या शेतकरींना आपल्या शेतात सोलर पंपची सुविधा हवी आहे, मुख्य करून त्यांना ही योजना फायदेशीर ठरेल.
- केंद्र सरकार या योजने मार्फत शेतकऱ्यांना सोलर पंप घेण्यासाठी 90% सबसिडी देणार आहेत.
- यामध्ये शेतकरीला फक्त 10% खर्च स्वतः करून सवलतीच्या दरामध्ये सौर पंप प्राप्त करता येणार.
- पहिल्या टप्प्यामध्ये इंधन जसे डिझेल व पेट्रोलवर चालणारे 17.5 सिंचन पंप बदली करून सौर ऊर्जावर चालवले जातील.
- या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचा इंधनांमधून व वीजबिलामधून होणारा खर्च बचत करण्यात मदत होते.
- देशभरात शेतीसाठी वापरले जाणारे इंधन कमी करून पर्यावरणीय आणि इकॉनॉमिकल फायदा सुद्धा भारताला होईल.
- या योजनेच्या मदतीने मेगावॅट जास्त प्रमाणात वीज उत्पादन करण्यात मदत होईल.
- त्याचसोबत 10 लाख ग्रीड सोबत जोडलेल्या शेती पंपांचे सौरीकरण करण्यात येणार.
- ज्या राज्यातील शेतकरींना वीज 24 तास मिळत नाही, त्यांनाही या योजनेचा फायदा घेऊन 24 तास वीज वापरता येणार.
- या योजनेच्या मार्फत देशभरातील गरीब व आर्थिकदृष्टया मागासलेल्या शेतकरी वर्गाला योग्य सिंचन व्यवस्था उपलब्ध करून मिळणार.
पीएम कुसुम सोलर सबसिडी योजनासाठी आवश्यक कागदपत्रे | Required Documents
- आधारकार्ड
- रेशन कार्ड
- बँक खात्याचे पासबुक
- पासपोर्ट साइज फोटो
- मोबाईल नंबर
- अधिकृतता पत्र
- रजिस्ट्रेशनची कॉपी
- पत्त्याचा पुरावा
- जमीन नोंदणीचे कागदपत्र
पीएम कुसुम सोलर सबसिडी योजना अर्जाची शुल्क | Application Fee
ज्या शेतकऱ्यांना आपल्या जमिनीवर सौर पंप लावायचा असेल, प्रधानमंत्री कुसुम सोलर सबसिडी योजना अंतर्गत अर्जाची पेमेंट ही सौर ऊर्जा संयंत्रासाठी प्रति मेगावॅट 5000 रुपये त्यासोबत जीएसटी सुद्धा भरावी लागेल. हे पेमेंट राजस्थानचे अक्षय ऊर्जा निगम संचालक यांच्या नावाने डिमांड ड्राफ्टच्या स्वरूपामध्ये होणार. अर्जाची शुल्क हे 0.5 मेगावॅट ते 2 मेगावॅटच्या प्रकारामध्ये मोडते. ते खालील प्रमाणे –
मेगावॅट | अर्जाची शुल्क |
0.5 मेगावॅट | 2,500 रुपये + जीएसटी |
1 मेगावॅट | 5,000 रुपये + जीएसटी |
1.5 मेगावॅट | 7,500 रुपये + जीएसटी |
2 मेगावॅट | 10,000 रुपये + जीएसटी |
PM Kusum Solar Subsidy Yojana मध्ये अर्ज करण्यासाठी प्रकिया
ज्या शेतकऱ्यांना पीएम कुसुम सोलर सबसिडी योजना अंतर्गत ऑनलाइन अर्ज करायचे असल्यास आम्ही दिलेल्या प्रकिया स्टेप बाय स्टेप फॉलो करा.
- सगळ्यात आधी पीएम कुसुम सोलर सबसिडी योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जाणे.
- अधिकृत वेबसाइट उघडल्यानंतर तुमच्या समोर होमपेज ओपन होईल, त्यामध्ये आपले राज्य निवडून घेणे.
- राज्य निवडून झाल्यावर Online Registration असा पर्याय तुम्हाला दिसेल त्यावर क्लिक करणे.
- ऑनलाइन रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला योजनेच्या अर्जाचा फॉर्म उघडेल.
- त्या फॉर्ममध्ये तुमचे नाव, पूर्ण पत्ता, आधार क्रमांक, मोबाईल नंबर टाकून घेणे.
- ही सगळी माहिती भरल्यानंतर तुमचे आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून त्यामध्ये अपलोड करून घेणे.
- सगळे आवश्यक कागदपत्रे अपलोड करून झाल्यावर Submit बटनावर क्लिक करणे.
- त्यानंतर फॉर्म आणि कागदपत्रे सबमिट झाल्यांनतर त्यामध्ये तुम्हाला मिळणारी पावती ती जपून ठेवणे.
- अशा प्रकारे तुमची पीएम कुसुम सौर सबसिडी योजनामध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे.
- प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जमिनीचे परीक्षण केले जाणार.
- त्यानुसार जर तुम्ही या योजनेत बसत असाल तर तुम्हाला सोलर पंप शेतामध्ये लावून मिळेल.
पीएम कुसुम सोलर सबसिडी योजनेचे स्टेटस कसे तपासायचे? | Subsidy Status
- सर्वात प्रथम तुम्हाला पीएम कुसुम सौर सबसिडी योजनाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर त्यामध्ये तुमच्या राज्याचे नाव निवडून घेणे.
- राज्य निवडून झाल्यावर मेनूवर तुम्हाला track application नावाचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करणे.
- ट्रॅक अँप्लिकेशनवर क्लिक करून झाल्यावर तुमचे application नंबर आणि रजिस्टर मोबाईल नंबर नमूद करणे.
- या दोन्ही नंबरांना नमूद केल्यानंतर Search वर क्लिक करणे.
- Search बटन वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर योजनेचा स्टेटस ओपन होईल.
निष्कर्ष
या लेखातून आम्ही तुम्हाला PM Kusum Solar Subsidy Yojana याबद्दलची सविस्तर माहिती दिली, यामध्ये केंद्र सरकारने सुरु केलेल्या योजनाचे उद्देश, कोणत्या घटकांचा समावेश केला आहे? यामध्ये पात्रता कोण असणार आहेत? त्यांचे फायदे, अर्जासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, अर्ज करताना लागणारे शुल्क आणि ऑनलाइन पद्धतीने अर्जाची प्रक्रिया कशी करण्याची? याबद्दलची सर्व माहिती आम्ही यातून सोप्या रीतीने पुरवली आहे.
आपल्या देशभरातील शेतकरी वर्गासाठी ही योजना उत्तम असून त्यामधून आर्थिक मदत सुद्धा मिळते. जेणेकरून, आपले अन्नदाता शेतकरी चांगल्या प्रकारे आपले उत्पन्न वाढवून चांगला रोजगार मिळवू शकतात.
आमचा हा लेख तुम्हाला आवडला असल्यास तुमच्या जवळच्या शेतकरी मित्रांना share करा आणि अशाच नवीन नवीन योजनेच्या notifications साठी आम्हाला WhatsApp किंवा Telegram वर join करा.
FAQs
कुसुम योजनेसाठी किती सबसिडी मिळणार?
कुसुम योजनेसाठी 90% सबसिडी केंद्र सरकार तर्फे भेटणार.
पीएम कुसुमसाठी कोण पात्र आहेत?
पीएम कुसुमसाठी देशामधील शेतकरी, शेतकरी गट, सहकारी संस्था, पाणी ग्राहक संघटना आणि शेतकरी उत्पादक संघटना पात्र आहेत.
पीएम कुसुम योजनामध्ये 1 मेगावॅटची किंमत किती आहे?
पीएम कुसुम योजनांमध्ये 1 मेगावॅटची किंमत ही 5000 रुपये + जीएसटी आहे.
शेतामध्ये सोलर पंपचे फायदे काय आहेत?
शेतामध्ये सोलर पंप वापरल्यामुळे इंधन व वीज खर्चाची बचत होते.
कुसुम योजनाचे स्टेटस कसे तपासायचे?
Ministry of New and Renewable Energy यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन स्टेटस तपासू शकता.
हे देखील वाचा: