Sukanya Samriddhi Yojana 2024: पंतप्रधान मोदीजी यांनी आपल्या देशामधील मुलींच्या उज्वल भविष्यासाठी सुकन्या समृद्धी योजना (SSY) सुरु केली आहे. जर तुमच्या घरी कोणी लहान मुलगी असेल? आणि तुम्ही तिच्या भविष्याला घेऊन चिंता करत असाल तर तुम्ही निश्चिन्त राहा. कारण मुलींच्या भविष्यात होणाऱ्या शिक्षणाचा आणि लग्नाचा खर्च भागवण्यासाठी सरकारने सुकन्या योजनाच्या माध्यमातून छोट्याशा गुंतवणुकीचा पर्याय सुरु केला आहे.
भारत सरकारने दिलेली ही योजना मुलींसाठी एका प्रकारची मुख्य गुंतवणूक योजना आहे, जी कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीद्वारे त्यांच्या नावाने खाते उघडून सुरु करू शकता. या योजने अंतर्गत मुलीच्या 10 वर्ष पूर्ण होण्याआधी आई-वडिलांच्या साहाय्याने बचत खाते उघडले जाते. हे बचत खाते बँक किंवा पोस्ट ऑफिसद्वारे उघडले जाते.
SSY योजना अंतर्गत बचत खात्यामध्ये गुंतवणुक केलेल्या रक्कमेनुसार चक्रवाढ व्याजसुद्धा मिळते, त्याचसोबत मॅच्युरिटीवरती मोठी रक्कम वाढण्यात मदत मिळते. या उघडलेल्या खात्यामध्ये मुलीचे आई-वडील दर वर्षी 250 रुपये पासून ते 1.5 लाख रुपये पर्यंतची रक्कम जमा करू शकतात.
यामध्ये तुमच्या मुलीसाठी खाते उघडून लाभ घेण्यासाठी आणि संपूर्ण माहितीसाठी हा लेख शेवटपर्यंत लक्षपूर्वक पाहा.
सुकन्या समृद्धी योजना कशी काम करते?
- योजनामध्ये खाते उघडण्यासाठी मुलीचे वय 10 वर्षाच्या खाली असले पाहिजे.
- मुलगी आणि तिचे आई-वडील कायदेशीर भारताचे नागरिक असले पाहिजेत.
- SSY मध्ये खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तुमच्या जवळ असले पाहिजेत.
- सुकन्यामध्ये खाते उघडण्यासाठी बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागते.
- या योजनेत कमीत कमी 250 रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये रक्कम जमा करू शकता.
- खात्यामध्ये मासिक आणि वार्षिक रक्कम जमा करू शकता.
- खात्यामध्ये भरलेल्या रक्कमेनुसार SSY interest rate 8% लागू होतो.
- Sukanya Samriddhi account मध्ये किमान 15 वर्ष रक्कम जमा करावी लागते.
- मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर 50% रक्कम काढू शकता.
- मुलगी वयात आल्यावर तिच्या लग्नासाठी, शिक्षणासाठी आणि तिच्या व्यवसायासाठी रक्कम काढू शकता.
Sukanya Samriddhi Yojana 2024 Overview
योजनेचे नाव | सुकन्या समृद्धी योजना (SSY) |
सुरु कोणी केली | केंद्र सरकारने |
लाभर्ती | 10 वर्षापेक्षा खालील लहान मुलींसाठी |
उद्देश | मुलीचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी |
लाभ | मुलीच्या भविष्यातील होणाऱ्या शिक्षणाचा व लग्नाच्या खर्चाची बचत |
व्याज दर | 8% (Interest Rate) |
गुंतवणूक रक्कम | 250 रुपये पासून 1.5 लाख रुपयेपर्यंत |
गुंतवणूक कालावधी | 15 वर्षापर्यंत |
अर्ज पद्धत | ऑफलाइन |
सुकन्या समृद्धी योजना उद्देश | Objectives
सरकारतर्फे सुरु केलेल्या योजनेचा मुख्य उद्देश हे भारत देशामधील मुलींसाठी सुरक्षित भविष्य निर्माण करणे. जसजसे आपला भारत देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे, तसतसे प्रत्येक क्षेत्रात स्टॅंडर्ड ऑफ लिविंग आणि महागाईसुद्धा वाढत चालली आहे. त्यामुळे गरीब घराण्यांमधील आई-वडील आपल्या मुलींना घेऊन चिंता करत असतात.
या योजनेच्या मार्फत मुली आत्मनिर्भर राहून त्यांच्या शिक्षणाच्या आवडीच्या क्षेत्रात सहभागी होऊन आपले भविष्य उज्ज्वल बनवू शकतात. म्हणून या योजनेच्या माध्यमातून आई-वडील आपल्या मुलींच्या उज्ज्वल भविष्य काळासाठी घेऊन चिंतीत राहणार नाहीत.
सुकन्या समृद्धी योजनाचे फायदे | Benefits
- SSY ही देशामधील 10 वर्षा खालील मुलींसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी सुरु केली आहे.
- आई-वडील आपल्या मुलीच्या उज्वल भविष्यासाठी बचत खाते उघडू शकतात.
- या योजनेत एका वर्षामध्ये पालकांना कमीत कमी दोनशे पन्नास आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्याचे अधिकार आहे.
- खातेधारकांना सुकन्या योजने अंतर्गत उघडलेल्या खात्यामध्ये पंधरा वर्षापर्यंत गुंतवणूक करणे बंधनकारक आहे.
- ही गुंतवणूक सरकारतर्फे असल्या कारणामुळे भविष्यामध्ये गुंतवलेल्या रकमेचे गॅरंटी रिटर्न भेटणारच.
- मुलीच्या उच्च शिक्षणासाठी खात्यामधील जमा रक्कम काढायची असल्यास मुलीचे वय 18 वर्ष असणे गरजेचे आहे.
- मुलीचे वय अठरा वर्ष झाल्यानंतर खात्यातील जमा रक्कमेतून 50% रक्कम काढू शकतो.
- गुंतवणूकदारांना SSY या योजनेमध्ये 7.6% दरानुसार व्याज लावले जाते.
- खाते उघडल्या नंतर जर वेळोवेळी रक्कम भरली नाही, तर त्या वर्षी 50 रुपयाची पेनल्टी लावली जाते.
- एकाच कुटंबातील 2 मुलींचे देखील सुकन्या योजना अंतर्गत खाते उघडू शकतो.
- Income Tax च्या Act नुसार या खात्यामध्ये टॅक्सची सूट दिली जाते.
सुकन्या समृद्धी योजना पात्रता | Sukanya Samriddhi Yojana Eligibility
- मुलीच्या नावाने योजनामध्ये फक्त कायदेशीर आई-वडील खाते उघडू शकतात.
- या योजने मध्ये खाते उघडण्यासाठी मुलगी आणि आई-वडील हे देशाचे स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे.
- मुलीचे खाते खोलताना वय दहा वर्षाच्या खाली असणे गरजेचे आहे.
- या योजनेनुसार एका मुलीच्या नावाने फक्त एकच खाते उघडू शकता.
सुकन्या समृद्धी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे | Sukanya Samriddhi Yojana Documents
जर तुम्ही SSY अंतर्गत तुमच्या मुलीचे खाते उघडण्यास जात असाल तर खाली दिलेली आवश्यक कागदपत्रे बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये घेऊन जावे लागेल.
- पासपोर्ट साइज फोटो (Passport Size Photo)
- मुलीच्या जन्माचा दाखला (Birth Certificate)
- पालकांचे आधारकार्ड (Adhaar Card)
- पालकांचे पॅन कार्ड (Pan Card)
- पालकांचे ओळखपत्र (Address Proof)
- निवासी प्रमाणपत्र
- मोबाइल नंबर (Contact No.)
सुकन्या समृद्धी योजना देणाऱ्या बँकेच्या यादी I List Of Banks Offering Sukanya Samriddhi Yojana
- बँक ऑफ महाराष्ट्र
- बँक ऑफ इंडिया
- भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया
- पंजाब नॅशनल बँक
- आंध्रा बँक
- ऐक्सिस बँक
- बँक ऑफ बडोदा
- आयडीबीआय बँक
- देना बँक
- कॅनरा बँक
- आयसीआयसीआय बँक
- इलाहाबाद बँक
- पंजाब अँड सिंध बँक
- यूनियन बँक ऑफ इंडिया
- यूको बँक
- विजय बँक
- ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स
- स्टेट बँक ऑफ हैद्राबाद
- युनाइटेड बँक ऑफ इंडिया
- स्टेट ऑफ बँक ऑफ पटियाला
- स्टेट बँक ऑफ मैसूर
- स्टेट बँक ऑफ त्रावणकोर
- स्टेट बँक ऑफ बीकानेर अँड जयपुर
Sukanya Samriddhi Yojana Registration
- SSY मध्ये खाते उघडण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला आम्ही सांगितलेली सर्व आवश्यक कागदपत्रे (Documents) सोबत घेऊन जाणे.
- सुकन्या मध्ये खाते उघडण्यासाठी तुम्हाला जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा आम्ही वरती दिलेल्या बँकांच्या यादीनुसार बँक बघून जाणे.
- बँकेत गेल्यानंतर त्यांच्याकडून योजनाचे फॉर्म प्राप्त करून घेणे.
- बँकेतर्फे दिलेल्या फॉर्ममधील विचारलेली माहिती लक्षपूर्वक भरणे.
- अर्ज फॉर्म पूर्णपणे भरून झाल्यावर आवश्यक कागदपत्रे फॉर्म सोबत जोडणे.
- या सगळ्या प्रक्रिया झाल्यानंतर व्यवस्थित तपासणी करून बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन जमा करणे.
- अशाप्रकारे तुमच्या मुलीचे Sukanya Samriddhi Yojana Scheme मध्ये तुम्ही खाते उघडू शकता.
Sukanya Samriddhi Yojana Invest
सुकन्यामध्ये तुम्हाला सलग 15 वर्ष गुंतवणूक करणे बंधनकारक आहे. तुम्ही बँक किंवा पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून पैसे जमा करू शकता. जर तुम्ही वार्षिक पैसे भरत असाल तर तुम्हाला बारा हफ्ते एका वेळाला भरावे लागेल. वार्षिक हफ्ता भरण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या पर्यायांमधून भरू शकता.
- मोबाइल द्वारे ऑनलाइन ई-ट्रांसफर (NEFT) करू शकता.
- चेक (Cheque) च्या मार्फत पेमेंट देऊ शकता.
- बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये कॅश (Cash) जमा करू शकता.
- डिमांड ड्राफ्ट (Demand Draft) नुसार बँकेत देऊ शकता.
सुकन्या समृद्धी खात्यातील शिल्लक कशी तपासायची?
जेव्हा तुम्ही Sukanya Samriddhi Yojana साठी बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये अकाउंट उघडता, त्याच दरम्यान तुम्हाला त्यांच्याकडून online Login ओळखपत्र/अधिकारपत्र आणि account number दिला जातो. त्यानुसार तुम्ही स्वतः दोन पद्धतीने balance तपासू शकता.
ऑनलाइन प्रक्रिया
Step 1: SSY account ज्या बँकेमधून उघडले आहे, त्यांचे internet banking portal उघडा.
Step 2: पोर्टल उघडल्यानंतर बँकेने दिलेल्या अकाउंट नंबरने लॉगिन करा.
Step 3: लॉगिन करून झाल्यानंतर तुमच्या समोर homepage ची स्क्रीन उघडेल.
Step 4: त्यामध्ये डॅशबोर्डवर Sukanya Samriddhi account मधील शिल्लक दिसेल.
ऑफलाइन प्रक्रिया
Step 1: सगळ्यात आधी तुमच्या जवळच्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये भेट द्या.
Step 2: तिथे तुमचे खाते बँकच्या कर्मचारीकडून उघडून घ्या.
Step 3: बँकेतील कर्मचारीकडून शिल्लक पासबुक अपडेट करून घ्या अथवा current statement मागून घ्या.
पोस्ट ऑफिस खात्यातील शिल्लक कशी तपासायची?
Step 1: शिल्लक तपासण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या अधिकृत ई-बँकिंग वेबसाइटला भेट द्या.
Step 2: पोस्ट ऑफिस तर्फे भेटलेल्या User Id ने DOP ई-बँकिंग प्लॅटफॉर्म लॉगिन करून घेणे.
Step 3: प्लॅटफॉर्म लॉगिन झाल्यावर account menu मध्ये प्रवेश करा.
Step 4: menu उघडल्यानंतर Sukanya Samriddhi account पर्यायावर क्लिक करणे.
Step 5: अशाप्रकारे तुम्हाला पोस्ट ऑफिस द्वारे शिल्लक रक्कम पाहायला मिळेल.
कोणत्या परिस्थितीमध्ये Sukanya Samriddhi account बंद करू शकतो?
मुलीच्या लग्नाच्या वेळेस
जर मुलीचे वय 18 वर्ष होऊन पूर्ण झाल्यानंतर मुलीच्या लग्नाच्या खर्चाला मुदती पूर्वी पैसे काढू शकता आणि खाते बंद करू शकता.
खातेदारकांचे निधन झाल्यानंतर
मुलीचे आई-वडील सुकन्या योजना खात्यामधील जमा असलेले पैसे खातेदाराच्या मृत्यु झाल्यानंतर काढून खाते बंद करू शकता.
आर्थिक स्वरूपात हफ्ते न भरल्यामुळे
सुकन्यामध्ये उघडलेल्या खात्यामध्ये पालकांनी जर हफ्ते भरण्यास चुकविले तर बँक किंवा पोस्ट ऑफिसद्वारे खाते बंद केले जाऊ शकते.
निष्कर्ष
Sukanya Samriddhi Yojana बाबत तुम्हाला आमच्या लेखामधून संपूर्ण माहिती मिळाली असेलच अशी आशा करतो. ही योजना कर मुक्त असल्याकारणामुळे तुमच्या मुलीच्या चांगल्या भविष्यासाठी उत्तम गुंतवणुकीचा पर्याय ठरू शकतो.
त्याचसोबत भविष्यकाळात छोटी रक्कम भरून चांगला चक्रवाढ व्याजदर मिळतो. ज्याने तुमच्या मुलीच्या भविष्यामधील होणारे खर्च योग्यरित्या पार पाडून मुलीला सुरक्षित ठेवू शकता.
जर तुम्हाला हा लेख आवडला असेल, तर तुम्ही Social Media च्या माध्यमातून आम्हाला जोडून राहू शकतात आणि भविष्यात येणाऱ्या अशाच उत्तम योजनांबद्दल जाणून घेऊ शकता.
FAQs
मी सुकन्या समृद्धी योजना कोठे उघडू शकतो?
तुमच्या जवळच्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये उघडू शकता.
आपण सुकन्या समृद्धी खात्यात चेक जमा करू शकतो का?
होय, त्याचसोबत रोख, NEFT आणि Demand Draft ने सुद्धा रक्कम जमा करू शकता.
सुकन्या समृद्धी योजनेसाठी किती वर्षे भरावे लागतील?
कमीत कमीत 15 वर्ष भरणे बंधनकारक आहे.
हे सुद्धा वाचा: