Magel Tyala Solar Pump Yojana Online Registration 2024: सर्व शेतकऱ्यांना सौर कृषी पंप बसवता येणार आहे. शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अंतर्गत नोंदणी महाराष्ट्र सरकारने सुरु केली आहे. तुम्ही खालील दिलेल्या योजनेमध्ये सहज व सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करून मिळवा सोलर पंप.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री श्री. देवेन्द्र फडणवीस यांनी महावितरणच्या विभागासोबत मिळून 13 सप्टेंबर, 2024 रोजी मागेल त्यांना सौर ऊर्जा कृषीपंप योजनासाठी पोर्टल लॉन्च केले.
या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारचे मुख्य उद्देश येत्या वर्षांमध्ये संपूर्ण राज्यामध्ये ग्रीन ऊर्जा निर्माण करणे आहे. त्याचसोबत शेतकऱ्यांना शेतीसाठी सोलर पंप उपलब्ध करून त्यांची मेहनत कमी करणे व त्यांना भविष्यामध्ये त्यातून उत्पन्न काढण्यासाठी मदत करणे.
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनामध्ये कशा प्रकारे ऑनलाइन रजिस्ट्रेशन करायचे आहे? त्यांचे स्टेटस कसे तपासायचे? नोंदणी करताना कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता लागणार आहे? पंपसाठी किती खर्च शेतकऱ्यांना करावा लागणार? योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत? कोणाला यामधून लाभ घेता येणार? अशा सर्व गोष्टींबद्दल आपण आजच्या लेखामधून जाणून घेणार आहोत, तर लक्षपूर्वक माहिती पहा.
Magel Tyala Solar Pump Yojana in Marathi
महाराष्ट्र सरकारने मागेल त्याला सौर कृषी पंप योजनाची सुरुवात 2024 च्या अर्थसंकल्पनेत करण्यात आली. ज्याला शॉर्टमध्ये MTSKPY असे ही म्हटले जाते. ज्याची अंमलबजावणी ऊर्जा विभाग अंतर्गत महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनी मर्यादित डिपार्टमेंट करते.
या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र व केंद्र सरकार मिळून शेतकऱ्यांना सोलर पंप घेण्यासाठी आर्थिक मदत करत आहेत. ज्यामध्ये केंद्र सरकार 60% आणि राज्य सरकार 30% आर्थिक मदत शेतकऱ्यांना करते. उरलेले 10% रक्कम शेतकऱ्यांना भरावे लागते.
अनुसूचित जाती व जमाती वर्गामधील नागरिकाना योजनेसाठी फक्त 5% रक्कम भरावी लागते. MTSKPY योजनाच्या अंतर्गत सरकार सामान्य नागरिकांसाठी 90% योगदान देते व ST/SC समाजामधील शेतकऱ्यांना 95% योगदान सोलर पंप घेण्यासाठी आर्थिक रूपात करतात.
योजने अंतर्गत शेतकरी लाभार्थ्यांना 3 HP, 5 HP व 7.5 HP क्षमतेचे सोलर पंप दिले जाते. त्याचसोबत पंपाच्या दुरुस्थीसाठी 5 वर्षांचा कालावधी सुद्धा देण्यात आलेला आहे. तसेच शेतकऱ्यांना विमा सुद्धा पुरवला जाणार आहे.
ज्या शेतकऱ्यांकडे 2.5 एकर जमीन असेल, तर 3 HP चे पंप देण्यात येणार. जर पाच एकर जमीन असल्यास 5 एचपीचे पंप आणि 5 एकरापेक्षा जास्त जमीन असल्यास 7.5 एचपी क्षमतेचे सौर पंप दिले जाते.
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनाची माहिती 2024
योजनेचे नाव | मागेल त्याला सौर कृषी पंप योजना (MTSKPY) |
प्रकार | सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम |
सुरु कोणी केली | महाराष्ट्र राज्य सरकारने |
लॉंच केली | 2024 मध्ये |
विभाग | ऊर्जा विभाग, महाराष्ट्र शासन |
मुख्य उद्देश | शेतकऱ्यांना सोलर पंप घेण्यासाठी आर्थिक मदत करणे |
लाभार्थी | शेतकरी वर्ग |
लाभ | सौर पंप घेण्यासाठी 90% योगदान |
रजिस्ट्रेशन प्रकिया | ऑनलाइन |
महावितरण हेल्पलाईन नंबर | 1800-212-3435/1800-233-3435 |
Magel Tyala Solar Pump Yojana साठी आवश्यक कागदपत्रे
शेतकऱ्यांना अर्ज ऑनलाईन करताना मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे दिलेल्या यादीनुसार जमा करून घेणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचा 7/12उतारा
- आधारकार्ड
- बँक खात्याचे पासबुक किंवा रद्द केलेला चेक
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- जातीचा दाखला
- पाण्याचा प्रभावित क्षेत्र असल्यावर ना हरकत दाखला
- सामाईक पंप असल्यास भागीदाराची ना हरकत प्रतिज्ञापत्र
Magel Tyala Solar Pump Yojana ऑनलाइन नोंदणी प्रकिया
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा फॉर्म कसा भरायचा? याबद्दल खालीलप्रमाणे स्टेप बाय स्टेप प्रकिया सांगण्यात आलेली आहे, त्यानुसार अर्ज करून लाभ मिळवा.
Step No.1: अर्जाचा फॉर्म उघडणे
- सोलर पंपासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला महावितरण विभागातर्फे सुरु करण्यात आलेल्या mahadiscom.in/solar_MTSKPY/indix.mr.php या वेबसाइटर जायचे आहे.
- तुमच्या समोर महावितरणची वेबसाइट उघडून येईल, त्यामधील होमपेजवरती उजव्या बाजूला भाषा निवडायची संधी मिळेल, ती तुमच्या सोयीनुसार निवडून घ्या.
- त्यानंतर तुम्हाला डॅशबोर्डच्या मेनूमध्ये लाभार्थी सुविधा असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
- तुम्ही नवीन अर्ज करणार आहेत, यासाठी सुरुवातीला असलेला पर्याय म्हणजे अर्ज करा यामध्ये जावा.
- तुमच्या नवीन नवीनपेज उघडून येईल, त्यामध्ये पारेषण विरहित सौर कृषी पंप ऑनलाइन अर्ज फॉर्म उघडून आला असेल.
- इथून पुढे आपण योजनेचा संपूर्ण फॉर्म स्टेप बाय स्टेप भरून घेणार आहोत तर एक एक स्टेप योग्यरित्या वाचून पूर्ण करा.
Step No.2: पैसे भरून प्रलंबित कृषी पंप वीज जोडणी ग्राहक तपशील भरणे
- यामध्ये जर तुम्ही प्रलंबित ग्राहक तुम्ही असाल तर तुम्हाला याबद्दल विचारलेली माहिती भरणे आवश्यक आहे आणि जर तुम्ही प्रलंबित ग्राहक नसाल तर हा पर्याय सोडून देणे.
- पहिला तुम्हाला दिलेल्या बॉक्समध्ये टिकमार्क करून घावी लागेल.
- प्रथम तुम्ही कोटेशन प्रमाणे वीज जोडणी ग्राहक क्रमांक टाकून घ्या.
- त्यानंतर तुमचे संपूर्ण नाव, घराचा पत्ता आणि कोणत्या जातीचे आहेत? ते भरा.
- पुढे तुमचे ई-मेल, मोबाईल नंबर, मंडळ कार्याचे नाव, विभाग आणि उपविभाग क्रमांक व नाव भरून घ्या. ही माहिती पर्यायी आहे तर भरली नाही तरीही चालेल.
- त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट डिमांड, मंजूर भार, तुमच्या सर्वात जवळचे LT व HT लाइन अंतर भरणे हे सुद्धा पर्यायी आहे.
- पुढे तुमचे पावती क्रमांक व तारीख, GST वगळून भरलेली रक्कम,वस्तूवरील कर आणि GST सोबत भरलेली संपूर्ण रक्कम फील करा.
Step No.3: तुमची वैयक्तिक व जमिनीची माहिती भरणे
- जर तुम्ही प्रलंबित ग्राहक नसाल तर अर्ज करायची प्रकिया या स्टेप पासून करा.
- सर्वात प्रथम मागेल त्याला कृषी पंप योजनाचे नाव निवडा व तुमचे आधारकार्डचे नंबर टाका.
- त्यानंतर तुम्हाला तुमचे जिल्हा, तालुका, आणि गावाचे नाव भरून घ्यावे लागले.
- पुढे मुख्य व उप सर्वेक्षण/गट क्रमांक निवडायचा आहे.
- त्यानंतर तुमच्या शेतीचे प्रकार, जमिनीच्या मालकीचे नाव, एकूण जमीन किती आहे? त्याची नोंद करा.
- पुढे तुमचे, वडिलांचे किंवा पतीचे नाव आणि आडनाव भरून घ्या.
- भरल्यानंतर तुमचे लिंग, जात, तुमचा मोबाईल नंबर व ई-मेल आयडी भरून घ्या.
Step No.4: तुम्ही राहत असलेला संपूर्ण पत्ता व ठिकाण निवडणे
- रहिवासी पत्ता भरताना सुरुवातीला तुमचे घर क्रमांक व रस्त्याची संपूर्ण माहिती द्यावी लागेल.
- पुढे तुमचे जिल्हा, तालुका, गावाचे नाव, पिनकोड काय आहे? ते निवडून घ्या.
- त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, एसटीडी दूरध्वनी नंबर असेल तर भरणे, नाही दिले तरी चालेल.
- शेवटी पॅनकार्ड क्रमक भरावा लागेल तो सुद्धा पर्यायी आहे.
Step No.5: सिंचन व जलस्तोत्राची संपूर्ण माहिती देणे
- सर्वात प्रथम तुम्हाला जलस्तोत्राचे प्रकार ज्यामध्ये Well, Bore Well व Farmer Pond असे असेल, त्यामधील एक निवडणे. जलस्तोत्राची तुमच्या सात बारा उताऱ्यामध्ये नोंद असणे महत्त्वाचे आहे.
- त्यानंतर सिंचन प्रकार Micro, Open व Pipe या तिघांमधील कोणते आहे? ते निवडा.
- तुमच्या पाण्याची गुणवत्ता Hard किंवा Soft ती निवडून घ्या.
- तुमच्या जलस्तोत्राची फुटाप्रमाणे असलेली खोली किती आहे? तीचा आकडा द्या.
- त्यानंतर पावसाळी व उन्हाळी हंगामात तुमच्या जलस्तोत्राची फुटाप्रमाणे खोली किती आहे? ती सुद्धा भरून घेणे. (ही माहिती पर्यायी आहे)
- तुमची शेत तलाव असेल, तर Yes पर्याय निवडा, जर नसेल तर No करा.
- शेवटी कूपनलिका रुंदी इंचाप्रमाणे माहित असेल तर भर नाही, भरली तरी चालेल.
Step No.6: तुमच्या कृषी संबंधित माहिती पुरवणे
- कृषी सेक्शनमध्ये तुमच्या मागील वर्षामधील पिकाचे प्रकार खरीब /रब्बी कोणते? ते निवडा आणि त्यांची संख्या भरून घेणे.
- त्यानंतर शेवटचा ते शेवटच्या वर्षामध्ये खरीब/रब्बी पीक घेतले होते ते निवडा व त्यांचीसुद्धा संख्या नमूद करा.
Step No.7: तुमच्या जवळ असलेल्या पंपाची माहिती द्या
- तुमच्या जवळ विद्यमान पंप असेल तर Yes करून त्याचे AC/DC प्रकार निवडा. जर पंप नसेल तर No चा पर्याय निवडा.
- त्यानंतर विद्यमान पंपाचे उप प्रकार Surface आहे की Submersible आहे ते निवडणे.
- पुढे तुमच्या विद्यमान पंपाची क्षमता एचपीनुसार टाकणे.
- त्यानंतर तुमचे विद्यमान पंपाचे ऊर्जा स्रोतसाठी डिझेल निवड करा आणि वर्षातून किती लिटर डिझेल वापरता त्याची नोंद करा.
- शेवटी पंपाचे कार्यक्षम ऊर्जामध्ये Yes/No जे असेल ते निवडा.
Step No.8: तुम्हाला आवश्यक असणाऱ्या पंपाची माहिती देणे
- तुमच्या शेतामध्ये आवश्यक असणाऱ्या पंपाचे प्रकार DC असणार आहे तो सिलेक्ट करणे
- त्यानंतर तुम्हाला जमिनीवरचा पाण्याखालचा पंप पाहिजे असे दोन पर्याय दिसतील, त्यामधील एक उपप्रकार निवडून घ्या.
- पुढे पंपासाठी आवश्यक असणारी श्रेणी सिलेक्ट करा.
- तुमच्या शेतजमिनीच्या आकारानुसार पंपाचीक्षमता एचपीप्रमाणे निवड करा, ज्यामध्ये 3, 5 व 7.5 HP ची क्षमता दिली असेल.
- तसेच तुमच्या शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची उपसा लिटरनुसार आकडेवारी टाका.
Step No.9: तुमच्या बँक खात्याची संपूर्ण माहिती भरणे
- तुमच्या बँक खात्याचे नंबर, आयएफसी कोड, एमआयसीआर कोड जे तुम्हाला ऑनलाइन सर्च केले तर मिळून जाईल ते सर्व बॉक्समध्ये अचूक भरा.
- त्यानंतर खातेदारकाचे संपूर्ण नाव, बँके खात्याचे नाव, शाखेचे नाव व शाखेचे गाव किंवा शहर कोणते आहेत? हे सुद्धा भरून घ्या.
Step No.10: संपूर्ण घोषणापत्र पूर्ण तुम्ही वाचून घ्या
- तुमच्या समोर मागेल त्याला सौर कृषी पंप योजना संबंधित आवश्यक असणारे घोषणापत्रामध्ये एकूण 11 पॉईंट्स दिलेले आहे ते वाचून घ्यावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला शेवटी लाल अक्षरात 4 पॉईंट दिसतील ते सुद्धा वाचून सर्वांना टिकमार्क करून घ्या.
Step No.11: मागेल त्याला सोलर पंप योजनाची कागदपत्रे अपलोड करून घेणे
- योजनेसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जमा करून घेणे.
- कागदपत्रांमध्ये 7/12 उतारामध्ये एकापेक्षा जास्त नागरिकांची नोंदणी असेल, तर तुम्हाला 200 रुपयांचे स्टॅम्प मारून ना हरकत प्रमाणपत्र सादर करावे लागणार.
- कागदपत्रे जमा केल्यानंतर तुम्हाला ते स्कॅन करून 500 KB च्या खाली PDF फाईलनुसार सेव्ह करून घेणे.
- त्यांमध्ये विचारलेली संपूर्ण कागदपत्रे पीडीफच्या स्वरूपात अपलोड करून घेणे.
Step No.12: मागेल त्याला सौर कृषी पंप योजनाचा फॉर्म सबमिट करा
- शेवटी संपूर्ण योजनेचा फॉर्म भरून झाल्यावर तुम्हाला एकदा व्यवस्थित तपासून घेणे आवश्यक आहे.
- सोलर पंप योजनेचा संपूर्ण फॉर्म तपासून झाल्यावर शेवटी अर्ज सादर करा असे बटन दिले, त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमच्या डॅशबोर्डवर काही नोटिफिकेशन येतील ते वाचून Ok क्लिक करणे.
- अशा पद्धतीने आपला योजनेचा फॉर्म यशस्वीरित्या सबमिट झाला आहे.
- तुमच्या समोर फॉर्म भरल्याची पावती येईल, ती डाउनलोड करून प्रिंट करून घ्या आणि सांभाळून ठेवून द्या.
Magel Tyala Solar Pump Yojana चे स्टेटस तपासणी
- मागेल त्याला सौर कृषी पंप योजनाची स्थिती पाहण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटमध्ये जावे लागेल.
- त्यानंतर तुमच्या समोर डॅशबोर्डमध्ये लाभार्थी सुविधाचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करणे.
- पर्यायांमध्ये गेल्यानंतर अर्जाची स्थिती असा ऑपशन दिसून येईल, तो निवडणे.
- योजनेमध्ये अर्ज केल्यानंतर तुम्हाला पावती मिळाली असेल, त्यामध्ये लाभार्थी क्रमांक असेल तो बॉक्समध्ये भरणे.
- लाभार्थी क्रमांक बॉक्समध्ये भरल्यावर शोधा बटनावर क्लिक करा आणि तुमच्या समोर योजनेची स्थिती उघडून येईल.
निष्कर्ष
अशा प्रकारे Magel Tyala Solar Pump Yojana Online Registration संबंधित संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप देण्यात आली. तसेच मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमधून मिळणारे फायदे व आवश्यक असणारी कागदपत्रे याबद्दल सुद्धा सविस्तर माहिती दिली आहे.
तुम्ही शेतकरी असाल आणि तुमच्या शेतामध्ये सोलर पंप बसवायचा विचार करत असाल तर ही योजना तुमच्यासाठी उत्तम आहे. आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या शेतकरी WhatsApp ग्रुपमध्ये नक्की शेअर करा.
FAQs
Magel Tyala Solar Pump Yojana साठी कोण पात्र आहेत?
ज्यांच्याकडे जमीन व पाणी आहे, परंतु वीज नाही असे शेतकरी योजनेसाठी पात्र आहेत.
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनामध्ये अर्ज कसा करायचा?
या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला mahadiscom च्या अधिकृत वेबसाइटमध्ये जाऊन अर्ज करावा लागेल.
MTSKPY चा पूर्ण अर्थ काय आहे?
MTSKPY चा पूर्ण अर्थ मागेल त्याला सौर कृषी पंप योजना असा आहे.
पुढे वाचा: