Rail Kaushal Vikas Yojana 2024: केंद्र सरकारने रेल्वे विभागाच्या माध्यमातून तरुणांना त्या क्षेत्रात प्रशिक्षण प्राप्त होण्यासाठी रेल कौशल्य विकास योजना सुरु केली आहे. भारतामधील सर्व तरुण वर्ग ज्यांना रेल्वे क्षेत्रात रुची आहे, त्यांना या योजनेच्या माध्यमातून विविध क्षेत्रात प्रशिक्षण घेण्यासाठी संधी मिळते.
रेल कौशल्य विकास योजना ही रेल्वे मंत्रालयतर्फे काढण्यात आलेली एक इंटर्नशिप प्रोग्राम आहे. ज्यामध्ये भारतामधील तरुण मुलांना फक्त 10 वी पास असतील तरी भर्ती केले जाते. त्याचसोबत कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली जात नाही. त्याचबरोबर कोणतेही शुल्क न लावता, विद्यार्थ्यांना 18 दिवस किंवा त्याच्यापेक्षा जास्त दिवसांची ट्रेनिंग दिली जाते. त्याचा फायदा पुढे जाऊन करिअरला सुद्धा होणार आहे.
आपल्या आजच्या आर्टिकलमध्ये रेल कौशल्य विकास योजना काय आहे? त्यामध्ये नोकरी कशाप्रकारे मिळेल? प्रतिमाह पगार किती दिला जाणार? कोणत्या प्रकारचे प्रशिक्षण दिले जाणार? कोणते तरुण वर्ग यामध्ये सहभाग घेऊ शकतात? आणि त्याचप्रमाणे नोंदणी कशी व कुठे करायची? अशा पूर्ण गोष्टींबद्दल सोप्या पद्धतीने माहिती जाणून घेणार आहोत तर लास्टपर्यंत लेख पहा आणि इंस्टर्नशिपचा लाभ घ्या.
Rail Kaushal Vikas Yojana in Marathi
केंद्र सरकारतर्फे PM Kaushal Vikas Yojana या प्रोग्राम अंतर्गत रेल कौशल्य विकास योजनाची सुरुवात 17 सप्टेंबर, 2021 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली होती. ही योजना रेल्वे क्षेत्रामधील प्रशिक्षण संदर्भात असल्यामुळे याची संपूर्ण अंमलबजावणी Ministry of Railways करते.
या योजनेचा मुख्य उद्देश बेरोजगार युवा तरुण वर्ग आहे, त्यांना RKVY म्हणजे Rail Kaushal Vikas Yojana प्रोग्राम अंतर्गत टेक्निकल प्रशिक्षण देऊन त्यांचा विकास करणे आहे. ज्यामध्ये रेल्वे विभागामार्फत नेमलेल्या संबंधित क्षेत्रामधील संस्थाद्वारे ट्रेनिंग दिले जाते.
योजनेच्या अंतर्गत लाभार्थी युवकांना 18 महिन्यांचे मोफत प्रशिक्षण दिले जाते आणि ट्रेनिंग झाल्यानंतर RKVY Training Certificate सुद्धा दिले जाते. ज्याचा फायदा भविष्यामध्ये नोकरी शोधण्यासाठी होऊ शकतो त्याचसोबत स्वतःचे व्यवसाय सुद्धा सुरु करण्यासाठी मदत होते. या योजने अंतर्गत ज्या क्षेत्रामध्ये प्रशिक्षण प्राप्त केले आहे, त्यामध्ये व्यवसाय सुरु करण्यासाठी लागणारे उपकरणे सुद्धा केंद्र सरकारतर्फे देण्यात येते.
Trades under Rail Kaushal Vikas Yojana
खालीलप्रमाणे दिलेल्या यादीनुसार रेल कौशल्य विकास योजना अंतर्गत ट्रेडची निवड करून त्या क्षेत्रामध्ये प्रशिक्षण पूर्ण करू शकता.
- Fitters
- AC Mechanic
- Carpenter
- Communication Network and Surveillance System (CNSS)
- Bar Bending
- Machinist
- Refrigeration and AC
- Electronics and Instrumentation
- Basics of IT, S and T in Indian Railway
- Track Laying
- Welding
- Computer Basics
- Concreting
- Instrument Mechanic (Electrical and Electronic)
- Electrical
- Technician Mechatronics
Rail Kaushal Vikas Yojana 2024 Highlights
योजनेचे नाव | रेल कौशल्य विकास योजना (RKVY) |
स्कीम | केंद्र सरकारी योजना |
लाँच कोणी केले | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी |
लॉंच कधी केले | 17 सप्टेंबर, 2021 मध्ये |
डिपार्टमेंट | भारतीय रेल्वे मंत्रालय |
लक्ष्य | देशामधील बेरोजगार युवा तरुण फ्री प्रशिक्षण देऊन त्यांना कुशल बनविणे |
लाभार्थी | 10 वी पास असलेले भारतीय तरुण युवा |
लाभ | फ्री ट्रेनिंग |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
अधिकृत वेबसाइट | railkvy.indiarailways.gov.in |
Rail Kaushal Vikas Yojana Purpose
आपल्या देशामध्ये बेरोजगारी भरपूर प्रमाणात आहे. केंद्र सरकार विविध प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून बेरोजगारी पूर्णपणे कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच रेल कौशल्य विकास योजना सुरु करण्यामागचा उद्देशसुद्धा बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी रेल्वे क्षेत्रात मोफत प्रशिक्षण देणे. ज्याच्या माध्यमातून युवा तरुण वर्ग आत्मनिर्भर होईल आणि आपले करिअर योग्यरीत्या बनवतील.
त्याचप्रमाणे काही युवा तरुण असे आहेत, ज्यांनी फक्त सामान्य शिक्षण पूर्ण केले. परंतु त्यामुळे त्यांना नोकरीची संधीसुद्धा कमी असते. तसेच कोणत्याही क्षेत्रात प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांची आर्थिक परिस्थिती स्थिर नसते व त्यांना परवडत नाही. यासाठी केंद्र सरकारने रेल्वे विभागासोबत मिळून संबंधित क्षेत्रामधील विविध प्रकारच्या कामांसाठी मोफत प्रशिक्षण देऊन युवकांना सक्षम बनविण्यासाठी योजना आणली.
Rail Kaushal Vikas Yojana Eligibility
तरुण युवांना सहभाग घेण्यासाठी रेल कौशल्य विकास योजना अंतर्गत पात्रता असणे आवश्यक आहे, यासाठी तुम्हाला खालील दिलेल्या अटींचे पालन करावे लागेल.
- RKVY योजनामध्ये सहभागी होण्यासाठी युवा तरुणांचे शिक्षण कमीतकमी 10 वी पूर्ण असले पाहिजेत.
- त्याचप्रमाणे योजनेचा लाभ घेण्यासाठी फक्त भारतामधील बेरोजगार तरुण पात्र असणार आहेत.
- जे युवा तरुण योजने अंतर्गत अर्ज करणार आहे, त्यांचे वय कमीतकमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 35 वर्ष असणे आवश्यक आहे.
रेल कौशल विकास योजनाच्या अटी कोणत्या आहेत?
- RKVY योजना अंतर्गत कोणत्याही प्रकारचे फी घेतली जात नाही.
- त्याचप्रमाणे कोणत्याही मोठ्या जसे IT क्षेत्रामधील शैक्षणिक पात्रतेची गरज नाही.
- अर्ज करणाऱ्या युवांच्या दहावी मार्कशीटप्रमाणे योजनेमध्ये निवड केली जाते.
- योजना अंतर्गत कोणत्याही प्रकारचे ऑफलाईन फॉर्म स्वीकारले जात नाही.
- तसेच प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा संधी दिली जात नाही.
- अर्जदार कोणत्याही कॅटेगरीमधील असले तरी सुद्धा त्यांना Reservation योजनेच्या माध्यमातून देण्यात येत नाही.
- योजने अंतर्गत मिळणाऱ्या ट्रेनिंगमध्ये कमीतकमी 75% हजेरी असणे अनिवार्य आहे अथवा प्रशिक्षण प्रमाणपत्र दिले जाणार नाही.
- 18 दिवसांची ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर लेखी परीक्षेमध्ये 55% आणि प्रॅक्टिकलमध्ये 60% असणे आवश्यक आहे, तरच पास झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात येईल.
- ट्रेनिंग दरम्यान कोणत्याही प्रकारे राहण्याचे व खाण्यापिण्याचे सुविधा केंद्र सरकारतर्फे देण्यात येणार नाही.
- त्याचप्रमाणे ट्रेनिंगसाठी दररोज येण्यासाठी व जाण्यासाठी प्रवासी भत्तासुद्धा दिले जाणार नाही, तो लाभार्थ्यांना करावा लागेल.
- योजनेमधून तरुणांना मिळणारे प्रशिक्षण हे Daytime मध्ये घेतले जातील.
- अर्जदारांना दहा रुपयांचा Non-judicial स्टॅम्प व नोटरी केलेला ऍफिडेव्हिट सादर करणे आवश्यक आहे.
Rail Kaushal Vikas Yojana Required Documents
रेल कौशल विकास योजनासाठी लागणारे कागदपत्रे संस्थेमध्ये प्रशिक्षणसाठी रिपोर्ट करताना सादर करावे लागणार त्याची यादी खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
- अर्जदाराचे शैक्षणिक पुरावा (मार्कशीट)
- पासपोर्ट आकारचे फोटो
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- फोटो आयडेंटी पुरावा (आधारकार्ड,पॅनकार्ड, रेशनकार्ड किंवा बँक पासबुक)
- 10 रुपयांच्या Non-Judicial Stamp पेपरमध्ये ऍफिडेव्हिट
- तरुण युवांचे मेडिकल प्रमाणपत्र
- जर जन्म दिनांक मार्कशीटमध्ये नसल्यास Matriculation Certificate
Rail Kaushal Vikas Yojana Registration
रेल कौशल विकास योजनामध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी अर्जदार युवांना खालीलप्रमाणे दिलेल्या प्रक्रियांना स्टेप बाय स्टेप फॉलो करावे लागेल तरच अर्ज पूर्णपणे यशस्वी होईल.
RKVY पोर्टलसाठी लॉगिन आयडी तयार करणे
- तरुण युवांना योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम अधिकृत वेबसाइट मोबाईलमध्ये किंवा पीसीमध्ये उघडावे लागेल.
- वेबसाइट उघडल्यानंतर तुम्हाला डॅशबोर्डमध्ये खाली स्क्रोल केल्यानंतर नंतर Apply for RKVY Training असा पर्याय दिसेल, त्यामध्ये जावे लागेल.
- त्यानंतर लॉगिन आयडी तयार करण्यासाठी तुम्हाला Sign Up चा पर्याय उघडा.
- तो पेज उघडल्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती विचारली जाईल.
- त्यामध्ये तुमचे संपूर्ण नाव, ई-मेल आयडी, मोबाईल नंबर, जन्म दिनांक आणि तुमचे आधार नंबर भरून घ्या.
- पुढे लक्षात राहणारा पासवर्ड तयार करून, त्यामध्ये दोन वेळा टाकून घ्या.
- विचारलेली संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर तपासून करा व साइन अप बटनावर क्लिक करा.
पोर्टल लॉगिन करून घेणे
- साइन अप प्रकिया पूर्ण केल्यानंतर पुन्हा तुम्हाला डॅशबोर्डमध्ये त्याच पर्यायांमध्ये जाऊन लॉगिन बटनावर क्लिक करावे लागेल.
- लॉगिन डॅशबोर्डमध्ये आल्यावर सुरुवातीला तुम्हाला जो नोंद केलेला ई-मेल आयडी तो भरा व पासवर्ड टाका.
- पुढे तुम्हाला कॅप्चा कोड दिसेल, तो व्यवस्थिरित्या भरून लॉगिन बटन सिलेक्ट करणे.
- लॉगिन झाल्यानंतर तुमचे नाव प्रोफाइलमध्ये दिसून येईल म्हणजेच तुमचे प्रकिया पूर्ण झाली.
रेल कौशल विकास योजनासाठी अर्ज करणे
- पोर्टलमध्ये लॉगिन केल्यानंतर तुम्हाला Apply बटनावर क्लिक करावे लागेल.
- पुढे Notification No चा पर्याय दिसेल त्यामध्ये जी दिनांक जवळची असेल ती निवडणे.
- त्यानंतर तुम्हाला कोणत्या राज्यामध्ये प्रशिक्षण घ्यायचे आहे? त्याची निवड करा.
- नंतर Institute Name सिलेक्ट करावे लागेल, त्यामध्ये तुमच्या राज्यामधील उपलब्ध असलेले संस्था दिसतील.
- तुमच्या सोयीनुसार तुम्ही ज्या ठिकाणी प्रशिक्षण घेण्यास इच्छुक आहे, त्या संस्थाची निवड करा.
- सगळ्या पर्यायांची निवड केल्यानंतर तुम्हाला Search वर क्लिक करायचे आहे.
- क्लिक केल्यावर तुमच्या समोर Trade व कोणत्या महिन्यामध्ये प्रशिक्षण असणार? ते दिसेल व त्याचसोबत Apply बटन सुद्धा दिसेल.
- काही वेळेला संस्थेतर्फे प्रशिक्षणसाठी प्रकिया सुरु केलेली नसेल तर तुमच्या समोर NIL असा पर्याय दिसेल.
- तुम्ही ३ संस्थेमध्ये व विविध क्षेत्रामध्ये अर्ज करण्यासाठी मान्यता आहे.
- तुम्ही इतर संस्था निवडून तपासणी करून घ्या.
- ज्या संस्थेचे प्रशिक्षण उपलब्ध असेल, त्यापुढे Apply बटन दिसेल.
- जसे तुम्हाला नोटिफिकेशन दिसेल तेव्हा अर्ज करून Submit बटनावर क्लिक करा.
- तुमचे RKVY अंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण झालेला आहे.
- तुम्ही योजनेमध्ये बसत असाल तर तुम्हाला ई-मेल किंवा मोबाईलवरती SMS द्वारे कळविण्यात येईल.
निष्कर्ष
तुम्हाला अशा प्रकारे आम्ही Rail Kaushal Vikas Yojana काय आहे? त्याची संपूर्ण माहिती मार्गदर्शन केले. तसेच योजनेमधून कशापद्धतीने तुम्ही फायदा घेऊ शकता? कोणकोणत्या अटींना फॉलो करावे लागेल? कोणते युवा वर्ग यामध्ये सहभागी होण्यास पात्र आहेत? केंद्र सरकारचा ही योजना सुरु करण्यामागचा उद्देश कोणता आहे? लाभार्थ्यांना कोणत्या क्षेत्रामधील ट्रेनिंग प्रदान केली जाते? अर्ज करण्यासाठी पोर्टल कोणते आहेत? आणि रजिस्ट्रेशन करण्यासाठी कोणत्या प्रकिया फॉलो करावे लागणार? याबद्दलची सर्व माहिती आर्टिकलच्या माध्यमातून देण्यात आली.
तुम्हाला रेल्वे क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी इच्छा असेल व तुम्ही रेल कौशल विकास योजना अंतर्गत पात्र असाल तर अर्ज करून फ्री ट्रेनिंगचा लाभ घ्या आणि तुमच्या करिअरमध्ये अजून एक कौशल्यची वाढ करा. योजनांच्या अशा अपडेटसाठी तुम्ही योजानामीडियाला Subscribe करू शकता.
Read More: