Sauchalay Yojana Online Registration 2024: केंद्र सरकारने गरीब वर्गातील नागरिकांसाठी शौचालय योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन पोर्टलद्वारे सुरु केले आहेत. जेणेकरून ज्या नागरिकांना शौचालय योजनेचा फायदा घेता आलेला नाही, असे नागरिक सहजरित्या घरी बसून स्वच्छता भारत मिशन पोर्टलमध्ये अर्ज करून लाभ मिळवू शकतात.
आपल्या देशामधील काही शहरी व ग्रामीण राज्यात असे क्षेत्र आहेत, जिथे पायाभूत सुविधा उपलब्ध नाही. त्याचप्रमाणे त्या ठिकाणांवरती शौचालय करण्यासाठी सुविधा नाही, यामुळे तेथील नागरिक रानामध्ये व जंगलामध्ये जाऊन उघड्यामध्ये शौच करतात.
याचे मोठे कारण त्यांची गरिबी व त्या क्षेत्रात विकास झालेला नाही. जास्त करून गरीब व दारिद्रय रेषेखालील कुटुंबाना आर्थिक दृष्टया कमकुवत असल्यामुळे दैनंदिन जीवनामध्ये गरजेच्या असणाऱ्या गोष्टी घेता येत नाही.
ज्या नागरिकांनी पहिले अर्ज केले आहेत, परंतु लाभ मिळालेले नाही तसे नागरिक आणि गरीब वर्गातील नागरिकांसाठी शौचालय योजनाच्या माध्यमातून मोफत टॉयलेट तयार करण्यासाठी आर्थिक मदत केली जाते.
आपल्या आजच्या आर्टिकलमध्ये तुम्ही कशा प्रकारे योजनेच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करून लाभ घेऊ शकता? त्याचप्रमाणे लाभ घेण्यासाठी कोण यामध्ये पात्र असणार? तसेच अर्ज करण्यासाठी अर्जदारांना कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असणार? आणि अर्ज केल्यानंतर स्टेटस कसे पाहायचे? याबद्दल संपूर्ण माहिती या लेखातून पाहायला तुम्हाला मिळेल.
Sauchalay Yojana in Marathi
02 ऑक्टोबर, 2014 रोजी शौचालय योजनाची सुरुवात Swachh Bharat Mission (SBM) अंतर्गत केंद्र सरकारतर्फे करण्यात आली. योजनेची संपूर्ण अंमलबजावणी Department of Drinking Water and Sanitation आणि Ministry of Jal Shakti कार्यालय करते.
केंद्र शासनातर्फे लाभार्थ्यांना शौचलय बनविण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. जे नागरिक टॉयलेट तयार करण्यासाठी सक्षम नाही, अशा नागरिकांना योजनेच्या माध्यमातून 6,000 रुपयांनी दोन हफ्त्यांच्या स्वरूपात एकूण 12,000 रुपये रक्कम थेट बँक खात्यामध्ये Direct Benefit Transfer द्वारे पाठविले जाते.
Sauchalay Yojana 2024 Overview
योजना नाव | फ्री शौचालय योजना |
मिशन | स्वच्छ भारत मिशन |
कोणी लॉन्च केली | भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी |
कधी लॉन्च करण्यात आली | 02 ऑक्टोबर, 2014 च्या वर्षामध्ये |
डिपार्टमेंट | पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग व जल शक्ती मंत्रालय |
मुख्य लक्ष्य | नागरिकांना आर्थिक मदत देऊन भारत देशाला स्वच्छ करणे |
लाभार्थी | भारत देशामधील गरिबी वर्गातील कुटुंब |
फायदा | टॉयलेट तयार करण्यासाठी 12 हजार रुपये |
अर्ज पद्धती | ऑनलाइन किंवा ऑफलाइन |
अधिकृत वेबसाइट | swachhbharatmission.ddws.gov.in |
Sauchalay Yojana Eligibility
नागरिकांना शौचालय योजनाची पात्रता असण्यासाठी आम्ही दिलेल्या खालीलप्रमाणे अटींनुसार पात्र असल्यास अर्ज करून लाभ घेऊ शकता.
- जे नागरिक शौचालय योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक आहे, ते भारत देशाचे स्थानिक रहिवासी असणे.
- ज्या कुटुंबाकडे स्वतःचे घर असून त्यामध्ये टॉयलेटची सुविधा नाही ते सहभागी होऊ शकतात.
- या योजनेमध्ये गरिबी रेषेखालील कुटुंब आणि अनुसूचित जाती व जमाती वर्गामधील नागरिक सहभाग घेऊ शकतात.
- तसेच लहान व मार्जिनल शेतकरी आणि जमीन नसलेले कामगार योजनेसाठी पात्र आहेत.
- त्याचप्रमाणे महिला वर्ग व ज्यांचे फॉर्म लोकल ऑथॉरिटीतर्फे रिजेक्ट करण्यात आले असे नागरिक अर्ज करून लाभ घेण्यासाठी पात्र असणार आहेत.
- ज्यांचाकडे टॉयलेटची सुविधा नाही किंवा इतर सरकारी योजनेमधून लाभ घेतला नसावा.
Sauchalay Yojana Required Documents
ज्या नागरिकांना शौचालय योजनाची कागदपत्रे यादी हवी आहे, त्यांनी खालीलपैकी दिलेले कागदपत्र जमा करून घेणे व अर्ज करताना स्कॅन करून अपलोड करणे.
- पात्र असलेल्या नागरिकांचे आधारकार्ड
- त्यांच्या बँक खात्याची माहिती (पासबुकचे पान)
- अर्जदारांचे पासपोर्ट साइज फोटो
- सहभागी होणाऱ्या नागरिकांचे मोबाईल नंबर (बँक लिंक असणे)
- नागरिकांचे ओळखपत्र
- व्यक्तीचे ई-मेल आयडी
Sauchalay Yojana Apply Online
नागरिकांना शौचालय योजानामध्ये ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आम्ही दिलेल्या खालीलप्रमाणे प्रकिया स्टेप बाय स्टेप फॉलो करणे आवश्यक आहे. संपूर्ण रजिस्ट्रेशन प्रकिया जाणून घेऊन अर्ज केलेला उत्तम आहे.
स्टेप – 1: शौचालय योजनासाठी लॉगिन आयडी तयार करणे
- शौचालय योजनामध्ये अर्ज करण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला Swachh Bharat Mission ची अधिकृत वेबसाइट उघडावी लागेल.
- स्वच्छ भारत मिशनच्या वेबसाइटमध्ये आल्यानंतर तुम्हाला Citizen Corner ऑपशन दिसेल.
- त्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर तुम्हाला Application Form for IHHL च्या पर्यायाला निवडायचे आहे.
- सुरुवातीला तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी login करावे लागणार आणि यासाठी लागणार आयडी व पासवर्ड.
- आयडी व पासवर्ड करण्यासाठी तुम्हाला Citizen Registration असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर रजिस्ट्रेशनचा छोटा फॉर्म उघडून येईल, त्यामध्ये तुम्हाला तुमचे मोबाईल नंबर टाकून गेट ओटीपीवर क्लिक करावे लागेल.
- ओटीपी तुमच्या मोबाईल नंबरवर येईल, तो त्यामध्ये टाकून login बटन दाबून घेणे.
- पुढे तुमचे नाव, लिंग, राज्य व तुम्ही राहत असलेला संपूर्ण घरचा पत्ता भरून घ्या.
- पत्ता भरून झाल्यावर कॅप्चा कोड दिसेल, तो बॉक्समध्ये फील करून सबमिट बटन दाबा.
- अशा पद्धतीने लॉगिन आयडीसाठी रजिस्ट्रेशन प्रकिया पूर्ण झालेली आहे.
स्टेप – 2: पोर्टलमध्ये लॉगिन करून घ्या
- पुन्हा तुम्हाला स्वच्छ भारत मिशनच्या डॅशबोर्डमध्ये यावे लागेल.
- मेनुबारमध्ये जाऊन तुम्हाला Application Form for IHHLच्या पर्यायाला सिलेक्ट करायचे आहे.
- त्यानंतर लॉगिनचा डॅशबोर्ड खुलून येईल, त्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर टाका व गेट ओटीपी करा.
- मोबाईलमध्ये आलेला ओटीपी फील करून कॅप्चा कोड मिळेल तो भरून घ्या.
- कॅप्चा कोड योग्यरित्या बघून भरल्यानंतर Sign-In या बटनावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमच्या समोर योजनेचा नवीन डॅशबोर्ड उघडून येईल, त्यामध्ये तुमचे संपूर्ण माहिती असेल व पात्रतेच्या अटी दिलेल्या आहेत ते वाचू शकता.
स्टेप – 3: शौचालय योजनाचा फॉर्म भरून घ्या
- अटी वाचून झाल्यानंतर स्क्रीनच्या डाव्या बाजूला New Application चा ऑपशन असेल, तो क्लिक करा.
- जेव्हा तुम्ही नवीन एप्लिकेशनवर क्लिक कराल, तेव्हा तुमच्या समोर शौचालय योजनाचा ऑनलाइन फॉर्म उघडून येईल.
- त्या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमच्या राज्याचे, जिल्ह्याचे, ब्लॉकचे, पंचायतचे, गावाचे आणि टोळीचे नाव सिलेक्ट करून घेणे.
- त्यानंतर ज्यांच्या नावाने लाभ घेणार आहेत, त्यांच्या आधारकार्ड प्रमाणे नाव बॉक्समध्ये भरणे.
- पुढे त्या व्यक्तीचे आधारकार्ड नंबर भरून वेरिफिकेशनसाठी टिकमार्क करा आणि आधार नंबर व्हेरिफाय होऊन जाईल.
- तुम्ही महिला असाल आणि तुमचे लग्न झाले असेल तर पतीचे नाव आणि नसेल झाले तर वडिलांचे नाव टाका.
- तुमचे लिंग व तुम्ही BPL किंवा APL कार्ड होल्डर असाल, तर त्यापैकी एक पर्याय निवडणे.
- त्यानंतर तुम्ही General, SC किंवा ST यामधील कोणत्या जातीचे आहेत? त्याची निवड करणे.
- तुमचे रजिस्टर मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असेल तर भरून घेणे.
- नंतर तुमचा पत्ता विचारला जाईल, तो तुमच्या आधारकार्ड प्रमाणे अचूक भरून घ्या.
स्टेप – 4: तुमच्या बँक खात्याची माहिती भरून घेणे
- फॉर्म भरून झाल्यावर सुरुवातीला तुमचे आयएफसी कोड भरणे.
- तुमची बँक व त्यांची शाखा कोणती आहे? त्यांची संपूर्ण नाव द्या.
- पुढे तुमच्या बँकेचा पूर्ण पत्ता आणि राज्य व जिल्हा सुद्धा फील करा.
- त्यानंतर तुमचे बँक अकाउंट नंबर दोन वेळा टाकून बरोबर आहे याची खात्री करा.
- तुमच्या बँक खात्याच्या पासबुकचे पहिले पान २०० KB च्या साइजखाली PDF, JPEG, PNG फॉरमॅटमध्ये सेव्ह करून अपलोड करणे.
स्टेप – 5: फॉर्म ऑनलाइन सबमिट करणे
- बँक खात्याचे कागदपत्रे अपलोड केल्यानंतर संपूर्ण फॉर्म व्यवस्थित तपासून घेणे.
- तपासून खात्री झाल्यावर Apply या बटनावर क्लिक करणे.
- जसे तुम्ही फॉर्म सबमिट कराल तसे तुम्हाला प्रकिया यशस्वी झाल्याची पावती मिळेल.
- त्या पावतीमध्ये तुमचे रजिस्ट्रेशन नंबर असेल, तो योग्य ठिकाणी काळजीपूर्वक ठेवणे.
- या प्रक्रियानुसार तुमचे योजनेमध्ये ऑनलाइन अर्ज पूर्ण झालेले आहे.
- तुमच्यातर्फे सबमिट केलेला ऑनलाइन फॉर्म नेमलेल्या अधिकाऱ्याकडून तपासले जातील.
- त्यापुढे तुम्ही योजने संबंधित संपूर्ण माहिती अचूक दिली असेल, तर अधिकाऱ्यांकडून मान्यता देण्यात येईल.
- मान्यता मिल्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये 15 ते 30 दिवसांच्या आत बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जातील.
- जर एक महिन्याच्या कालावधीमध्ये पैसे आले नाही, तर खालीलप्रमाणे दिलेल्या तपासणी प्रकियाला फॉलो करून स्टेटस पाहू शकता.
Sauchalay Yojana Offline Registration
जे नागरिक ग्रामीण भागातील असून त्यांना शौचलय योजनामध्ये ऑफलाइन रजिस्ट्रेशन करून आर्थिक मदत मिळवायची आहे, त्यांनी खाली दिलेली प्रकिया फॉलो करणे.
- सर्वात प्रथम तुम्हाला तुम्हाला तुमच्या क्षेत्रामधील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये भेट द्यायची आहे.
- कार्यालयात भेट दिल्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांना शौचालय योजनाचा फॉर्म संबंधित माहिती द्या.
- त्यानंतर अधिकाऱ्यांकडून फॉर्म दिले जातील, त्यामध्ये योजने अंतर्गत आवश्यक असणारी माहिती भरून घ्या.
- योजनेचा फॉर्म पूर्ण भरल्यावर तुमचे जे काही कागदपत्रे असतील ते झेरॉक्स करून जोडून द्या.
- त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालमधील कर्मचारी तुमचे अर्ज पोर्टलद्वारे ऑनलाइन भरतील.
- योजने अंतर्गत असलेले विभाग तुमचे अर्ज तपासातील तुम्ही पात्र असाल, तर बँक खात्यामध्ये थेट रक्कम ट्रान्स्फर करतील.
Sauchalay Yojana Application Status Check
- तुम्ही अर्ज केल्यानंतर शौचालय योजनाची रजिस्ट्रेशन स्थिती पाहण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम स्वच्छ भारत मिशन पोर्टलमध्ये जावे लागेल.
- तुम्ही सुरुवातीला अर्ज केलेल्या पर्यायामध्ये जाणे.
- त्यानंतर लॉगिन करण्यासाठी डॅशबोर्ड उघडेल, त्यामध्ये यूजर आयडी टाकून लॉगिन करून घेणे.
- पुढे डॅशबोर्डवरती View Application असे ऑपशन दिसेल ते निवडा.
- पर्यायाची निवड केल्यानंतर तुमच्या समोर तक्त्याच्या स्वरुपात योजनेची स्थिती दिसून येईल.
- त्या स्थितीमध्ये तुम्ही कधी अर्ज केला? व तुमचे अर्ज कुठपर्यंत पोहचले आहेत? याचा पूर्ण डेटा तुम्हाला मिळेल.
निष्कर्ष
या लेखाच्या माध्यमातून Sauchalay Yojana Online Registration बद्दल संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप देण्यात आली. त्याचप्रमाणे शौचालय योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, त्यासाठी लागू करण्यात आलेली पात्रता, तसेच अर्जाचे ऑनलाइन व ऑफलाइन प्रकिया आणि स्थिती पाहण्यासाठी प्रकिया याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.
FAQs
शौचालय योजनेची सुरुवात कधी करण्यात आली?
केंद्र सरकारच्या माध्यमातून योजनेची सुरुवात 02 ऑक्टोबर, 2014 रोजी करण्यात आली.
शौचालय बांधण्यासाठी किती रुपये दिले जाते?
लाभार्थ्यांना शौचालय बांधण्यासाठी केंद्र सरकारतर्फे 12,000 रुपये दिले जाते.
शौचालय योजनेसाठी कोण पात्र आहेत?
या योजनेसाठी अनुसूचित जाती व जमाती, BPL वर्ग आणि महिला पात्र आहेत.
Read More: