PM LPG Panchayat Yojana 2024: केंद्र सरकारने देशभरात Pradhan Mantri Ujjwala Yojana संबंधित जागरूकता पसरविण्यासाठी प्रधानमंत्री एलपीजी पंचायत योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून विविध प्रकारचे ग्रुप तयार केले जातात, ज्यामधून महिलांना LPG गँस संबंधित जागरूक केले जाते.
आपल्या देशामध्ये ग्रामीण क्षेत्रात आजही जेवण तयार करण्यासाठी चुलीचा वापर केला जातो, ज्यामुळे चुलीमधून होणाऱ्या धुराच्यामार्फत विविध प्रकारचे आजार पसरतात. त्यामध्ये काही जणांचे मृत्यू सुद्धा होतात. त्यामुळे निसर्गाचासुद्धा ऱ्हास होत आहे व वातावरणामध्ये प्रदूषण पसरत आहे. तसेच विविध प्रकारचे नुकसान सुद्धा या गोष्टीमुळे होते.
केंद्र सरकार उज्ज्वला योजनेअंतर्गत जवळपास अडीच कोटी नागरिकांना गॅस सिलेंडर वाटप करण्यात येणार होते. त्यामध्ये ज्यांना गॅस प्राप्त झाले, त्यांचे जीवन कशाप्रकारे बदलले? व त्यांना कोणत्या गोष्टींचा फायदा मिळाला? अशा नागरिकांच्या माध्यमातून जागोजागी एलपीजी गॅस संबंधित जागरूकता पसरवण्याचे लक्ष्य केंद्र सरकारचे आहे.
आजच्या आपल्या आर्टिकलच्या माध्यमातून प्रधानमंत्री एलपीजी पंचायत योजना काय आहे? त्यामागचे उद्देश, फायदे, चूल वापरल्यामुळे होणारे नुकसान, कोणत्या गोष्टी कव्हर केले जाणार? जागरूकता कशाप्रकारे पसरवण्यात येणार? आणि कोणते नागरिक यामध्ये सहभागी होणार? अशा सर्व गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत, तर शेवटपर्यंत लेख वाचा.
PM LPG Panchayat Yojana in Marathi
केंद्र सरकारने प्रधानमंत्री एलपीजी पंचायत योजनाची सुरुवात 01 मे, 2016 रोजी केली होती. या योजनेच्या माध्यमातून जागरूकता पसरविण्यासाठी संघटना तयार करायचे काम Ministry of Petroleum and Natural Gas विभाग करते.
आर्थिकदृष्टया कमकुवत असलेल्या कुटुंबाना उज्ज्वला योजना अंतर्गत LPG कनेक्शन देण्यात आले होते. या योजनेच्या माध्यमातून जेवढ्या लोकांना कनेक्शन देण्यात आले, त्यांच्यामध्ये परस्परसंवाद करण्यास प्रदान करण्यात येते.
या योजनेची मुख्य कल्पना म्हणजे एक ग्रुप तयार केला जाणार, त्यामधून त्यांचे अनुभव व ज्ञान दुसऱ्या लोकांपर्यंत पोहोचवले जाणार व त्याद्वारे इतर नागरिकांमध्ये जागरूकता पसरवून स्पोर्ट केले जाणार. त्याचप्रमाणे महिलांना LPG गॅस वापरण्या संबंधित सुरक्षा उपाय कसे करावे? व त्यामधून आरोग्य कसे जपावे? याबद्दल माहिती देण्यात येते.
Vision of PM LPG Panchayat Yojana
केंद्र सरकारचे PMUY योजना सुरु करण्यामागचे व्हिजन म्हणजे देशामधील दारिद्रय रेषेखालील सर्व घरांमध्ये LPG कनेक्शन उपलब्ध करून देणे आहे. जेणेकरून महिलांनी जेवण तयार करण्यासाठी स्वयंपाक घरामध्ये इंधन म्हणून लाकडाचा वापर टाळणे.
प्रधानमंत्री एलपीजी पंचायत योजनेमार्फत जागरूकता पसरवून लाकडाच्या इंधनांमधून होणाऱ्या आरोग्य विषयी नुकसानीला थांबवले जातील. त्याचप्रमाणे घरातील प्रत्येक सदस्यांच्या आरोग्याचा सुरक्षितेसाठी जेवण करताना एलपीजी गॅसचा वापर करतील.
PM LPG Panchayat Yojana 2024 Overview
योजनाचे नाव | प्रधानमंत्री एलपीजी पंचायत योजना |
श्रेणी | केंद्र सरकारी योजना |
सुरु करण्यात आली | 01 मे, 2016 रोजी |
कोणी सुरु केली | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी |
विभाग | पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय, भारत सरकार |
उद्देश | देशभरातील कुटुंबामध्ये एलपीजी गॅस संबंधित जागरूकता पसरविणे |
लाभार्थी | भारत देशामधील महिला वर्ग |
लाभ | जवळपास 5 कोटी कुटुंबाला मिळणार LPG गॅस |
अधिकृत वेबसाइट | pmuy.gov.in |
PM LPG Panchayat Yojana Objectives
केंद्र सरकारने सुरु केलेल्या प्रधानमंत्री एलपीजी पंचायत योजनाचे मुख्य उद्देश LPG गॅसचा वापर कसा करायचा? याबद्दल महिलांना शिक्षित करणे हे आहे. त्याचप्रमाणे धुराव्यतिरिक्त जीवन कसे असते? हे त्यांना सांगणे. जेणेकरून त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार नाही.
योजनेच्या माध्यमातून जागरूकता पसरवून गरीब वर्गातील नागरिकांना LPG connection उपलब्ध करून देणे. त्याचप्रकारे विशेष करून ग्रामीण क्षेत्रातील महिलांना जेवण करण्यासाठी वापरात असलेल्या पारंपारिक इंधनाबद्दल जागरूक करून देणे हे मुख्य ध्येय केंद्र सरकारचे आहे.
PM LPG Panchayat Yojana Benefits
- प्रधानमंत्री एलपीजी पंचायत योजनाचे फायदे गरीब कुटुंबातील महिलांना पारंपरिक इंधनापासून जागरूकता पसरविण्यासाठी होणार आहे.
- या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारने जवळपास 5 कोटी कुटुंबाना LPG Gas सुविधा उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य ठेवले आहेत.
- गरीब व दारिद्रय रेषेखालील महिलांना आरोग्य सुरक्षा संबंधित शिक्षित केले जाणार.
- लाभार्थ्यांना पीएम एलपीजी पंचायत योजना अंतर्गत एका वर्षामध्ये 12 गॅस सिलेंडरसाठी सबसिडी दिली जाईल.
- केंद्र सरकारतर्फे प्रत्येक सिलेंडर मागे लाभार्थ्यांना 200 रुपयांची सबसिडी दिली जात आहे.
- तसेच महिलांना योजनेच्यामार्फत पहिला सिलेंडर मोफत रिफील करण्यास मिळणार.
- केंद्र सरकारच्या माध्यमातून महिलांना सिलेंडर रिफीलसोबत गॅस शेगडी सुद्धा मोफत दिली जाणार.
- परस्परसंवाद करण्यासाठी कमीतकमी 18 वर्ष पूर्ण असलेल्या नागरिकांना योजनेमध्ये सहभागी होण्याची संधी प्राप्त होणार.
- योजने अंतर्गत एका नागरिकाला सिलेंडर न मिळता, ते फक्त एका कुटुंबाला देण्यात येणार.
- केंद्र सरकारतर्फे पहिले LPG Panchayat प्रोग्राम उत्तर प्रदेशमधील बालिया येथे आयोजित करण्यात आली होती.
- एलपीजी पंचायत अंतर्गत उघडण्यात येणाऱ्या ग्रुपमध्ये कमीतकमी 100 लाभार्थ्यांचा समावेश असणार आहे.
- पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय जे उज्ज्वला योजना राबिवतात तेच या योजनेमधील ग्रुपला सांभाळायचे काम करतात.
- केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री एलपीजी पंचायत योजना सुरु करण्यामागची गरज ग्रामीण क्षेत्रातील लोकांपर्यंत LPG गॅस सुविधा पोहोचवणे होती.
- पंचायतच्यामार्फत महिला वर्गाला LPG गॅसचा वापर, समस्या व त्यामधून होणारे फायदे सांगणे हे मुख्य उद्देश होते.
- आतापर्यंत जे लोक पारंपारिक इंधनांचा वापर करून जेवण करत आहेत, त्यांना एलपीजी संबंधित माहिती देऊन जागरूकता पसरवायचे काम केंद्र सरकार करते आहे.
- एलपीजी पंचायत अंतर्गत जेवढ्या नागरिकांनी PMUY योजनेमधून लाभ घेतला आहे, ते एकत्र येऊन जागरूकता पसरवायचे काम करणार.
PM LPG Panchayat Yojana Covered
पीएम उज्वला योजना अंतर्गत महिलांना गॅस कनेक्शनचा लाभ घेऊन देण्यासाठी व त्यांना सुरक्षित वातावरणामध्ये जीवन जगण्यासाठी केंद्र सरकारने एलपीजी पंचायतची संकल्पना सुरु केली, त्या संकल्पनेमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश असणार आहे? त्याची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
Health
आपल्या भारत देशामध्ये घरामधील धुराच्या प्रदूषणामुळे वर्षाला 5 लाखांपेक्षा जास्त मृत्यू होतात, असे WHO म्हणजे World Health Organisation चे सांगणे आहे. देशामध्ये जास्त प्रमाणात स्त्रिया स्वयंपाक घरामध्ये वेळ घालवतात.
त्यामध्ये जेवण तयार करतेवेळी पारंपारिक इंधनाचा वापर केल्यामुळे महिलांना आरोग्य समस्या जास्त प्रमाणात होतात. या समस्यांना दूर करण्यासाठी पारंपारिक इंधनाचा वापर टाळण्यासाठी LPG गॅस पर्याय वापरण्यास प्रोत्साहन दिले जाते.
Economic Costs
लाकूड, बायोमास व कोळसा यातून तयार करण्यात आलेल्या इंधनापेक्षा LPG गॅस हा जेवण करण्यासाठी स्वस्त दरात प्राप्त होतो. म्हणजेच चुलीपेक्षा कमी खर्चात एलपीजी गॅस स्वस्त पडतो. हा गॅस जास्त दिवस चालतो व यामध्ये महिलांना कमी मेहनत लागते.
चुलीमध्ये जेवण करताना त्यांना लाकूड जंगलातून तोडून आणावे लागते, यामध्ये मेहनत जास्त जाते व जीवाला धोका सुद्धा असतो. त्याचप्रमाणे वाचलेल्या वेळामध्ये महिला दुसरे कोणतेही काम करू शकतात व घरातील तरुण मुली शिक्षणासाठी वेळ देऊ शकतात.
Safety
प्रधानमंत्री एलपीजी पंचायत योजनाचे मुख्य उद्देश हे महिलांना सुरक्षित ठेवणे आहे. PMUY Scheme अंतर्गत देण्यात येणारे गॅस कनेक्शन हे महिलांच्या सुरक्षाच्या दृष्टीकोनातून राबविण्यात येत आहेत. घरातील महिला व सदस्यांची सुरक्षा करणे हे प्राधान्य आहे.
चुलीमध्ये वापरण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या पारंपरिक इंधनांमधून धूर होतो आणि त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना व महिलेला प्रदूषणामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो. त्यामुळे केंद्र सरकार योजनेच्या माध्यमातून शिक्षित करून LPG गॅस वापरण्यास प्रोत्साहन देत आहेत. त्यामध्ये महिलांना सावधगिरी कशी ठेवायची? कोणत्या गोष्टींना फॉलो करावे लागेल? त्याचप्रमाणे काही समस्या झाल्यास हेल्पलाईन नंबर अशाबद्दल मार्गदर्शन केले जाते.
Environment
प्रधानमंत्री एलपीजी पंचायत योजना अंतर्गत जागरूकता पसरविल्यामुळे नागरिक PMUY योजनाच्या माध्यमातून LPG गॅसची सुविधा वापरतील आणि यामुळे आपले पर्यावरणसुद्धा सुरक्षित राहण्यात मदत होईल.
जेवण करताना पारंपारिक पद्धतीचा वापर म्हणजे बायोमास, लाकूड व कोळसा यामधून होणारे धूर हे पर्यावरणाला हानी पोहोचवतात. याचा परिणाम पर्यावरणासोबत तेथील राहणाऱ्या नागरिकांनासुद्धा होतो. एलपीजीचा जेवढा जास्त वापर केला जाईल तेवढा धूर कमी निघेल व पर्यावरण सुरक्षित राहील.
Empowerment
PMUY अंतर्गत जर महिला एलपीजी गॅस कनेक्शनचा वापर करत असल्यास त्यांचा वेळ व मेहनत दोन्ही वाचेल. यामधून मिळालेला वेळ ते इतर चांगल्या कामासाठी देऊन आपले जीवन चांगले जगू शकतात.
तसेच घरामधील तरुण मुली आपल्या शिक्षणाला वेळ देऊन आपले भविष्य उज्ज्वल बनविण्यासाठी सक्षम होतील. तसेच महिला सुद्धा स्वतःचे काहीतरी व्यवसाय व नोकरी करून आपली आर्थिक परिस्थिती चांगली करू शकतात.
Participants of PM LPG Panchayat Yojana
प्रधानमंत्री एलपीजी पंचायत योजनामध्ये कोणकोण सहभागी होऊ शकतात? याची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे.
- Young Girls: योजने अंतर्गत 1/4 प्रमाणे तरुण मुलींचा समावेश करण्यात येणार आहे. जेणेकरून चुलीचा वापर सोडून त्यांना शिक्षणासाठी वेळ देण्यासाठी प्रोत्साहित केले जातील.
- Anganwadi Workers: योजने अंतर्गत अंगणवाडीमध्ये काम करत असलेल्या महिलांना सुद्धा सहभागी करून जागरूकता व माहिती देण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.
- Local Woman Leader: राहत्या क्षेत्रामधील शिक्षक, डॉक्टर, हेल्थ वर्कर, व्यवसाय करणाऱ्या महिला, पोलीस ऑफिसर, वकील, कलाकार आणि सामाजिक व राजकीय कार्यकर्ते यांचा पंचायत अंतर्गत समावेश करण्यात येतो.
- Local ASHA Workers: पंचायत ग्रुप अंतर्गत महिलांपर्यंत जागरूकता पसरविण्यासाठी लोकल आशा कामगारांना सुद्धा सहभागी करून घेण्यात येणार आहे.
- Mid-Day Meal Coordinators: जेवण करणाऱ्या महिलांनासुद्धा सहभागी करून घेण्यासाठी केंद्र सरकार प्रोत्साहित करतात.
- Self Help Group: NRLM प्रोग्राम अंतर्गत असलेल्या सेल्फ हेल्प ग्रुपमधील महिलांनासुद्धा जागरूकता पसरविण्यासाठी समावेश केला जातो.
निष्कर्ष
अशा प्रकारे आम्ही तुम्हाला PM LPG Panchayat Yojana संबंधित संपूर्ण माहिती देऊन मागर्दर्शन केले. ज्यामध्ये योजना काय आहे? ती का चालू करण्यात आली? कोणातर्फे सुरु करण्यात आली? कधी सुरु करण्यात आली? यामधून महिलांना कोणते फायदे मिळणार? सुरु करण्यामागचे मुख्य उद्देश काय होते? कोणकोणत्या गोष्टींचा समावेश योजनेमध्ये करण्यात आला? आणि यामध्ये कोणते नागरिक सहभागी होण्यासाठी पात्र असणार आहेत? अशा सर्व गोष्टींबद्दल सविस्तर माहिती सांगितली.
तुमच्या क्षेत्रामध्ये कोणी अजूनही चूल वापरात असतील तर त्यांना हा लेख पाठवून जागरूक करा आणि त्यांची मदत करा. अशाच योजनांच्या माहितीसाठी तुम्ही आमच्या Telegram किंवा WhatsApp चॅनेला जॉईन करू शकता.
पुढे वाचा: