Pravasi Bharatiya Bima Yojana 2024: परदेशात जाणाऱ्या नागरिकांना मिळणार १० लाखांचा विमा कव्हर

Pravasi Bharatiya Bima Yojana 2024: विदेशामध्ये रोजगारासाठी जाणाऱ्या नागरिकांना विमा सुरक्षा देण्यासाठी केंद्र सरकारने प्रवासी भारतीय विमा योजना (PBBY) सुरु केली आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून ईसीआर देशांमध्ये कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांना 10 लाख रुपयांपर्यतचा विमा कव्हर देण्यात येतो. त्याचप्रमाणे 1 लाख रुपयांपर्यंत मेडिकल विमा कव्हरसुद्धा प्रदान करण्यात येतो.  

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

आपल्या देशामधील बरेच नागरिक चांगले पैसे कमविण्यासाठी व रोजगाराच्या संधी शोधण्यासाठी विदेशी शहरात जात असतात. यामध्ये काही नागरिक सुशिक्षित नसतात, त्यामुळे त्यांना विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. ज्यामध्ये त्यांच्यासोबत बाहेरगावी नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे लुबाडले जातात. 

तसेच काही नागरिकांना विदेशामध्ये काम करत असताना अपघात झाल्यामुळे अपंगत्व किंवा मृत्यू देखील होतो. यामध्ये त्यांच्यासोबत कुटुंबालासुद्धा सामाजिक व आर्थिकदृष्टया समस्यांना सामोरे जावे लागते. अपंगत्व आल्यामुळे नागरिकांना तिथे काम करून दिले जात नाही. अशा वेळेला नागरिकांना पैसे कमवायला शक्य होत नाही आणि हॉस्पिटलचा खर्च सुद्धा भागवणे कठीण होते. 

विदेशी जाणाऱ्या नागरिकांना अशा समस्यांपासून आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकारने प्रवासी भारतीय विमा योजनाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आपल्या लेखामध्ये या सुविधांबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये योजनेचे महत्त्व काय आहेत? त्यामागचे उद्देश, होणारे फायदे, आवश्यक असणारी पात्रता, कागदपत्रे व रजिस्ट्रेशन प्रकिया या सर्व गोष्टींबद्दल सविस्तर माहिती सांगण्यात आलेली आहे.  

Pravasi Bharatiya Bima Yojana in Marathi 

केंद्र सरकारने PBBY म्हणजे प्रवासी भारतीय विमा योजनाची सुरुवात 01 ऑगस्ट, 2017 रोजी केली. पीबीबीवायची संपूर्ण अंमलबजावणी Ministry of External Affairs (MEA) यांच्या अंतर्गत केली जाते. 

रोजगारासाठी विदेशामध्ये स्थलांतर करणाऱ्या नागरिकांना पासपोर्टवरती ECR म्हणजे Emigration Check Required स्टॅम्प घेणे अनिवार्य आहे. ECR हे एक प्रकारचे अतिरिक्त फायदे देतात. ज्यामध्ये केंद्र सरकार विदेशामध्ये रोजगार करणाऱ्या कंपनीचे बॅकग्राऊंड तपासते. 

दुनियामधील फक्त 18 देश आपल्या ECR स्टॅम्पला मान्यता देते. जे नागरिक ECR स्टॅम्प घेऊन जातात, त्यांनासुद्धा कित्येक वेळेला आर्थिक दृष्टया समस्यांना सामोरे जावे लागते. यासाठी केंद्र सरकार योजनेच्या माध्यमातून विमाच्या स्वरूपात आर्थिक मदत करतात. 

ज्यामध्ये लाभार्थ्यांसोबत काही अपघात होऊन अपंगत्व किंवा मृत्यू झाला, तर त्या विमामधून त्यांना 10 लाख रुपयांची मदत दिली जाते. त्याचसोबत काही गंभीर आजार झाल्यावर आरोग्य विषयी मेडिकल विमा कव्हरच्या सुविधा देखील पुरवल्या जातात. ज्यामध्ये नागरिकांना 1 लाख रुपयांपर्यत रक्कम वापरण्यास दिली जाते. 

Pravasi Bharatiya Bima Yojana Details 2024

योजनेचे नावप्रवासी भारतीय विमा योजना (PBBY)
स्कीमकेंद्र सरकारी योजना
स्थापना कधी झाली01 ऑगस्ट, 2017 रोजी
विभागपरराष्ट्र व्यवहार मंत्रालय, भारत सरकार
उद्दिष्ट्येविदेशामध्ये रोजगारासाठी जाणाऱ्या नागरिकांना विमा सुरक्षा प्रदान करणे
लाभार्थीविदेशामध्ये काम करण्यासाठी जाणारे नागरिक
लाभ10 लाख रुपयांचा विमा कव्हर व इतर सुविधा
अर्ज प्रकियाऑनलाइन पद्धत

Objectives of Pravasi Bharatiya Bima Yojana 

प्रवासी भारतीय विमा योजनाचे प्रमुख उद्देश आपल्या देशांमधून बाहेरच्या देशात स्थलांतर करणाऱ्या नागरिकांना सामाजिक व आर्थिक सुरक्षा उपलब्ध करून देण्यासाठी विमा सुविधा प्रदान करणे आहे. जेणेकरून विदेशामध्ये काम करणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यावर त्यांना व त्यांच्या कुटुंबाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. 

आपल्या देशाच्या तुलनेत बाहेरील देशामध्ये हॉस्पिटलचा खर्च जास्त प्रमाणात असतो. त्याचसोबत सुशिक्षित नसलेले नागरिक तिथे जाऊन काम करत असल्यामुळे तेथील अर्थव्यवस्थेप्रमाणे पगार कमीच असतो. यामुळे त्यांना मेडिकल सुविधा घेणे परवडत नाही. अशा लोकांना परदेशात सुद्धा योग्य दरात मेडिकल सुविधा उपलब्ध करून देणे हे मुख्य ध्येय आहे. 

Pravasi Bharatiya Bima Yojana Benefits

  • केंद्र सरकार प्रवासी भारतीय विमा योजनाचे फायदे देशामधून स्थलांतर करणाऱ्या कामगारांना आर्थिक सुरक्षा स्वरूपात देतात. 
  • तशी या योजनेची सुरुवात 2003 रोजी करण्यात आली होती, परंतु सध्याच्या शासनाने 2017 मध्ये त्यामध्ये सुधार केले आहेत. 
  • PBBY योजनेच्या माध्यमातून शिक्षित नसलेल्या नागरिकांना योग्यरित्या मदत होते. 
  • नागरिकांसोबत धोका होऊ नये म्हणून केंद्र सरकारच्या माध्यमातून ECR स्टॅम्प लागू करणे अनिवार्य केले आहे. 
  • ECR च्या माध्यमातून जे नागरिक बाहेर देशामध्ये कामासाठी जातात, तेथील कंपनीची माहिती गोळा करून योग्य आहे की नाही ते तपासले जाते. 
  • केंद्र सरकारच्या अंतर्गत योजनेमधून लाभार्थ्यांना विमा सुरक्षा प्रदान करण्यात येतो. 
  • लाभार्थ्यांचा काही कारणामुळे मृत्यू झाल्यास किंवा कायमचे अपंगत्व आल्यास योजनेमधून 10 लाख रुपयांचा कव्हर दिला जातो. 
  • त्याचप्रमाणे नागरिकांना 1 लाखांपर्यंतचे मेडिकल विमा कव्हर सुद्धा प्रदान केले जाते, ज्यामधून एका हॉस्पिटलमध्ये 50 हजार रुपये वापरण्याची मुदत ठेवली आहे. 
  • लाभार्थ्यांना या योजनेच्या माध्यमातून 2 आणि 3 वर्षांचा विमा कव्हर दिला जातो.
  • दोन वर्षांचा विमासाठी नागरिकांना फक्त 275 रुपये प्रीमियम भरावे लागते आणि तीन वर्षांसाठी 375 रुपये प्रीमियमसोबत GST सुद्धा भरावे लागते.  
  • लाभार्थ्यांना योजनेमधून मिळणारा विमा विदेशामध्ये सुद्धा वापरण्याची परवानगी असते. 
  • वैद्यकीय तंदुरुस्त नसतील किंवा नोकरीमधून काढण्यात आले अशा कोणत्याही कारणामुळे रोजगार बंद झाल्यावर भारतामध्ये परत येण्यासाठी One-way Economy Class Air Fare ची सुविधा सुद्धा दिली जाते.
  • PBBY योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांच्या कुटुंबाला म्हणजेच जोडीदार व पहिल्या दोन मुलांना ज्याचे वय 21 वर्षांपेक्षा कमी असेल, त्यांनासुद्धा 50 हजार रुपयांपर्यंतचे Hospitalization कव्हर दिले जाते. 
  • सरकारच्या मदतीने स्थलांतर करणाऱ्या Maternity Expenses साठी सुद्धा 50,000 रुपयांचे फायदे देण्यात येते. 
  • Maternity Expenses मध्ये महिलेला सामान्य डिलिव्हरीसाठी 35,000 रुपये आणि शस्त्रकिया प्रकियासाठी 50,000 रुपयांचे लाभ विमाच्या अंतर्गत देण्यात येते. 
  • परदेशात काम करत असलेल्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारच्या मेडिकल समस्या झाले असल्यास त्यांच्या कुटुंबातील एका सदस्यांना त्यांना भारतामध्ये परत घेऊन येण्यासाठी संधी मिळते. 
  • कुटुंबातील सदस्यांना Reimbursement of Return Economy Class Air Fare सुविधा देण्यात येते, ज्यामधून ते परदेशात जाऊन परत येण्यासाठी सोय केली जाते. 
  • परदेशात काम करत असलेल्या व्यक्तीसोबत काही कायदेशीर खटला चालू असल्यास त्यांना शासनातर्फे 45,000 रुपये Legal Expenses दिला जातो. 
  • लाभार्थी सहजरित्या विमा कव्हरचे मुदत ऑनलाइन पद्धतीने करू शकतात. 

Pravasi Bharatiya Bima Yojana Eligibility 

परदेशात रोजगारासाठी जाणाऱ्या नागरिकांना विमाचा लाभ घ्यायचा असेल, तर प्रवासी भारतीय विमा योजनामध्ये पात्रता असणे आवश्यक आहे, यासाठी काही अटी दिलेल्या आहेत त्या खालीलप्रमाणे आहेत.

  • परदेशात जाणारा व्यक्ती भारताचा नागरिक असणे बंधनकारक आहे. 
  • अर्जदार रोजगारासाठी बाहेर देशामध्ये जाणारा असावा किंवा काम करत असावा. 
  • जे नागरिक योजने अंतर्गत सहभागी होणारे आहेत, त्यांचे वय 18 ते 65 वर्ष वयोगटामधील असणे आवश्यक आहे. 
  • अर्जदार व्यक्तींना दोन वर्षांसाठी 275 रुपये आणि तीन वर्षांसाठी 375 रुपये योगदान द्यावे लागणार. 
  • PBBY योजनेमध्ये अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे आवश्यक असणारी संपूर्ण कागदपत्रे असणे. 

Pravasi Bharatiya Bima Yojana Required Documents

अर्जदारांना अर्ज करताना प्रवासी भारतीय विमा योजनामध्ये आवश्यक असणारे कागदपत्रे खालीलप्रमाणे दिलेल्या यादीनुसार जमा करणे महत्त्वाचे आहेत. 

  • अर्जदाराचे आधारकार्ड 
  • पॅनकार्ड 
  • मोबाईल नंबर 
  • ई-मेल आयडी 
  • पासपोर्ट आकाराचे फोटो 
  • अटेस्टेड केलेले पासपोर्ट
  • बँक खात्याचे पुरावे (पासबुकचे पहिले पान/चेक) 
  • ओळखपत्र 
  • स्थानिक रहिवासी दाखला 
  • वयाचे पुरावे 
  • Visa 
  • वर्क परमिट 

How to apply Pravasi Bharatiya Bima Yojana? 

अर्जदारांना प्रवासी भारतीय विमा योजनामध्ये ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यासाठी केंद्र सरकारकडून  कोणत्याही प्रकारचे पोर्टल तयार करण्यात आलेले नाही. नागरिकांना योजने अंतर्गत विमा पॉलिसी घेण्यासाठी खाजगी विमा कंपन्यांच्या वेबसाइटमध्ये जाऊन करावे लागेल किंवा त्यांच्या शाखेमध्ये जाऊन फॉर्म प्राप्त करावे लागेल.

संपूर्ण फॉर्म भरून घ्या आणि आवश्यक असणारी कागदपत्रे फॉर्मसोबत जोडा. त्यानंतर  कॅश किंवा ऑनलाइन पेमेंटच्या माध्यमातून विमाचे प्रीमियम भरून घ्या. त्यानंतर शाखेमधून अर्ज केलेली पावती घेऊन ती सांभाळून ठेवा. 

Conclusion 

या लेखाच्या माध्यमातून Pravasi Bharatiya Bima Yojana संबंधित संपूर्ण माहिती देऊन आम्ही मार्गदर्शन केले. ज्यामध्ये प्रवासी भारतीय विमा काय आहे? ती केंद्र सरकारने का सुरु केली? कोणत्या नागरिकांसाठी सुरु करण्यात आली? यामध्ये कोणते मंत्रालय अंमलबजावणी करायचे काम करते? योजनेची सुरुवात शासनाने कधी केली होती? तसेच मुख्य उद्देश काय आहे ? नागरिकांना यामधून कोणते फायदे दिले जातात? विमा सुरक्षा अंतर्गत किती रुपयांचा मेडिकल कव्हर दिला जातो? योजने अंतर्गत लाभार्थ्यांना कोणत्या अटीचे पालन करावे लागेल? त्याचप्रमाणे अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार? विमाचा प्रीमियम किती असणार आहे? आणि विमा कशा पद्धतीने अर्ज करून घेऊ शकतो? या सर्व गोष्टींबद्दल सविस्तरपणे माहिती आम्ही लेखात दिली आहे. 

तुम्ही सुद्धा परदेशात नोकरी करण्यासाठी जात असाल किंवा तिथे नोकरी करत असाल, तर या योजनेमधून विमा सुरक्षा घ्या आणि तुमचे जीवन सुरक्षित ठेवा. आमचा हा आर्टिकल तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर भविष्यात येणाऱ्या नवीन योजनेच्या माहितीसाठी आमच्या वेबसाइटला Subscribe करू शकता किंवा टेलिग्राम चॅनेला भेट देऊ शकता. 

FAQs

प्रवासी भारतीय विमा योजनेची सुरुवात कधी झाली? 

केंद्र सरकारने विमा योजनेची सुरुवात 01 ऑगस्ट, 2017 रोजी केली होती. 

PBBY चा पूर्ण अर्थ काय आहे? 

PBBY चा पूर्ण अर्थ Pravasi Bharatiya Bima Yojana असा आहे. 

प्रवासी भारतीय विमा योजना म्हणजे काय? 

ही योजना म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून परदेशामध्ये रोजगाराच्या निमित्त स्थलांतर करणाऱ्या नागरिकांना मेडिकल विमा सुरक्षा प्रदान करणे. 

पुढे वाचा: