PM Kisan Samman Nidhi Yojana 2024: भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीनी 1 डिसेंबर 2018 रोजी पीएम किसान सम्मान निधि योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरु केली. या योजने अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना सरकारतर्फे वर्षातून 2000 रुपये तीन समान हफ्त्यांच्या स्वरूपात एकूण 6000 रुपये रक्कम दिली जाते.
ही 6000 रुपये रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट दिली जाते. या योजनेमध्ये सुरुवातीला ज्या शेतकऱ्यांची 2 हेक्टर जमीन असेल त्यांनाच सम्मान निधी दिली जात होती. परंतु आता पीएम किसान सम्मान निधि योजनाचा लाभ संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांना प्राप्त होत आहे.
पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी EKYC अपडेट करणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून तुमचे अडकलेले पैसे किंवा येणारे पैसे बँकेत योग्यरित्या जमा होतील. EKYC कसे करावे? या बद्दलची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत लेख लक्षपूर्वक पाहा.
PM Kisan Samman Nidhi Yojana in Marathi
तेलंगणामधील राज्य सरकारने 2018 मध्ये शेतकऱ्यांना Ryuthu Bandhu Scheme तर्फे शेतीसाठी गुंतवणूक म्हणून सुरु केली. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना राज्य सरकार वर्षातून 2 वेळा ठराविक रक्कम त्यांच्या खात्यामध्ये देत असे. या उपक्रमाचा फायदा शेतकऱ्यांना थेट होऊन या स्कीमची मोठ्या प्रमाणात ओळख वाढली.
या उपक्रमामुळे, शेतकऱ्यांना आर्थिक मदत प्राप्त होण्यासाठी 1 डिसेंबर 2018 रोजी भारत सरकारने पीएम किसान सम्मान निधि योजना सुरु केली आणि यामध्ये दरवर्षी 75,000 कोटींचे बजेट मंजूर केले जाईल अशी घोषणा केली गेली.
पीएम किसान सन्मान निधी योजना काय आहे?
केंद्र सरकारने भारत देशातील शेतकऱ्यांसाठी P M Kisan Samman Nidhi योजना सुरु केली आहे. शेतकऱ्यांना दर वर्षी 6000 रुपये रक्कम 2000 रुपये हफ्त्यानुसार 3 भागामध्ये चार-चार महिन्यांनी दिली जाते.
ही PM-Kisan निधि शेतकऱ्यांना डायरेक्ट बँक ट्रांसफर (DBT) च्या माध्यमातून बँक खात्यामध्ये दिली जाते. केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान योजना अंतर्गत पूर्ण वर्षासाठी 75,000 कोटी रुपयांचा बजेट लागू केला आहे.
PM Kisan Samman Nidhi Yojana 2024 Overview
योजनाचे नाव | पीएम किसान सम्मान निधि योजना |
कोणती सुरु केली | प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी |
विभाग | कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय |
लाभर्ती | भारत देशातील सगळ्या शेतकरी वर्गासाठी |
लाभ | दरवर्षी 6000 रुपये रक्कम |
उद्देश | शेतकऱ्यांना आर्थिक मदत |
वर्षाचा बजेट | 75,000 कोटी रुपये |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
प्राप्तीचे माध्यम | Direct Benefit Transfer किंवा DBT |
हेल्पलाइन नंबर | 011-24300606, 155261 |
अधिकृत वेबसाइट | pmkisan.gov.in |
पीएम किसान सन्मान निधी योजना उद्देश | Objectives
भारत हा एक कृषीप्रधान देश असून देशातील 75% लोकसंख्या कृषीवर आधारित आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजनेचा मुख्य उद्देश भारत देशामधील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे हा आहे.
तुम्हाला तर माहितीच असेल, शेतकऱ्यांना किती प्रकारच्या कृषी संबंधित आव्हानांना सामोरे जावे लागते, यात त्यांचे बऱ्याच वेळेला शेतीमध्ये नुकसान ही होते.
अशा प्रकारे केंद्र सरकारने दिलेल्या या योजनेच्या लाभाचा शेतकऱ्यांना छोटा का होईना एक मदतीचा हात दिला जातो. त्यामुळे देशातील शेतकरी PM-Kisan योजनेच्या माध्यमातून सरकारतर्फे मिळालेल्या आर्थिक मदतीमुळे आत्मनिर्भर राहतील.
किसान सन्मान योजनाचे फायदे व वैशिष्ट्ये काय आहे? | Benefits and Features
शेतकऱ्यांसाठी उत्पनाचा आधार
देशामधील शेतकऱ्यांसाठी योजनामधील प्रमुख वैशिष्ट म्हणजे आर्थिक मदत. दरवर्षी या योजनेमधून देशभरातील शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना 6000 रुपये रक्कम प्राप्त होणार. ही रक्कम शेतकऱ्यांना 2000 रुपये प्रमाणे प्रत्येक 4 महिन्यात त्यांच्या बँक खात्यात जमा होतील.
निधि प्राप्त करून देणे
भारत सरकारने शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी दरवर्षी 75,000 कोटी राखीव रक्कम ठेवण्याची घोषणा केली.
PIB Delhi च्या दिलेल्या माहितीनुसार, पीएम किसान सम्मान निधि योजना अंतर्गत केंद्र सरकारने 18 जुन 2024 रोजी 20,000 कोटी रक्कम देशामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये Direct Benefit Transfer (DBT) द्वारे वितरित करण्यात आली आहे.
निधिची जबाबदारी
या योजनेची जबाबदारी ही Government of India (GOI) असून ही लाभार्थीची ओळख त्या कक्षेत होत नसेल आणि याचा लाभ शेतकरी कुटुंबाला होत नसेल यावर राज्य आणि केंद्र सरकार जबाबदारी घेते.
पीएम किसान कर्जासाठी कोण पात्र आहे? | Eligibility
- प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजनासाठी शेतकरी हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
- जे शेतकरी यामध्ये लाभार्थी असणार, त्यांनी सरकारी नोकरीमध्ये नसले पाहिजेत.
- या योजनेचे लाभ देशातील सगळ्या लहान आणि मार्जिनल शेतकरी बांधवांसाठी आहे.
- शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यासाठी बँक खाते असणे आवश्यक आहे.
- Pradhanmantri Kisan Samman Nidhi Yojana अंतर्गत Urban आणि Rural भागातील शेतकऱ्यांचा यात समावेश आहे.
पीएम किसान सन्मान योजनासाठी आवश्यक कागदपत्रे | Documents Required
- जमिनीचे कागदपत्रे
- ओळख पत्र
- आधारकार्ड
- वोटर आयडी
- ड्रायव्हिंग लायसन्स (पर्यायी)
- बँकेचे पासबुक
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साइज फोटो
- जमिनीचे तपशील (शेतकऱ्याकडे किती जमीन आहे)
किसान सन्मान निधीसाठी अर्ज कसा करावा? | PM Kisan Samman Nidhi Yojana Online Registration
जे शेतकरी P M kissan Samman Nidhi चा लाभ घेण्यासाठी इच्छुक असतील, त्यांनी खालील दिलेल्या ऑनलाइन अर्ज प्रक्रियानुसार क्रमाक्रमाने अर्ज करा.
Online Registration
- P M-Kisan अंतर्गत अर्ज करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला अधिकृत वेबसाइटला जावे लागेल.
- अधिकृत वेबसाइटच्या होमपेजवर गेल्यानंतर तुम्हाला Farmer Corner मध्ये जाऊन New Farmer Registration च्या पर्यायावर क्लिक करणे.
- त्या पर्यायावर क्लिक करून झाल्यावर तुमच्या समोर New Farmer Registration चा फॉर्म उघडेल.
- त्यामध्ये तुम्हाला 2 प्रकारचे पर्याय दिसतील, पहिले Rural Farmer Registration आणि दुसरे Urban Farmer Registration.
- जर तुम्ही ग्रामीण भागातील शेतकरी असाल तर Rural Farmer Registration चा पर्याय निवडा.
- जर तुम्ही शहरी भागातील शेतकरी असाल तर Urban Farmer Registration वर क्लिक करा.
- पर्याय निवडून झाल्यावर तुम्हाला आधार नंबर आणि मोबाइल नंबर टाकून घेणे.
- दोन्ही नंबर टाकून झाल्यावर तुम्ही राहत असलेल्या राज्याला निवडणे.
- राज्याला निवडून झाल्यावर खाली दिलेल्या Captcha Code भरून Send OTP वर क्लिक करणे.
- तुमच्या मोबाइल नंबरवर OTP आला असेल तो भरून verify करून घेणे.
- वेरिफिकेशन झाल्यावर पुढच्या पानावर फॉर्म उघडेल त्यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती आणि जमिनीचे तपशील भरून घेणे.
- सगळंकाही त्या फॉर्ममध्ये भरून झाल्यावर ध्यानपूर्वक तपासणी करून तो फॉर्म पाठवून देणे.
- अशा प्रकारे तुमची प्रधानमंत्री किसान योजनामध्ये ऑनलाइन रेजिस्ट्रेशन प्रक्रिया पार पडली.
Offline Registration
ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान सम्मान निधि योजनामध्ये ऑनलाइन अर्ज करायला जमत नसेल तर, त्यांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. त्यासाठी खालील दिलेल्या प्रक्रियानुसार ऑफलाइन अर्ज करा.
- ऑफलाइन अर्ज करण्यासाठी P M-Kisan Registration फॉर्म डाउनलोड करून घेणे.
- त्यानंतर Registration फॉर्म मध्ये दिलेली सगळी माहिती भरून घेणे.
- संपूर्ण फॉर्म भरून झाल्यावर आम्ही सांगितल्याप्रमाणे सगळे आवश्यक कागदपत्रे जोडून घेणे.
- ते कागदपत्रे आणि फॉर्म घेऊन तुमच्या जवळच्या लोक सेवा केंद्राला भेट देऊन documents सादर करणे.
- त्यानंतर या योजनांचा लाभ तुम्हाला भेटायला सुरुवात होईल.
किसान सन्मान निधीसाठी केवायसी कसे करावे? | PM-Kisan E-KYC Update
P M-Kisan eKYC: केंद्र सरकारने पीएम किसान योजने अंतर्गत लाभार्थींना ईकेवायसी करणे बंधनकारक केले आहे. जर तुमच्या बँक खात्यामध्ये P M Kisan Installments येत नसेल, तर लवकरात लवकर EKYC करून घेणे आवश्यक आहे. खालील दिलेल्या सोप्या पद्धतीने EKYC अपडेट करून घ्या.
- PM Kisan eKYC करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला government च्या pmkisan.gov.in च्या अधिकृत वेबसाइट जावे लागेल.
- तुम्ही वेबसाइटच्या होमपेजवर गेल्यावर तुम्हाला e-KYC चा पर्याय सामोर येईल त्यावर क्लिक करणे.
- त्या पर्यायावर क्लिक करून झाल्यावर तुम्ही एका नवीन पानावर पोहोचाल.
- नवीन पानावर गेल्यावर तुम्हाला तुमचा आधारकार्ड नंबर टाकून search च्या बटनवर क्लिक करणे.
- तुमच्या आधारकार्डला जो रजिस्टर मोबाईल नंबर असेल त्यावर OTP येईल.
- तो OTP त्यामध्ये टाकून Submit बटन वर क्लिक करून तुमची P M-Kisan Yojana eKYC पार पडेल आणि तुमच्या बँक खात्यामध्ये योग्यरित्या पैसे येण्यास सुरुवात होईल.
किसान सन्मान निधीची स्थिती कशी तपासायची? | PM Kisan Samman Nidhi Yojana Beneficiary Status Check
दरवर्षी PM Kisan Scheme च्या माध्यमातून GOI 6000 रुपये किमान रक्कम 3 installments मध्ये शेतकरी खात्यामध्ये दिले जातात. जर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे आले नाही तर तुम्ही खालील दिलेल्या पद्धतीने PM Kisan Status चेक करू शकता.
- P M Kisan Status चेक करण्यासाठी सुरुवातीला अधिकृत वेबसाइटवर जावा.
- या वेबसाइटच्या होमपेजवर तुम्हाला Beneficiary Status असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
- P M Kisan status check करण्यासाठी रजिस्टर मोबाइल नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर पर्याय दिसेल.
- त्या पर्यायामध्ये मोबाइल नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर टाकून captcha code टाकून घेणे.
- त्यानंतर तुम्हाला Get Data चा option दिसेल त्यावर केल्यावर beneficiary स्टेटस बघायला मिळेल.
किसान सन्मान योजना यादी कशी तपासायची? | PM Kisan Samman Nidhi Beneficiary List Check
जे शेतकरी PM-Kisan योजनेत सहभागी आहेत, त्यांना आपल्या गावच्या P M Kisan Beneficiary List मध्ये तुमचे नाव पाहण्यासाठी खाली सांगितलेल्या प्रकिया फॉलो करा.
- pm kisan yojana list Check करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाइटचे पोर्टल उघडावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला वेबसाइटच्या home page वर Beneficiary List च्या विकल्पावर क्लिक करा.
- क्लिक करून झाल्यावर तुमच्या समोर नवीन पेज उघडेल.
- त्यानंतर State, Taluka, Sub-District, Block आणि village निवडून घ्या.
- या सगळ्या पर्याय निवडून झाल्यावर Get Report वर क्लिक करा.
- अशाप्रकारे किसान सन्मान निधिची यादी तुमच्या समोर उघडून आल्यावर तुमचे नाव बघणे.
पीएम किसान स्टेटस | PM Kisan Beneficiary Status 2024: 17th Installment
P M-Kisan Beneficiary Status: वाराणसीमध्ये 18 जून 2024 मध्ये ठेवलेल्या किसान सन्मान संमेलनात भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी 17 वा हफ्ता जाहीर केली. या योजनाच्या मार्फत 20,000 कोटी रुपये DBT च्या माध्यमातून 9.3 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये ट्रांसफर करण्यात आले.
FAQs
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना कोणत्या तारखेला सुरू झाली?
1 डिसेंबर 2018 रोजी सुरु करण्यात आली होती.
शेतकऱ्यांना 6000 रुपये कसे मिळणार?
शेतकऱ्यांना 6000 रुपये Direct Benefit Transfer (DBT) च्या मार्फत बँक खात्यात मिळणार.
पीएम किसान हप्ता 2024 ची तारीख काय आहे?
2024 मधील हफ्त्याची तारीख 18 जून 2024 होती.
पुढे वाचा: